जगातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच ! किंमत साडेतीन लाख रुपयांपेक्षा कमी, सिंगल चार्ज मध्ये धावणार 1200 Km लाँच, पहा डिटेल्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Cheapest Electric Car In India : भारतात गेल्या काही वर्षांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. शासनाने सुद्धा इलेक्ट्रिक वाहनांना चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत. खरंतर, पेट्रोल डिझेलचे वाढणारे दर, डिझेलचलित आणि पेट्रोल चलित वाहनांमुळे वाढणारे प्रदूषण इत्यादी कारणांमुळे आता इलेक्ट्रिक वाहने वापरण्यासाठी केंद्र शासनाकडून नागरिकांना प्रोत्साहित केले जात आहे.

विशेष म्हणजे इलेक्ट्रिक वाहनांना नागरिकांकडून देखील विशेष प्रेम मिळत आहे. याचे कारण म्हणजे इलेक्ट्रिक वाहने सर्वसामान्यांना परवडणारी ठरत आहेत. इलेक्ट्रिक स्कूटर, इलेक्ट्रिक स्पोर्ट बाईक सोबतचं आता इलेक्ट्रिक कार देखील लोकांमध्ये विशेष लोकप्रिय बनत चालली आहे. मात्र इलेक्ट्रिक कार ही डिझेल कार पेक्षा महाग असल्याने अनेक मध्यमवर्गीयांना इच्छा असूनही इलेक्ट्रिक वाहन खरेदी करता येत नसल्याचे वास्तव देखील नाकारून चालणार नाही.

परिणामी आता देशातील काही कंपन्यांनी मध्यमवर्गीय लोकांसाठी स्वस्तात इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकत्याच काही दिवसांपूर्वी टाटाने येत्या काही महिन्यांमध्ये देशातील सर्वाधिक स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च करू असे आश्वासन दिले आहे. येत्या दीड वर्षात टाटा समूह आपली स्वस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे.

आपल्या देशात अजूनही स्वस्त इलेक्ट्रिक कार लाँच झालेली नाही. पण काही कंपन्यांनी स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तर दुसरीकडे चीनमध्ये तेथील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार नुकतीच लॉन्च झाली आहे. या इलेक्ट्रिक कारची किंमत साडेतीन लाखांपेक्षा कमी आहे. ही गाडी केवळ 3.47 लाख रुपयांच्या किमतीवर लॉन्च झाली आहे. ही गाडी एकदा चार्ज केल्यावर 1200 किलोमीटर धावू शकते.

चायना मधील फर्स्ट ऑटो वर्क्स (FAW) यां कंपनीने ही कार लॉन्च केली आहे. ही कंपनी आता तेथील मायक्रो-ईव्ही सेगमेंटमध्ये आपली भागीदारी वाढवण्याची योजना आखत आहे. दरम्यान, कंपनीने बेस्टून ब्रँड अंतर्गत Xiaoma ही छोटी इलेक्ट्रिक कार लॉन्च केली आहे.

ही तेथील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार राहणार आहे. या इलेक्ट्रिक कारची प्री बुकिंग सुद्धा सुरू झाली आहे. Xiaomi स्मॉल इलेक्ट्रिक कारची किंमत 30,000 ते 50,000 युआन म्हणजे (सुमारे 3.47 लाख ते 5.78 लाख रुपये) दरम्यान ठेवण्यात आली आहे.