Best Budget Car : कमी किंमतीत जास्त मायलेजच्या कार शोधताय?, मग वाचा ही बातमी…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Best Budget Car : जर तुम्ही नजीकच्या भविष्यात नवीन कार घेण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला परवडणाऱ्या किंमतीत जास्त मायलेज असलेल्या कारबद्दल सांगणार आहोत.

सध्या भारतातील सर्वात मोठी कार विकणारी कंपनी असलेल्या मारुती सुझुकीच्या गाड्या त्यांच्या स्वस्त किमती आणि जास्त मायलेजसाठी ओळखल्या जातात. मारुती व्यतिरिक्त इतर अनेक कंपन्यांच्या गाड्याही स्वस्त दरात जास्त मायलेज देत आहेत. आज आपण भारतात सर्वाधिक विकल्या जाणाऱ्या 3 कारबद्दल जाणून घेणार आहोत ज्यात ग्राहकांना 25 kmpl पेक्षा जास्त मायलेज मिळते.

Renault Kwid

Renault Kwid च्या मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये ग्राहकांना 21.7 kmpl चे मायलेज मिळते तर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनमध्ये त्यांना 22 kmpl चे मायलेज मिळते. Renault Kwid ची एक्स-शोरूम किंमत 4.69 लाख रुपये आहे.

Maruti Suzuki Alto K10

तुम्हाला परवडणारी किंमत आणि जास्त मायलेज असलेली कार घ्यायची असेल, तर मारुती सुझुकी अल्टो K10 तुमच्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो. मारुती अल्टो K10 आपल्या ग्राहकांना मॅन्युअल ट्रान्समिशनसह 24.39 kmpl आणि ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह 24.90 kmpl मायलेज देते. Maruti Alto K10 ची एक्स-शोरूम किंमत 3.99 लाख रुपये आहे.

Maruti Suzuki S-Presso

अधिक मायलेज शोधणाऱ्यांसाठी मारुती सुझुकी एस-प्रेसो हा एक चांगला पर्याय आहे. Maruti Suzuki S-Presso च्या मॅन्युअल ट्रान्समिशनमध्ये, ग्राहकांना 24.12 kmpl चा मायलेज मिळतो तर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनसह ते 25.30 kmpl मायलेज मिळवते. Maruti Suzuki S-Presso ची सुरुवातीची एक्स-शोरूम किंमत 4.26 लाख रुपये आहे.