Ahmednagar Mahavitaran : ग्राहकाकडून महावितरणच्या अधिकाऱ्याला मारहाण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Mahavitaran : सहा महिन्यापासून थकीत वीज बिल भरले नसल्याने महावितरणच्या अधिकाऱ्यांनी कनेक्शन कट केले. नंतर बिल भरल्याने कनेक्शन जोडून दिले; परंतू लाईट चालू झाली नाही.

त्यामुळे ग्राहकाने महावितरणच्या अधिकाऱ्यांना मारहाण करून धमकी दिल्याची घटना राहुरी तालुक्यातील राहुरी फॅक्टरी येथे घडली.

याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की माधव अमृता हिलीम (वय ३१ वर्षे), हे राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे राहातात. ते महावितरणमध्ये वरीष्ठ तंत्रज्ञ या पदावर नोकरीस आहेत.

राहुरी फॅक्टरी येथील अंबिका नगरमधील गयाबाई शाहाराम शिंदे यांचे कनेक्शन गेल्या सहा महिन्यांपासून थकित होते. त्यामुळे दिनांक ११ मार्च २०२४ रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास माधव हिलीम यांनी इतर कर्मचारी सोबत घेऊन गयाबाई शिंदे यांचे कनेक्शन कट केले.

त्यानंतर दुपारी शिंदे यांनी बिल भरल्यानंतर त्यांचे विज कनेक्शन पून्हा जोडुन देण्यात आले; मात्र सायंकाळपर्यंत शिंदे यांची लाईट चालू झाली नाही. शिंदे यांनी महावितरण कर्मचाऱ्यांना फोन करुन सांगीतले.

तेव्हा माधव हिलीम, सचिन बोडखे, भागीनाथ माळवदे आदी कर्मचारी शिंदे यांच्या घरी गेले. तेव्हा गायबाई शिंदे यांचा पती शाहाराम नामदेव शिंदे हा तेथे उभा होता. त्याने माधव हिलीम यांना शिवीगाळ करत त्यांची गचांडी पकडून मारहाण केली.

तसेच तुम्ही बाहेर गावचे आहात, तुम्ही येथे कसे काम करता व कसे येथुन बाहेर निघुन जाता, ते मी पाहतो. असे म्हणुन धमकी दिली आणि सरकारी कामात अडथाळा निर्माण केला.

घटनेनंतर हिलीम यांनी राहुरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी शाहाराम नामदेव शिंदे याच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर २६५/२०२४ नुसार भा.दं.वि. कलम ३५३, ३२३, ५०४, ५०६ प्रमाणे मारहाण व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.