सीना धरणाने तळा गाठला !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : कर्जत तालुक्यातील निमगाव गांगडां या कायम दुष्काळी व जिरायती भागाला वरदान ठरलेल्या सीना धरणामध्ये यंदा अद्यापी नवीन पाण्याची आवक झाली नसून यंदा सीना घरण पाणलोट क्षेत्रात पावसाने हुलकावणी विल्वाचे चित्र दिसत आहे.

घरणातील पाण्याने तळ गाठल्याने सध्या धरणात २७.१९ टकके पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे घरणावरील पाणीपुरवठा योजना संकटात आहेत. शेत सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता आहे. सीना धरणाची पाणीसाठवण क्षमता २४०० द.ल.घ.फू. असून, एकूण पाणीसाठा ६५२.५२ द.ल.घ.फू. आहे. यामध्ये मृतसाठा ५५२ द.ल.च.फू. तर उपयुक्‍त पाणीसाठा १००.०५ द.ल.घ.फू. आहे.

पावसाळा सुरू होऊन अडीच महिने लोटले तरी यंदा अद्यापी घरणात नवीन पाण्याची आवक झालेली नाही. पावसाने हुलकावणी दिल्वाने घरणात अल्पशा प्रमाणात पाणीसाठा राहिला आहे. मागील वर्षी पावसाच्या सुरूवातीला धरण पाणलोट क्षेत्रामध्ये बमदार पावसाने हजेरी लावल्याने जुलै महिन्यात पहिल्यांदाच सोना धरण निम्मे भरले होते.

नंतर पाणलोट त्रात पाऊस सुरू राहिल्याने घरण मागीलवर्षी सप्टेबर अखेर ओव्हरफ्लो झाले होते, त्यामुळे शेत सिंचन व पि्याच्या पाण्याचा प्रश्‍न बऱयापैकी मार्गी लागला होता. यंदा मात्र निम्मा पावसाळा संपला तरी पावसाने हुलकावणी दिल्याने घरण पाणलोट क्षेत्रात पाऊस केव्हा पडेल व नवीन पाण्याची आवक केव्हा येईल,

याकडे लाभक्षेत्रातील शेतकऱयांचे लक्ष लागले आहे. तत्कालीन पाटबंबाेमंत्री स्व. आबासाहेब निंबाळकर यांच्या पाठपुराव्यातून ९९७२ साली सोनानदीवरील ‘निमगाव गांगडा येथील सीना धरणाच्या कामास सुरूवात झाली. यामध्ये उजव्या व डाव्या कालव्याचा समावेश असून,

कर्जत तालुक्‍यातील ७ हजार ६७९ हेक्‍टर तर बोड जि. आष्टी तालुक्‍यातील ७७३ हेकट क्षेत्र जमिन ओलोताखाली येत आहे. कर्जत, आही, जामखेड, शरीगोद्यातोल काही भागांना घरणाच्या पाण्याचा उपयोग होतो. सिना धरण प्रकल्प कालव्याचे काम १९८५ मध्ये पूर्ण होवून प्रत्यक्ष सिंचनास सुरूवात झाली. कुकडी क्षेत्रातील धरणे पूर्ण क्षमतेने भरल्यानंतर वाहून जाड ओव्हरीचे पाणी पोसा खिडी प्रकल्पातून सीना धरणात घेता येईल अशी तरतूद आहे.

वेड्या बाभळींचे साम्राज्य धरणाच्या उजवा व डावा कालव्यात तसेच भरावावर मोठया प्रमाणावर वेड्या बाभळीसह इतर लहान मोठी झाडं झुडपं वाढली आहेत, त्यांची तोडणी करून कालवे स्वच्छ करून कालव्यांचे अस्तरीकरण करणे आवश्वक आहे, जेणे करून पाण्याची बचत होऊन शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात पाणी मिळेल.

