Kubota L3408 Tractor: 35 एचपी श्रेणीतील ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर कुबोटाचा ‘हा’ ट्रॅक्टर ठरेल फायद्याचा! वाचा किंमत आणि वैशिष्ट्ये

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Kubota L3408 Tractor:- भारतामध्ये अनेक महत्त्वाच्या अशा ट्रॅक्टर कंपन्या असून यामध्ये कुबोटा ट्रॅक्टर कंपनी ही नवीन तंत्रज्ञानासह अनेक शक्तिशाली ट्रॅक्टर निर्माण करण्याच्या बाबतीत खूप महत्त्वाची अशी कंपनी आहे. शेतीच्या कामासाठी कुबोटा कंपनीचे ट्रॅक्टर हे शेती कामासाठी खूपच उत्तम असे आहेत.

जर तुम्ही शेतकरी असाल तर शेती आणि व्यवसाय कामासाठी तुम्हाला जर एखादा पॉवरफुल ट्रॅक्टर खरेदी करायचा असेल तर तुम्ही कुबोटाच्या L3408 ट्रॅक्टर तुमच्यासाठी एक उत्तम असे ट्रॅक्टर राहील. यास ट्रॅक्टर विषयी माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

 कुबोटा L3408 ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये

या ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला 1647cc क्षमतेचे तीन सिलेंडर मध्ये लिक्विड कुल्ड इंजिन देण्यात आले असून ते 34 एचपी ची शक्ती निर्माण करते. हा कुबोटा ट्रॅक्टर ड्राय एअर क्लिनर एअर फिल्टर सहित येतो. कंपनीच्या या ट्रॅक्टरची कमाल पिटीओ पावर 30 एचपी असून त्याचे इंजिन 2700  आरपीएम जनरेट करते.

हा ट्रॅक्टर 34 लिटर इंधन क्षमता असलेल्या टाकीसह येतो. ट्रॅक्टरची लोडिंग म्हणजेच हायड्रोलिक पावर पाहिली तर ती 906 किलो इतकी ठेवण्यात आली असून याचे एकूण वजन 1380 किलो आहे. या ट्रॅक्टरचा ग्राउंड क्लिअरन्स 350mm ठेवण्यात आला आहे. या ट्रॅक्टर मध्ये तुम्हाला इंटिग्रल पावर स्टेरिंग पाहायला मिळते तसेच हा ट्रॅक्टर आठ फॉरवर्ड व चार रिव्हर्स गिअर्ससह गियरबॉक्स मध्ये येतो

तसेच कुबोटा ट्रॅक्टरचा फॉरवर्ड स्पीड 22.2 किलोमीटर प्रति तास इतका असून या ट्रॅक्टरमध्ये ड्राय टाइप सिंगल स्टेज क्लच देण्यात आला असून तो कॉन्स्टंट मेश प्रकारच्या ट्रान्समिशनसह येतो. या ट्रॅक्टरमध्ये वेट डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत महत्वाचे म्हणजे हा ट्रॅक्टर चार व्हील ड्राईव्ह मध्ये उपलब्ध आहे.

 किती आहे या ट्रॅक्टरची किंमत?

कुबोटा L3408 ट्रॅक्टरची भारतातील एक शोरूम किंमत सात लाख 45 हजार ते सात लाख 48 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. या ट्रॅक्टरची ऑन रोड किंमत आरटीओ नोंदणी आणि तेथे लागू असलेल्या रोड टॅक्समुळे राज्य राज्यांमध्ये बदलू शकते. या किमतीसह या ट्रॅक्टरला पाच वर्षाची वारंटी देण्यात आलेली आहे.