वाहनाच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : अज्ञात वाहनाने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत मोटारसायकलवरील युवकाचा गंभीर जखमी होऊन जागीच मृत्यू झाल्याची घटना नगर जामखेड रोड वर चिचोंडी पाटील गावाजवळ असलेल्या

सांडवे फाट्यावर सोमवारी (दि. २५) पहाटे १.१० च्या सुमारास घडली. प्रतिक प्रशांत खांदवे (वय २२, रा. सांडवे, ता.नगर) असे या मयत युवकाचे नाव आहे.

मयत प्रतिक हा जामखेड रोडने गावाकडे जात असताना सांडवे फाटा येथे भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने त्याच्या मोटारसायकलला धडक दिली. त्यात तो गंभीर जखमी झाला.

त्याला त्याचे मामा दिनेश गांगर्डे यांनी रुग्णवाहिकेतून उपचारासाठी नगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला उपचारापूर्वीच मयत घोषित केले. या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली असून

नातेवाईकांच्या फिर्यादीनंतर अपघाताचा गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मयत प्रतिक याच्या पश्चात आई आणि एक बहिण असा परिवार आहे.