Ahmednagar News : ग्रामीण भागातील प्रश्न सोडविण्याचे काम : आमदार मोनिकाताई राजळे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुचनेनुसार घर चलो अभियान आपण यापूर्वीच राबविले आहे. जलजीवन मिशन, पंतप्रधान किसान सन्मान योजना, घरकुल, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, रस्ते विकास योजना, जिल्हा नियोजन समिती, पंचवीस पंधरा,

अशा विविध योजनांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रश्न सोडविण्याचे काम राज्य व केंद्र सरकार करीत आहे. पक्ष संघटना व सरकार यांच्यामधील दुवा म्हणून कार्यकत्यांनी सरल अॅपचे काम प्रभावीपणे करावे, असे आवाहन आमदार मोनिकाताई राजळे यांनी केले.

वडगाव ते वाघेश्वरीवस्ती रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आमदार राजळे यांच्या हस्ते करण्यात आले, या वेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माणिकराव खेडकर होते.

या वेळी शुभमभैय्या गाडे, सरपंच आदिनाथ बड़े, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता वंसतराव बडे, विजय मिसाळ, शिवाजी महाराज बड़े, प्रशांत मंडलेचा, बाळासाहेब नागरगोजे, धनंजय बडे, शिवसेना (ठाकरे) तालुकाप्रमुख भगवान दराडे,

शामराव गरड, परमेश्वर गरड, राजेंद्र शेळके, कांतापाटील गरड, भास्कर गरड, एन.टी. खेडकरनाना साहेब गाडे, शेषराव ढाकणे, भानुदास बड़े, पोपट बडे, अबांदास कंठाळे, दिलीप गरड, सुभाष खंडागळे, कालिदास दहीफळे उपस्थित होते.

या वेळी बोलताना राजळे म्हणाल्या, पक्षसंघटनेचे सरल ॲप डाऊनलोड करून पंतप्रधान नेरंद्र मोदींना पाठिंबा देण्याचे काम सुरु आहे. तुम्ही अॅपमधे माहीती भरण्यास सुरुवात केल्यानंतर ओटीपी येतो तो दिल्याने कोणाचेही पैसे कट होत नाहीत.

येथील वाघेश्वरी वस्तीचा रस्ता व पुलाचे काम दर्जेदार करुन घेण्याची जबाबदारी ग्रामस्थांची आहे. रस्ता तयार होण्यापूर्वी पाईपलाईनची कामे करून घ्या. नंतर रस्ता खोदून नुकसान होणार नाही, याची काळजी घ्या. प्रास्ताविक शामराव गरड यांनी केले. सूत्रसंचालन आदिनाथ साहेबराव बडे यांनी केले. आजिनाथ विश्वनाथ बड़े यांनी आभार मानले.