Soybean Bajarbhav : सोयाबीनच्या दरात पुन्हा घसरण! सोयाबीन बाजारात नेमकं चाललंय तरी काय, वाचा आजचे बाजारभाव, समजेल बाजारातील चित्र

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Bajarbhav : काल सोयाबीनच्या बाजारभावात (Soybean Rate) थोडीशी वाढ झाली होती. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना (Farmer) आगामी काही काळात सोयाबीनच्या दरात (Soybean Price) वाढ होणार असल्याची आशा होती.

मात्र आज झालेल्या लिलावात सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांची (Soybean Grower Farmer) आशा संपुष्टात आली आहे. कारण की आज सोयाबीनच्या बाजारभावात (soybean market price) घसरण बघायला मिळाली आहे. काल सोयाबीन सहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत विकला जात होता मात्र आज सोयाबीनच्या (Soybean Crop) दरात मोठी घसरण झाली असून अनेक ठिकाणी सोयाबीन पाच हजाराच्या आसपास बघायला मिळाला.

यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांची पुन्हा एकदा निराशा झाली आहे. मित्रांनो सोयाबीनची लागवड (Soybean Farming) राज्यात सर्वाधिक केली जाते. राज्यातील हे एक मुख्य पीक आहे. अशा परिस्थितीत सोयाबीन पिकावर अनेक शेतकरी बांधवांचे अर्थकारण अवलंबून असते.

त्यामुळे आम्ही आपल्या शेतकरी वाचक मित्रांसाठी रोजच सोयाबीनच्या बाजारभावाची माहिती घेऊन हजर होत असतो. आज देखील आपण सोयाबीनचे आजचे बाजार भाव जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या विषयी.

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- कारंजा एपीएमसीमध्ये असत राशी क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून बाजार समितीत सोयाबीनला पाच हजार 230 रुपये प्रति क्विंटल एवढा जास्तीत जास्त बाजार भाव मिळाला असून कमीत कमी बाजार भाव चार हजार 500 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे. तसेच या बाजारात सर्वसाधारण बाजार भाव पाच हजार रुपये प्रतिक्विंटल राहिला.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती:- अमरावती एपीएमसी मध्ये आज 3216 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. या बाजार समितीत आज सोयाबीनला पाच हजार 41 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून चार हजार 750 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 895 रुपये प्रतिक्विंटल नमूद करण्यात आला आहे.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- नागपूर एपीएमसीमध्ये आज 498 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून 4525 रुपये प्रति क्विंटल एवढा सोयाबीनला किमान बाजार भाव मिळाला आहे तसेच पाच हजार 151 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव आज या बाजारात मिळाला आहे. तसेच चार हजार 995 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज या एपीएमसीमध्ये नमूद करण्यात आला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- अकोला एपीएमसी मध्ये आज 1067 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. या बाजार समितीत आज 4300 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव सोयाबीनला मिळाला असून पाच हजार 390 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव सोयाबीन ला मिळाला आहे. तसेच पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज या बाजार समितीत नमूद करण्यात आला आहे.

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती :- वासिम एपीएमसीमध्ये आज 1800 क्विंटल सोयाबीनची आवक झाली असून चार हजार 950 रुपये प्रति क्विंटल एवढा सोयाबीनला किमान बाजार भाव मिळाला आहे तसेच 5151 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव सोयाबीनला या बाजार समितीत मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.