Discount Offer: सणासुदीच्या कालावधीत खरेदी करा मारुती ब्रेझा आणि मिळवा बंपर डिस्काउंट! वाचा किती होईल फायदा?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Discount Offer:- सध्या आगामी काही दिवसांमध्ये दसरा आणि दिवाळी हे महत्त्वाचे सण येऊ घातल्यामुळे या कालावधीमध्ये अनेकजण दुचाकी तसेच चारचाकी खरेदी करतात. याच अनुषंगाने या कालावधीमध्ये खरेदी वाढावी याकरिता कंपन्यांकडून देखील वेगवेगळ्या प्रकारच्या योजना ग्राहकांना आकर्षित करण्याकरिता सादर केल्या जातात.

या अनुषंगाने जर आपण कार निर्मिती क्षेत्रातील मारुती सुझुकी या कंपनीचा विचार केला तर ही कंपनी संपूर्ण देशामध्ये कारचे चांगले मॉडेल्स देण्यासाठी सक्षम आहे व गेल्या कित्येक वर्षापासून मारुतीच्या गाड्यांना देशभरातील ग्राहकांकडून देखील पसंती दिली जाते.

मारुती सुझुकीने अनेक वेगवेगळे मॉडेल्स बाजारामध्ये आणलेली असून येऊ घातलेल्या या सणासुदीच्या कालावधीमध्ये मारुती सुझुकी कडून मारुतीची ब्रेझा ही कार खरेदी करण्यासाठी एक चांगली संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. म्हणजेच मारुती सुझुकी कंपनीकडून या कारच्या खरेदीवर बंपर असा डिस्काउंट देण्यात येणार आहे. त्यामुळे नेमका हा डिस्काउंट किती असेल? ग्राहकांना याचा नेमका फायदा काय होईल? इत्यादी बद्दलची महत्त्वाची माहिती आपण घेणार आहोत.

 सणासुदीच्या कालावधीत मारुती ब्रेझा कार घेण्याची सुवर्णसंधी

मारुती सुझुकी ही कार निर्मिती क्षेत्रातील एक अग्रगण्य कंपनी असून या कंपनीच्या अनेक कार मॉडेल पैकी मारुती ब्रीझा एक ग्राहकांच्या पसंतीस उतरलेले व सर्वाधिक विक्री होणारी कार असून या कारच्या खरेदीवर या सणासुदीच्या कालावधीमध्ये तब्बल 45 हजार रुपयांपर्यंतची डिस्काउंट ऑफर देण्यात आलेली आहे.

महत्वाचे म्हणजे कंपनीकडून देण्यात येणार असलेला हा डिस्काउंट मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशन या दोघांवर उपलब्ध आहे. मारुती सुझुकी कंपनीकडून सीएनजी कारवर देखील वीस हजाराची सूट देणार आहे. सप्टेंबर मध्ये सर्वाधिक विक्री झालेली एसयूव्हीची सुरुवातीची किंमत आठ लाख 29 हजार रुपये आहे.

 काय आहेत मारुती ब्रेझा कारचे वैशिष्ट्ये?

जर आपण आता नवीन पिढीतील म्हणजेच नवीन जनरेशन ब्रेझा कारचा विचार केला तर यामध्ये के सिरीज 1.5- ड्युअल जेट डब्ल्यूटी इंजिन आहे व हे स्मार्ट हायब्रीड तंत्रज्ञानाचे समर्थन करते. हे इंजिन सहा स्पीड ट्रान्समिशन सोबत जोडलेले असून ते 103hp पावर आणि 137Nm टॉर्क जनरेट करते. त्यामुळे आता या कारची इंधन क्षमता देखील वाढली आहे.

जर या कारचे मायलेज पाहिले तर न्यू ब्रिजाचे मॅन्युअल व्हेरीयंट 20.15kp/l चे मायलेज देते व ऑटोमॅटिक व्हेरियंट 19.80kp/l चे मायलेज देते. जर सीएनजी व्हेरिएंटचा विचार केला तर तिचे मायलेज २५.५१ किमी प्रति किलो इतके आहे. मारुती ब्रेझा ही चार व्हेरियंटमध्ये येते व हे व्हेरिएंट म्हणजे LXi,VXi, ZXi आणि ZXi+ हे होय. तसेच महत्त्वाचे म्हणजे मारुती ब्रेझामध्ये 360 डिग्री कॅमेरा असून तो अतिशय उच्च टेक्नॉलॉजीचा आणि मल्टी इन्फॉर्मेशन असलेल्या कॅमेरा आहे.

दुसरे महत्त्वाचे म्हणजे या कारमध्ये नवीन स्मार्ट प्ले प्रोप्लस टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम देखील देण्यात आली आहे. या कॅमेरामुळे तुम्ही जेव्हा कारमध्ये बसलेले असतात तेव्हा तुम्हाला तुमच्या कारच्या सभोवतालचे दृश्य आतबसून स्क्रीन मध्ये पाहता येते.

दुसरे महत्त्वाचे म्हणजे यामध्ये क्रूज कंट्रोल, कनेक्टेड कार टेक, इलेक्ट्रिक सनरूफ तसेच आऊट ऑफ क्लायमेट कंट्रोल, रियर एसी व्हेंट्स, 7.0 इंच इन्फोटेनमेंट युनिट, अँड्रॉइड ऑटो कनेक्टिव्हिटी, ड्युअल एअर बॅग, इएसपी अर्थात इलेक्ट्रॉनिक्स स्टॅबिलिटी प्रोग्राम, रिवर्स कॅमेरा व रिव्हर्स पार्किंग सेंन्सर इत्यादी वैशिष्ट्ये देखील समाविष्ट करण्यात आलेली आहेत.

त्यामुळे या बंपर डिस्काउंट सोबत तुम्हाला जर कार घ्यायची असेल तर तुम्ही या सणासुदीच्या कालावधीत मारुती ब्रेझाचा विचार करू शकता.