मत्स्य बीजकेंद्र बंद धरणाची निर्मिती करताना या परिसराची निर्मिती करण्यात आली आहे. येथे सुविधा उपलब्ध आहेत परंतु मत्स्य टेडर प्रक्रिया पूर्ण झाली नाही. त्यामुळे गेल्या काही वर्षापासून मत्स्यबीज केंद्र असल्यामुळे रोजगार निर्मिती ठप्प असून, शासनाचा महसूल बुडत आहे. यासाठी मस्यबीज केंद्र सुरू करणे आवश्यक आहे.

विश्नामगृहाची कायस दुरावस्था धरण पाहाण्यासाठी येणारे पयंटक तसेच अधिकारी व कर्मचाऱयांना सेवा देण्यासाठी निमगाव गांग्डा येथे विश्रामगृह उभारलेले आहे. मात्र, संबधित विभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे दुरस्ती व डागडुजीकडे दुलंदष झाल्यामुळे विश्रामगृहाची अवस्था विकट झाली आहे. येथे कावमस्वरूपी कमचारी नेमणे गरजेचे आहे.

अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या कमी शासनाच्या उदासीन धोरणामुळे सौना घरण व लाभक्षेत्रात मंजूर कर्मचारी होते, त्यामधील अनेक पदे रिक्त आहेत. एकूण पाच शाखाकरिता एकच शाखाधिकारी असल्याने वरिख्ंनी यामध्ये लक्ष घालून सहाव्यक अभियंता, कालवा निक्षक, दप्तर कारकुन, क्ला, चौकीवर, हौ पदे भरणे आवश्वक आहे. पदे रिक्त असल्याने त्याचा परिणाम कापावर होतो. हा प्रश्‍न आवर्तन कालावधीत प्रकर्षाने जाणवतो,

धरणाचे खोलीकरण गरजेचे अहमदनगर मराठवाडा येथील शेतकरी व आम जनतेची तहान भागविण्यासाठी उपयुक्त ठरलेल्या सीना धरणाचे काम १९८५ मध्ये पूर्ण झाले आहे. तेव्हापासून सौना परणाच्या पाणलोट क्षेत्र झालेल्या पावसाने पाणी वाहत येते तसेच मातीही मोठा प्रमाणावर माती यामुळे धरणाची पाणी साठवणक्षमता कमी झाली आहे. यासाठी गाळ, माती गरजेचे आहे यासाठी नियोजन होणे गरजेचे आहे.

धरणाची उंची वाढविण्याचा प्रस्ताव धूळखात कर्जत, आष्टी, गोरा, अहमदनगर या तालुक्यातील शेती व जनतेल वरदान ठरलेल्या सीना धरणाची उंची अनेक मागणी झाली या विषावर राजकारण झाले, वे घेण्याचा प्रयत्न झाला. उंची वाढविण्यासाठी तयार करण्यात आलेला प्रस्ताव शासन दरबारी आहे पण त्याने पुढे काऊक नाही, याकडे लक्ष देऊन धरणाची उंची वाढविणे गरजेचे आहे. हा प्रस्ताव शासनदरबारी खात पडून आहे.

धरणाची सुरक्षा राम भरोसे घरणावर सुरक्षा व सुशोभिकरणासाठी मोठवा प्रमाणावर विद्युत खांब उभे करण्यात आले आहेत. मात्र, त्यांची दुरावस्था झाली आहे, एकही दिवा चालू नाही, एवढ्या मोठ्या प्रकल्पाची किरकोळ देखभालीमुळे दुरावस्था झाली आहे.

सध्याची धरणामधील पाण्याची परिस्थिती सीना घरण – दि.२२/८/२०२३, पाणी पातळो : ५७८.१५ (मी.), एकूण साठा : १८.४८२८ (द.ल.च.मि.), एकूण साठा : ६५२.७२ (द.ल. फु.), उपयुक्त साठा : २.८३३० (द.ल.घ.मि.), उपयुक्त साठा : १००.०५ (ढल.घ.फु.), उपयुक्त टक्‍के : ५.४१ %, एकूण टक्केवारी : २७.१९ ५, आजचा पाऊस : ०० (मि.मी), एकूण पाऊस : २२५.०० (मि.मी.)