Tata Nexon CNG : मारुती, ह्युंदाईचे टेन्शन वाढले ! टाटा लॉन्च करणार Nexon CNG कार ! देणार इतके मायलेज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Tata Nexon CNG : टाटा मोटर्सकडून मारुती सुझुकीच्या CNG सेगमेंटला टक्कर देण्यासाठी नवनवीन CNG कार लॉन्च करण्यात येत आहेत. टाटाकडून आता त्यांची सर्वात लोकप्रिय एसयूव्ही Nexon चे CNG मॉडेल यावर्षी भारतात लॉन्च केले जाणार आहे.

टाटा मोटर्सकडून आतापर्यंत त्यांच्या चार CNG कार भारतात लॉन्च केल्या आहेत. त्यांच्या या CNG कारलं ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता टाटा लवकरच त्यांची Nexon iCNG कार लॉन्च करणार आहे.

टाटा Nexon CNG सोबत त्यांच्या आणखी इलेक्ट्रिक आणि पेट्रोल कार भारतात लॉन्च करणार आहे. टाटा मोटर्सकडून भारतीय ऑटो मार्केटमधील पोर्टफोलिओ मजबूत करण्यासाठी जबरदस्त सेफ्टी फीचर्स असलेल्या इलेक्ट्रिक कार लॉन्च करत आहे.

टाटा मोटर्सकडून भारत मोबॅलिटी शो 2024 मध्ये त्यांची Nexon iCNG संकल्पना सादर केली आहे. कंपनीकडून याचवर्षी Nexon iCNG एसयूव्ही कार लॉन्च केली जाणार आहे.

Nexon CNG कारमध्ये ट्विन CNG सिलेंडर पर्याय दिला जाईल. त्यामुळे कारमध्ये जास्त बूट स्पेस देखील मिळेल. Nexon CNG कारमध्ये 230 लीटर बूट स्पेस दिली जाईल.

Nexon CNG इंजिन

टाटा मोटर्सकडून त्यांच्या आगामी Nexon CNG कारमध्ये 1.2 लीटर पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. तसेच कंपनी फिटेड CNG किट कारमध्ये दिले जाणार आहे. कारचे इंजिन 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले असेल.

टाटाकडून अलीकडेच त्यांच्या Tiago आणि Tigor कारमध्ये ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्याय देण्यात आला आहे. टाटाकडून त्यांच्या आगामी Nexon CNG मध्ये देखील AMT गिअरबॉक्स पर्याय दिला जाऊ शकतो. टाटाची Nexon iCNG एसयूव्ही कार 30 Kmpl मायलेज देण्यास सक्षम असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Nexon CNG वैशिष्ट्ये

टाटा मोटर्सकडून Nexon CNG कारमध्ये 7.0-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, 7.0-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील, 6 एअरबॅग, ABS आणि EBD असे फीचर्स दिले जाऊ शकतात.