Best Budget Compact SUV : पैसावसूल कार ! 9 लाखांत खरेदी करा गरीबांची रेंज रोव्हर, मिळेल 80 लाखाच्या कारचा आनंद…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Best Budget Compact SUV : भारतीय बाजारात लाखांपासून ते करोडांपर्यंत अशा खूप कमी व जास्त किंमतीच्या कार आहेत. यानुसार लोक स्वतःला परवडेल अशी कार खरेदी करत असतात.

मात्र काही वेळा लोकांना मोठी कार खरेदी करायची असते मात्र कमी बजेटमुळे ते शक्य नसते. अशा वेळी जर तुम्हीही कमी बाजेमध्ये जर उत्तम कार खरेदीचे प्लॅनिंग करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी एक जबरदस्त कार आणली आहे ज्याची किंमत 9 लाख रुपये आहे.

दरम्यान लोकांना मोठ्या कॉम्पॅक्ट एसयूव्हीचे वेड लागले आहे. कारण या कारमध्ये असणारे फीचर्स आणि स्पेस हा अधिक आहे. जवळपास प्रत्येक कंपनी या सेगमेंटमध्ये आपली कार ऑफर करते, परंतु एक अशी कार आहे ज्याने विक्रीचे सर्व रेकॉर्ड मोडले आहेत आणि मोठ्या कंपन्यांची वाहने तिच्यासमोर अपयशी ठरत आहेत.

या कारला जर तुम्ही गरिबांची रेंज रोव्हर बोलला तरीही काही हरखत नाही. कारण या 9 लाखात येणा-या कारमध्ये बसून तुम्हाला 80 लाखांच्या कारचा अनुभव येईल. जे तुमच्यासाठी खूप आनंददायी आहे.

जर तुम्हाला या कारचे नाव जाणून घेयचे असेल तर तर आम्ही सांगतो की ही मारुती सुझुकी ब्रेझा कार आहे. ब्रेझा फेसलिफ्ट भारतीय बाजारात लॉन्च केली होती. या SUV ला ग्राहकांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.

ब्रेझा लॉन्च झाल्यापासून अवघ्या 2 महिन्यांतच 1 लाखांहून अधिक युनिट्सचे बुकिंग झाले. त्याच वेळी, या वर्षी देखील कंपनीला Brezza साठी हजारो बुकिंग मिळाले आहेत. कंपनी दर महिन्याला या SUV च्या 12,000-13,000 युनिट्सची विक्री करत आहे.

ब्रेझा कार लोकप्रिय का आहे?

मारुती सुझुकी कॉम्पॅक्ट एसयूव्ही सेगमेंटमध्ये फक्त ब्रेझा गी कार विकत आहे. गेल्या वर्षी लॉन्च झालेल्या ब्रेझा फेसलिफ्टचे डिझाइन लोकांना खूप आवडते. यासोबतच या कारचे उत्तम मायलेज, पॉवर आणि परफॉर्मन्सही लोकांची मने जिंकत आहेत.

बर्‍याच लोकांचा असा विश्वास आहे की ब्रेझा कमी किमतीत रेंज रोव्हर एसयूव्हीचा अनुभव देते. पाहिले तर कारच्या मागील भागाची रचना रेंज रोव्हरसारखीच दिसते जी या कारची कॉपी वाटते.

ब्रेझाचे मायलेज

ब्रेझ्झाच्या उत्कृष्ट मायलेजमुळे लोकही याला पसंती देत ​​आहेत. ही त्याच्या विभागातील सर्वात इंधन कार्यक्षम कार आहे. पेट्रोल इंजिनमध्ये Brezza चे मायलेज 20.15 kmpl आहे, तर CNG मध्ये ही कार 25.51 km/kg मायलेज देण्यास सक्षम आहे. त्याच्या विभागातील ही एकमेव SUV आहे जी चांगल्या इंधन कार्यक्षमतेसाठी सौम्य हायब्रिड तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.

इंजिन आणि शक्ती

इंजिनबद्दल बोलायचे झाले तर यात 1.5-लिटर K15C DualJet पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. कंपनी Ertiga आणि XL6 सारख्या कारमध्ये देखील हे इंजिन वापरत आहे. हे इंजिन 101hp पॉवर आणि 136Nm टॉर्क जनरेट करते.

तसेच सीएनजी मोडमध्ये, इंजिन 88hp आणि 121.5Nm टॉर्क देते. पेट्रोल मॉडेल्सना 5-स्पीड मॅन्युअल आणि 6-स्पीड ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्याय मिळतो तर CNG ला फक्त मॅन्युअल ट्रान्समिशन मिळते.

कारची किंमत किती आहे?

कंपनी 5-सीटर कॉन्फिगरेशनमध्ये मारुती ब्रेझा ऑफर करते. याला 328 लीटरची बूट स्पेस मिळते. New Generation Maruti Brezza ची किंमत रु. 8.19 लाख ते रु. 14.04 लाख (एक्स-शोरूम) पासून सुरू होते. तुम्ही ते 6 मोनोटोन आणि 3 ड्युअल टोन कलर पर्यायांमध्ये खरेदी करू शकता.