Soybean Market Price : सोयाबीनच्या बाजारभावात पडझड सुरूच! सोयाबीन बाजारात नेमकं चाललंय काय, आजचे बाजारभाव बघा, मग कळेल

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Soybean Market Price : सोयाबीन (Soybean Crop) हे एक महत्वाचं तेलबिया पीक (Oilseed Crop) आहे. या पिकाची आपल्या महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. खरं पाहता सोयाबीन एक नगदी पीक (Cash Crop) म्हणून ओळखले जाते.

या नगदी पिकाची आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात शेती (Soybean Farming) केली जाते. अशा परिस्थितीत बहुतांश शेतकरी बांधव सोयाबीनच्या बाजारभावाकडे (Soybean Rate) मोठे बारीक लक्ष ठेवून असतात. अशा परिस्थितीत आम्ही देखील आपल्या शेतकरी वाचक (Farmer) मित्रांसाठी सोयाबीनचे बाजारभाव (Soybean Price) रोजच घेऊन येत असतो. आज देखील आपण 29 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्र राज्यातील प्रमुख कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला मिळालेल्या बाजार भाव विषयी चर्चा करणार आहोत.

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती:- या एपीएमसीमध्ये 3000 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज या एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार 540 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून किमान बाजार भाव 5 हजार 110 रुपये प्रति क्विंटल एवढा होता. तसेच सर्वसाधारण बाजार भाव पाच हजार 325 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती:- अमरावती एपीएमसीमध्ये आज 2571 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. या एपीएमसीमध्ये आज पाच हजार 480 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव सोयाबीनला मिळाला असून 5200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव सोयाबीनला मिळाला आहे. तसेच 5,340 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.

लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- लातूर एपीएमसी मध्ये आज सहा हजार 623 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज्या एपीएमसीमध्ये सोयाबीनला पाच हजार 713 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून किमान बाजार भाव 5331 रुपये प्रति क्विंटल एवढा मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव 5670 रुपये प्रति क्विंटल एवढा राहिला आहे.

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- अकोला एपीएमसीमध्ये आज 1161 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. या एपीएमसीमध्ये आज 5570 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव सोयाबीनला मिळाला असून 5200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे. तसेच पाच हजार 460 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव सोयाबीन मिळाला आहे.

वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती :- वासिम एपीएमसीमध्ये 3000 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. या एपीएमसीमध्ये आज साडेपाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला असून चार हजार 900 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला आहे. तसेच पाच हजार रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव या एपीएमसीमध्ये आज नमूद करण्यात आला आहे.