Ahmednagar Good News : अहमदनगर जिल्ह्यातील विडी कामगाराचा मुलगा बनला मंत्रालयात अधिकारी !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Good News : अकोले तालुक्यातील कोतूळ येथील अशोक शेळके व विडी कामगार शांता शेळके यांचे सुपुत्र संतोष शेळके याने एमपीएससी परीक्षेत महाराष्ट्रात १८वा क्रमांक मिळवून तो मंत्रालयीन सहाय्यक कक्ष अधिकारी बनला आहे.

सन २०११ मधील १०वीच्या केंद्र परीक्षेत त्याने कोतूळ केंद्रात प्रथम क्रमांक मिळवून आपली पात्रता दाखवून दिली. त्याचे शिक्षण संगमनेर येथे झाले. त्यानंतर नाशिक येथे प्रथम क्रमांक मिळवून तो मेकॅनिकल इंजिनियर झाला.

त्यानंतर स्पर्धा परीक्षेसाठी त्याने पुणे गाठले. आई विडी कामगार व वडील पेंटर असल्याने घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. ही जाणीव मनात ठेवून त्याने आपले प्रयत्न चालूच ठेवले. अखे त्याला अपेक्षित यश मिळाले व तो आज मंत्रालयीन कक्ष अधिकारी बनला आहे.

त्याचा हा खडतर प्रवास आजच्या तरुणांना प्रेरणा देणारा आहे. निवडलेल्या विषयावर पूर्ण लक्ष केंद्रित करून अभ्यास केल्यास यशाचा मार्ग निश्चितच मिळेल, तर पालकांनीही मुलांना योग्य मार्गदर्शन केले तर तो या खडतर प्रवासात यशस्वी होईल, असे त्याने म्हटले आहे.

या संपूर्ण यशामागे वडिलांनंतर आईचा मोठा वाटा आहे. त्याच्या निवडीचे वृत्त समजताच त्याच्या मित्रांनी फटाके व गुलालाची उधळण करून आनंदोत्सव साजरा केला.