Jio चा ‘हा’ स्वस्त प्लॅन ग्राहकांसाठी ठरणार फायदेशीर ! अनलिमिटेड कॉलिंगसह मिळणार 75 जीबी डेटा, पहा….

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Jio Recharge Plan : रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. यानंतर एअरटेल या टेलिकॉम कंपनीचा नंबर लागतो. दरम्यान या दोन्ही कंपन्यांमध्ये सध्या मोठे कॉम्पिटिशन पाहायला मिळत आहे. एकीकडे रिलायन्स जिओचे ग्राहक संख्या दिवसेंदिवस विस्तारत आहे तर दुसरीकडे एअरटेलची ग्राहक संख्या देखील गेल्या काही महिन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात विस्तारलेली आहे.

यामुळे ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी जिओ आणि एअरटेल कडून वेगवेगळ्या स्वस्त रिचार्ज प्लॅनची घोषणा केली जात आहे. दरम्यान जर तुम्हीही जिओचे कस्टमर असाल आणि तुमचा रिचार्ज संपत आला असेल आणि नवीन रिचार्जच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खास राहणार आहे.

कारण की आज आपण जिओचा स्वस्त रिचार्ज प्लॅन थोडक्यात जाणून घेणार आहोत. आज आपण जिओचे दोन असे प्लॅन जाणून घेणार आहोत ज्यांची किंमत 350 रुपयांपेक्षा कमी आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या दोन्ही प्लॅन विषयी सविस्तर.

299 चा प्रीपेड प्लॅन : तुम्हीही नेहमी प्रीपेड प्लॅन रिचार्ज करता का? मग जिओचा हा प्रीपेड प्लॅन तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. हा कंपनीचा सर्वात ट्रेंडिंग रिचार्ज प्लॅन आहे असे जरी म्हटले तरी वावगे ठरणार नाही.

कारण की या प्लॅनने रिचार्ज करणाऱ्यांची संख्या खूपच मोठी आहे. जर तुम्ही या प्लॅनने रिचार्ज केला तर तुम्हाला वेगवेगळे बेनिफिट मिळणार आहेत.

या प्लॅनमध्ये ग्राहकांना 56 जीबी डेटा मिळतो. प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे अर्थातच एका दिवसाला दोन जीबी इंटरनेट डेटा ग्राहकांना मिळतो.

याशिवाय ग्राहकांना डेली 100 एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग ची देखील सुविधा या प्लॅनमध्ये उपलब्ध आहे. विशेष बाब अशी की आपल्या सोबत जिओ टीव्ही, जिओ सिनेमा आणि जिओ क्लाउडचे सबस्क्रीप्शन देखील मिळते.

349 चा प्लॅन : जिओचा 349 रुपयांचा हा प्लॅन तुमच्यासाठी खूपच फायदेशीर ठरू शकतो. या प्लॅनची व्हॅलिडीटी 30 दिवसांची असते.

यामध्ये ग्राहकांना डेली अडीच जीबी डेटा मिळतो म्हणजेच संपूर्ण प्लॅनमध्ये ग्राहकांना 75 जीबी डेटा वापरायला मिळतो.

सोबतच दिवसाला शंभर एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंग चा देखील बेनिफिट या प्लॅन सोबत ग्राहकांना दिला जात आहे. यात Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud चे सबस्क्रिप्शन देखील ग्राहकांना दिले जात आहे.