Gold-Silver Rate Today: इस्रायल-हमास युद्धाचा सोने-चांदी बाजारभावावर परिणाम! सोने चांदीच्या दरात तब्बल इतकी वाढ

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Gold-Silver Rate Today:- सध्या जागतिक पातळीवर इस्राईल आणि हमास यांच्यात युद्धाची परिस्थिती उद्भवल्यामुळे याचे परिणाम हे जागतिक बाजारपेठेवर दिसून येत असून सोने चांदीचे बाजारपेठेवर देखील याचा परिणाम पाहायला मिळत आहे. अनेक प्रकारच्या व्यापारांवर देखील याचा परिणाम होत असून सोने चांदीच्या मार्केटवर देखील याचा परिणाम दिसून येत असून सोन्या-चांदीच्या दरामध्ये वाढ होताना दिसत आहे.

गेल्या शुक्रवारपासून सोने-चांदीच्या दरामध्ये वाढ होताना दिसून येत आहे. जर आपण याबाबत गुड रिटर्न्स नुसार विचार केला तर हमासने शुक्रवारी इजरायल वर हल्ला चढवला होता व त्यानंतर सोने चांदीच्या दरामध्ये मोठी वाढ बघायला मिळाली. सहा ऑक्टोबरला 70 रुपये, शनिवारी 310 रुपये तर आठ ऑक्टोबरला 440 रुपये, नऊ ऑक्टोबरला 220 रुपयांनी किमती वाढल्या होत्या व 10 ऑक्टोबर रोजी किमतींमध्ये 330 रुपयांची वाढ झाली होती.

काल म्हणजेच 11 ऑक्टोबरला किमती जैसे थे होत्या. कालच्या किमती पाहिल्या तर त्या 22 कॅरेट सोन्याचे प्रति दहा ग्राम दर हा 53 हजार 800 तर 24 कॅरेट सोन्याचा दर हा प्रतिदहा ग्राम 58,680 रुपये इतका होता. या दृष्टिकोनातून जर आपण चांदीचा विचार केला तर युद्धानंतर चांदीच्या दरामध्ये देखील तेजी दिसून येत आहे. सात ऑक्टोबरला चांदीने 1500 रुपयांच्या आघाडी घेतली होती तर नऊ ऑक्टोबर रोजी किमती पाचशे रुपयांनी वाढल्या होत्या. 11 ऑक्टोबर रोजी चांदीत पाचशे रुपयांची घसरण झाली.

 आजचे सोन्याचे बाजार भाव( 12 ऑक्टोबर 2023)

यादरम्यान आजचे सोन्याचे बाजार भाव पाहिले तर 24 कॅरेट सोन्याचा प्रति दहा ग्रॅम चा भाव हा 58,530 आहे व 100 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याची किंमत पाहिली तर ती पाच लाख 85 हजार 300 रुपये इतकी आहे. त्यानुसार 24 कॅरेटच्या एक ग्रॅम सोन्याची किंमत 5853 रुपये आहे.

 22 कॅरेट सोने 22 कॅरेट सोन्याचा आजचा प्रति दहा ग्रॅम म्हणजेच प्रति तोळ्याचा दर 53 हजार 650 रुपये इतका आहे. या दरानुसार जर आपण 22 कॅरेटच्या 1g सोन्याचा दर पाहिला तर तो पाच हजार तीनशे पासष्ठ रुपये इतका असून 22 कॅरेटचे आठ ग्रॅम सोने घ्यायचे असेल तर या दरानुसार तुम्हाला 42 हजार 920 रुपये लागणार आहेत.

 चांदीचे आजचे दर

चांदीचा आजचा म्हणजेच 12 ऑक्टोबर 2023 चा बाजार भाव पाहिला तर एक किलो चांदीची किंमत 72 हजार 100 रुपये इतकी आहे. म्हणजेच या दरानुसार तुम्हाला जर 100 ग्रॅम चांदी घ्यायची असेल तर आज तुम्हाला 7210 रुपये लागतील. एक ग्राम चांदीची किंमत यानुसार 72.1 रुपये इतकी होते व तुम्हाला या दरानुसार जर आठ ग्रॅम चांदी घ्यायची असेल तर तुम्हाला 576.8 रुपये इतके पैसे लागतील.