आनंदाची बातमी ! टाटा लॉन्च करणार Nexon CNG ! ट्विन-सिलेंडर, बूट स्पेस सगळंच भारी…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

2024 मध्ये तुम्हालाही कार खरेदी करायची आहे का ? मग आजची ही बातमी तुमच्यासाठीच आहे. विशेषता ज्यांना सीएनजी कार खरेदी करायची असेल अशांसाठी ही बातमी अधिक महत्त्वाची आणि कामाची राहणार आहे.

कारण की, देशातील एक लोकप्रिय ऑटो कंपनी लवकरच सीएनजी कार लॉन्च करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, टाटा कंपनी लवकरच आपल्या लोकप्रिय SUV कारचे CNG मॉडेल बाजारात उतरवणार आहे.

खरेतर, भारत मोबिलिटी ग्लोबल एक्सपो उद्या अर्थातच एक फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. याच एक्सपोमध्ये टाटा मोटर्स आपल्या लोकप्रिय कारचे सीएनजी मॉडेल सादर करणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या एक्सपो मध्ये टाटा मोटर्स Nexon या लोकप्रिय कारचे सीएनजी मॉडेल सादर करणार आहे. Nexon iCNG मॉडेल या एक्सपोमध्ये सादर करण्याचा निर्णय कंपनीने घेतला असल्याचे बोलले जात आहे.

याचाच अर्थ ही गाडी अधिकृतरित्या विक्रीसाठी लवकरच लॉन्च होण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वीच, टाटा मोटर्सने आपल्या सीएनजी कारसाठी ट्विन-सिलेंडर तंत्रज्ञान सादर केले होते, ज्यामध्ये बूट स्पेस सुरक्षित ठेवण्यासाठी कंपनीने खाली दोन छोटे सिलिंडर बसवले आहेत.

हे तंत्रज्ञान आल्याने टाटाच्या सीएनजी कारमध्ये इतर कंपन्यांच्या सीएनजी कारच्या तुलनेत अधिक बूट स्पेस मिळणार आहे. कंपनीला आशा आहे की, त्याच्या आगमनामुळे त्यांच्या सीएनजी कारच्या विक्रीत वाढ होईल.

जर आपण टाटा मोटर्सच्या सीएनजी कार पोर्टफोलिओबद्दल बोललो, तर टाटा मोटर्सकडे भारतीय बाजारपेठेत एकूण 4 सीएनजी कार उपलब्ध आहेत, ज्यामध्ये नुकत्याच लाँच झालेल्या पंच सीएनजीचाही समावेश आहे.

टाटाकडे टियागो सीएनजी, टिगोर सीएनजी, पंच सीएनजी आणि अल्ट्रोज सीएनजी कार उपलब्ध आहेत. जर कंपनीने Tata Nexon SUV चे CNG प्रकार लॉन्च केले तर कंपनीच्या CNG कार पोर्टफोलिओमध्ये 5 कार होणार आहेत. यामुळे कंपनीचा पोर्टफोलिओ आणखी मजबूत होणार आहे.