Soybean Bazar Bhav: नवीन सोयाबीनला मिळत आहे हमीभावापेक्षाही कमी दर! काय आहे सोयाबीन बाजारभावाची आजची स्थिती? वाचा डिटेल्स

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Bazar Bhav:-संपूर्ण राज्यांमध्ये यावर्षी बऱ्याच ठिकाणी सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे त्याचा विपरीत परिणाम हा खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन यासारख्या पिकांच्या उत्पादनावर दिसून येत आहे. सोयाबीन आणि कापूस ही खरीप हंगामातील महत्त्वाचे पिके असून या दोन्ही पिकांचा शेतकऱ्यांच्या आर्थिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे.

परंतु मागच्या वर्षी कापूस आणि सोयाबीन बाजारभावाने शेतकऱ्यांची पुरती निराशा केलेली होती. त्या अनुषंगाने या वर्षी तरी कापूस आणि सोयाबीन या पिकांचे बाजारभाव चांगले राहतील व शेतकऱ्यांना आधार मिळेल अशी एक अपेक्षा आहे. सध्या बऱ्याच ठिकाणी सोयाबीन काढणीचे काम सुरू असून नवीन सोयाबीन देखील राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी येऊ लागले आहे. परंतु बऱ्याच ठिकाणी सोयाबीनचा जो काही हमीभाव म्हणजेच प्रतिक्विंटल 4600 रुपयांचा आहे त्याहीपेक्षा कमी दराने सोयाबीनचे खरेदी होताना दिसून येत आहे.

 नवीन सोयाबीनची खरेदी आधारभूत किमतीपेक्षाही कमी दाराने

सध्या राज्यातील काही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये खरीप हंगामातील नवीन सोयाबीनची आवक सुरू झाली असून या सोयाबीनला हमीभावापेक्षा तब्बल पाचशे ते सातशे रुपये कमी दर मिळताना दिसून येत आहे. सोयाबीनचे आधारभूत किंमत ही 4600 रुपये प्रति क्विंटल आहे परंतु त्यापेक्षाही कमी दरात सोयाबीन विकले जात आहे.

उदाहरणच घ्यायचे झाले तर गुरुवारी म्हणजेच काल हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 399 क्विंटल सोयाबीनची आवक झालेली होती व प्रतिक्विंटल कमीत कमी चार हजार 100 ते जास्तीत जास्त 4411 रुपये का दर मिळाला व बाजारभावाचे सरासरी 4255 रुपये इतकी राहिली. अगदी मंगळवारचा विचार केला तर परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 258 क्विंटल सोयाबीनचे आवक झालेली होती व किमान 4450 ते कमाल 4700 इतका दर मिळाला होता व बाजारभावाचे सरासरी 4600 रुपये राहिली होती.

सर्वसाधारणपणे बऱ्याच कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हीच स्थिती दिसून येत आहे. जर आपण मराठवाड्यातील परभणी व हिंगोली  या दोन्ही जिल्ह्यांचा विचार केला तर या ठिकाणी ऑगस्ट महिन्यामध्ये जो काही पावसाचा खंड पडला होता त्यानंतर सोयाबीन पिकावर मूळकूज तसेच येल्लो मोजेक सारख्या रोगांचा प्रादुर्भाव झाल्यामुळे तसेच पाऊस न झाल्यामुळे अपरिपक्व अवस्थेमध्ये पिक जळाल्याने उत्पादनात घट आलेली आहे व त्याचा परिणाम मालाच्या दर्जावर देखील झालेला आहे.

 काही निवडक बाजार समिती मधील आजचे सोयाबीनचे बाजार भाव

1- चिखली कृषी उत्पन्न बाजार समिती चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 307 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. झालेल्या लिलावात कमीत कमी 4000 ते जास्तीत जास्त 4500 इतका बाजार भाव मिळाला व सरासरी 4250 रुपये इतकी राहिली.

2- दिग्रस बाजार समिती दिग्रस बाजार समितीमध्ये आज पिवळ्या सोयाबीन ची 415 क्विंटल इतके आवक झाली व झालेल्या लिलावात कमीत कमी 4250 ते जास्तीत जास्त 4430 रुपये इतका बाजार भाव मिळाला. बाजारभावाची सरासरी 4335 रुपये इतकी राहिली.

3- मंठा बाजार समिती मंठा बाजार समितीमध्ये आज पिवळ्या सोयाबीनची 198 क्विंटल आवक झाली. या ठिकाणी झालेल्या लिलावात कमीत कमी तीन हजार रुपये ते जास्तीत जास्त 4500 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला. बाजारभावाचे सरासरी चार हजार दोनशे रुपये इतकी राहीली.

4- उमरगा बाजार समिती उमरगा बाजार समितीत आज वीस क्विंटल पिवळा सोयाबीन ची आवक झाली. झालेल्या लिलावात किमान 4110 ते कमाल 4500 इतका बाजार भाव मिळाला व सरासरी 4450 इतकी राहिली.

5- उमरखेड बाजार समिती उमरखेड बाजार समितीमध्ये पिवळा सोयाबीनची 50 क्विंटल आवक झाली व झालेल्या लिलावात किमान चार हजार सहाशे ते कमाल चार हजार सातशे रुपये इतका बाजार भाव मिळाला व बाजारभावाचे सरासरी 4650 रुपये इतकी राहिली.

6- सोनपेठ बाजार समिती सोनपेठ बाजार समितीमध्ये पिवळा सोयाबीन ची 287 क्विंटल आवक झाली व झालेल्या लिलावात किमान दर 4100 ते कमाल दर 4555 इतका मिळाला. बाजारभावाची सरासरी 4350 रुपये इतकी राहिली.