Electric Cars : तयार रहा…! टाटा मार्केटमध्ये आणत आहे दोन जबरदस्त इलेक्ट्रिक कार…

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Electric Cars : टाटा मोटर्सने आपल्या उत्कृष्ट उत्पादनांमुळे भारतीय बाजारपेठेत एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशातच टाटा मोटर्स ऑटोमोबाईल क्षेत्रात दिवसेंदिवस आपली छाप सोडताना दिसत आहे. टाटा मोटर्सने मार्केट मध्ये एकापेक्षा एक जबरदस्त वाहने लॉन्च केले आहेत, अशातच आता कंपनीने दोन नवीन मॉडेल लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

सध्या बाजारात इलेक्ट्रिक ऑटो मोबाईलच्या वाढत्या मागणीमुळे टाटा देखील त्याच दिशेने पावलं उचलत आहे. आज आम्ही तुम्हाला अशाच दोन नवीन इलेक्ट्रिक वाहनांची माहिती देणार आहोत. ज्या लवकरच भारतीय बाजारपेठेत लॉन्च केल्या जातील.

टाटा भारतीय बाजारपेठेत दोन नवीन इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठीची तयारी कंपनीने जवळपास पूर्ण केली आहे. या दोन इलेक्ट्रिक कार मॉडेल्सची नावे Tata Harrier आणि Tata Curvv इलेक्ट्रिक कार असे असणार आहे.

या दोन्ही गाड्या आतापर्यंतच्या मार्केटमधील सर्वोत्तम गड्या असतील. या दोन्ही कारची श्रेणी जवळपास समान असणार आहे, जी एका चार्जवर सुमारे 530 किलोमीटर धावेल. डिझायनिंगच्या बाबतीत, दोघांमध्ये थोडा फरक असू शकतो.

टाटा आपल्या ग्राहकांची खूप काळजी घेतो. अशातच या दोन्ही इलेक्ट्रिक कारमध्ये देखील सुरक्षिततेची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. ज्या अंतर्गत तुम्हाला कारमध्ये एकाच वेळी 7 एअरबॅग्स पाहायला मिळतात. जे तुम्हाला प्रत्येक लहान-मोठ्या अपघातापासून वाचवताना दिसेल.

या दोन इलेक्ट्रिक कारची किंमत जवळपास सारखीच असू शकते, पण त्याबद्दलअद्याप माहिती समोर आलेली नाही. अंदाजे या कारची किंमत 20 लाख असण्याची शक्यता आहे.