राजेंद्र नागवडे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी बेइमानी केली आहे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2022 :- श्रीगोंदे कारखाना हा शेतकऱ्यांच्या विकासाची कामधेनू आहे. परंतु या ठिकाणी हुकूमशाही पद्धतीने काम करत कारखान्याच्या माध्यमातून स्वतःच्या संपत्तीत वाढ करत आहेत.

राजेंद्र नागवडे सांगतात पाचपुते यांच्यावर आमचे उपकार आहेत. मात्र आमच्यावर नागवडे यांचे उपकार नाहीत. मी सात वेळा वेगवेगळ्या चिन्हावर निवडून आलो आहे.

तुम्ही आमदार करण्यासाठी भाजपमध्ये आला नाही, तर तुमचे कारनाम्यांची चौकशी लागू नये. इडीची पिडा लागू नये, यासाठी तुम्ही भाजपमध्ये आला, अशी टीका आमदार बबनराव पाचपुते यांनी केली.

नागवडे कारखाना निवडणुकीच्या सांगतासभेच्या निमित्त काष्टी येथील परिक्रमा कॉलेजमध्ये ऑनलाइन सभेचे आयोजन केले होते यावेळी कारखान्याचे माजी उपाध्यक्ष केशव भाऊ मगर, भगवानराव पाचपुते, अण्णासाहेब शेलार, संदीप नागवडे, जीजाबापू शिंदे उपस्थित होते.

आमदार पाचपुते म्हणाले, शेती व ऊस नसताना स्वतःचा मुलाच्या नावावर कोट्यवधी रुपयांचे बिल काढणाऱ्या राजेंद्र नागवडे यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी बेइमानी केली आहे, अशी टीका त्यांनी केली.

मगर यांनी राजकारणात यापूर्वी मला कधीच मदत केली नाही त्यांनी कायम स्व. बापूं बरोबर राहिले आहेत. मात्र त्यांच्या वडिलांनी मला आमदार होण्यासाठी मदत केली. १९८४ मध्ये सुद्धा नागवडे कारखान्यासाठी मोठी मदत करून मला कारखान्याचे अध्यक्ष केले.

उद्याच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर वज्रासारखे एकत्र राहून केशव मगर यांनाच अध्यक्ष करणार असल्याचे आमदार पाचपुते यांनी सांगितले. मगर म्हणाले, नागवडे यांनी कारखान्यावर ३५० कोटीचे कर्ज केले यात सभासदांचे मोठे नुकसान होत आहे. हे नुकसान टाळायचे असेल तर कारखाना आमच्या ताब्यात द्या.