महिलांसाठी मोठा प्रोजेक्ट आणणारः आमदार शिंदे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : मी १५ वर्षांपासून आमदार आहे. मंत्री झालो. माझ्या अनेकदा सभा झाल्या पण कधीच आजच्या एवढ्या महिला माझ्या सभेला जमल्या नाहीत. पण गेल्या वर्षी व यावर्षी नान्नजमध्ये प्रचंड संख्येने महिला जमल्या आहेत.

आज झालेली प्रचंड गर्दी ही मनिषाताईंची किमया आहे. मनिषाताईंनी भाषण करताना सांगितलं की, आम्ही तुम्हाला काहीच मागणार नाही. पण मी तुम्हाला विश्वास देतो की, फक्त महिलांसाठीच या कर्जत जामखेडमध्ये असा प्रोजेक्ट आणेन की,

संपूर्ण कर्जत-जामखेडमधील महिलांना मानाचं स्थान त्याच्यामधून मिळाल्याशिवाय राहणार नाही, असे सांगत आमदार राम शिंदे यांनी महिलांसाठी मतदारसंघात मोठा प्रोजेक्ट आणणार असल्याचा संकल्प नववर्षाच्या प्रारंभी केला.

आमदार प्रा. राम शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सावित्रीबाई फुले प्रभाग संघाच्या वतीने १८ ग्राम संघांना २ कोटी ११ लाख रूपयांचे आमदार शिंदे व त्यांच्या पत्नी माजी सभापती आशाताई शिंदे यांच्या हस्ते कर्ज वाटप करण्यात आले.

सावित्रीबाई फुले प्रभाग संघाच्या सीपीसी मनिषाताई मोहळकर यांच्या पुढाकारातून व जालिंदर चव्हाण यांच्या विशेष सहकार्यातून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी पार पडलेल्या कार्यक्रमात बचत गटातील महिला सदस्यांच्या शेकडो लहान मुला-मुलींची आरोग्य तपासणी व आहार मार्गदर्शन करण्यात आले. त्याबरोबर महिला बचत गटांसाठी असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली.

तसेच ज्योती क्रांती मल्टिस्टेट बँक योजना मार्गदर्शन त्याचबरोबर कांदा उद्योग प्रक्रिया मार्गदर्शन करण्यात आले. माजी सभापती आशाताई राम शिंदे यांनी उपस्थित महिलांशी दिलखुलास संवाद साधला. त्यांनी उपस्थित महिलांची मने जिंकली.

पुढे बोलताना आ.शिंदे म्हणाले की, ज्या दिवशी माझ्या हातात सत्ता येईल त्या दिवशी मी महिलांच्या संदर्भामध्ये कर्जत जामखेडमध्ये निर्णय घेतल्याशिवाय राहणार आहे. मी जलसंधारण मंत्री होतो तेव्हा मतदारसंघात जलयुक्त शिवार योजना राबवली.

त्यामुळे मतदारसंघात कुठेही गेल्या पाच वर्षांत टँकर लागला नाही. महिलांच्या डोक्यावरचा हंडा उतरला. आता गावोगावी जलजीवन योजनेचे काम सुरू आहे. लवकरच या योजनेतून घरोघरी शुध्द पाण्याचा पुरवठा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणामुळे महिला बचत गटांच्या आर्थिक सक्षमीकरणात झपाट्याने वाढ होत आहे.

यावेळी जामखेड पंचायत समितीच्या माजी सभापती आशाताई शिंदे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, तालुका कृषि अधिकारी राजेंद्र सुपेकर, रमेश धोत्रे, हरीबा चांदगावे, प्रभागसंघाच्या अध्यक्ष रेणुका बोराटे, सचिव सारिका भोसले, अर्चना निगडे, दिपाली बांदल,

पुजा सुतार, छाया कापसे, मालन कचरे, शुभांगी वाघमारे, रूक्साना शेख, भाजपा तालुकाध्यक्ष अजय काशिद, सभापती शरद कार्ले, डॉ. भगवान मुरुमकर, ज्योती क्रांती बँकेचे चेअरमन अजिनाथ हजारे, भाजपचे तालुका उपाध्यक्ष बापुराव ढवळे, सरपंच सुशिल आव्हाड,

संचालक पांडुरंग उबाळे, सरपंच लहू शिंदे, प्रशांत शिंदे, सुनिल हजारे, नगरसेवक अमित चिंतामणी, सोमनाथ पाचरणे, संचालक डॉ. गणेश जगताप, माजी सभापती तुषार पवार, युवा नेते उदय पवार, नगरसेवक बिभीषण धनवडे,

सरपंच सुशिल आव्हाड आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनिषाताई मोहळकर यांनी केले तर सूत्रसंचालन निकम महाराज यांनी केले.