iPhone सारखा दिसणारा सेम टू सेम स्मार्टफोन भारतात झाला लाँच

 

अहमदनगर Live24 टीम, 08 मार्च 2022 Maharashtra News :- Realme C35 स्मार्टफोनला भारतात लेटेस्ट C-सीरीज़ अंतर्गत लाँच करण्यात आले आहे. हा फोन iPhone 13 सारखा दिसतो. या फोनला ग्लोइंग ग्रीन आणि ग्लोइंग ब्लॅक कलर ऑप्शन मध्ये आणले आहे.

स्पेसिफिकेशन्स
फोनमध्ये ६.६ इंचाचा FHD+ LCD डिस्प्ले,मागील बाजुस ट्रिपल कॅमेरा आहे. ज्यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी, २ मेगापिक्सलचा मायक्रो लेन्स, VGA B&W पोर्ट्रेट सेंसर आणि ८ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. Realme C35 मध्ये 5000mAh ची बॅटरी, 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि Android 11 OS चा समावेश आहे.

किंमत
भारतात Realme C35 च्या 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज मॉडलची किंमत ११ हजार ९९९ रुपये आणि 4GB/128GB व्हेरियंटची किंमत १२ हजार ९९९ रुपये ठेवण्यात आली आहे.

ई कॉमर्स साईटवर होणार विक्री
हँडसेटला फ्लिपकार्ट आणि रियलमी कंपनीची अधिकृत वेबसाइट वरून विकले जाणार आहे. या फोनचा पहिला सेल १२ मार्च रोजी दुपारी १२ वाजता सुरू होणार आहे. फ्लिपकार्टद्वारे एसबीआय क्रेडिट कार्ड आणि ईएमआय वर फोन खरेदी केल्यास १० टक्के इंस्टेंट सूट दिली जाणार आहे.