Ahmednagar News : मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करा अन्यथा मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात मोकाट कुत्रे !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : राहाता शहरात मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला असून छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुलासह शहरातील बाजारपेठेत रस्त्यांवर गल्लीबोळात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे,

परिणामी विद्यार्थी, वयोवृद्ध नागरिक, महिलांना रस्त्यावरून चालताना जीव मुठीत धरून चालावे लागते. यामध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांचे प्रमाणसुद्धा मोठ्या संख्येने असून कुत्र्यांनी अनेक विद्यार्थी व नागरिकांना चावा घेतला आहे.

याबाबत नगर परिषदेच्या आरोग्य विभागाला सांगितल्यानंतर कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याऐवजी आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी याकडे दुर्लक्ष करून नागरिकांच्या जीवाशी खेळत आहेत.

कार्यवाही न केल्यास नगरपरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये कुत्रे आणून सोडण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष विजय मोगले यांनी दिला आहे.

याबाबत पत्रकात मोगले यांनी सांगितले, की नगरपरिषद प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करून शहर मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांपासून मुक्त करावे. या मोकाट कुत्र्यांमुळे छोटे-मोठे अपघात होत असून व्यापाऱ्यांना व नागरिकांना मोठ्‌या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

राहाता बाजार तळ ग्रामदैवत वीरभद्र मंदिरासमोरील प्रांगण नगरपालिकेचे व्यापारी संकूल तसेच नगर मनमाड राज्य महामार्ग, शहरातील अंतर्गत रस्ते व गल्लीबोळात कुत्र्यांचे घोळकेच्या घोळके बघायला मिळतात.

त्यामुळे राहाता शहरवासीय मोकाट कुत्र्यांना वैतागले असून या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी नवनिर्माण सेनेच्या वतीने विजय मोगले व इतर पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

जर मागणी पूर्ण केली नाही तर नगरपरिषद कार्यालयात मोकाट कुत्रे आणून सोडण्याचा इशारा दिला आहे. मोगले यांच्यासह मनसेचे उपतालुकाध्यक्ष सुधाकर वाघमारे, उपशहराध्यक्ष प्रसाद महाले, दीपक पचार, विजय सोमवंशी, हरून शेख आदी पद‌धिका-यांच्या वतीने हा इशारा नगरपरिषद प्रशासनाला देण्यात यल्ला आहे.

मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यानी अनेक शालेय विद्याथ्यांना व नागरिकांना धावा घेऊन जखमी केले आहे, पिसाळलेले कुत्रे अचानक घरात येत असल्याने महिला भीतीच्या सावटाखाली आहेत.

नगरपरिषदेच्या आरोग्य विभागाच्या अधिका-यांशी कुत्र्यांवर कारवाई करण्याबाबत संपर्क साधल्यानंतर त्यांच्याकडून फक्त आश्वासन मिळते, मात्र प्रत्यक्षात त्यासंबंधी कारवाई अथवा कृती केली जात नाही.

आरोग्य विभागाला सूचना देऊन मुख्याधिकान्यांनी यामध्ये तातडीने लक्ष घालावे व नागरिकांच्या जीविताच्या रक्षणाच्या दृष्टीने मोकाट व पिसाळलेल्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा. सुनौल भिकाजी गायकवाड, नागरिक, राहाता

ग्रामीण भागात बिबट्‌याने तर शहरी भागात पिसाळलेल्या व मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. नागरिकांना जीव मुठीत घरून चालावे लागत आहे. ही परिस्थिती बदलण्याकरीता प्रशासनाने योग्य त्या उपाययोजना करून ग्रामीण भागात बिबट्‌यांपासून तर शहरी भागात कुत्र्यांपासून नागरिकांना सुरक्षितता प्रदान करावी, -सुधाकर वाघमारे, मनसे उपतालुका प्रमुख