Soybean Market Price : ब्रेकिंग! सोयाबीनच्या बाजारभावात वाढ, ‘या’ बाजार समितीत सोयाबीनला मिळाला 7 हजार 111 रुपये प्रति क्‍विंटलचा दर

Soyabean Price Hike

 

Soybean Market Price : सोयाबीन (Soybean Crop) उत्पादक शेतकरी बांधवांसाठी (Soybean Grower Farmer) थोडीशी दिलासादायक बातमी आज समोर आली आहे. आज सोयाबीनच्या बाजारभावात (Soybean Bajarbhav) मोठी वाढ झाली असून नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (Nagpur Apmc) आज सोयाबीनला 7111 रुपये प्रति क्विंटल एवढा उच्चांकी बाजार भाव मिळाला आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांच्या (Farmer) आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत.

राज्यातील इतर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये अजूनही सोयाबीन बाजार भाव (Soybean Rate) 5000 रुपये प्रति क्विंटलच्या खालीच बघायला मिळत आहेत. जाणकार लोकांच्या मते नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक लक्षनीय कमी झाल्याने हा बाजारभाव मिळाला आहे.

मित्रांनो जसे की आपणास ठाऊकच आहे आम्ही रोजच शेतकरी वाचक मित्रांसाठी सोयाबीनच्या बाजारभावाची माहिती घेऊन येत असतो. आज देखील आम्ही सोयाबीनच्या बाजार भावाची माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया सोयाबीन बाजार भाव विषयी सविस्तर.

कारंजा कृषी उत्पन्न बाजार समिती :- कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज 800 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 550 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 910 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच या एपीएमसीमध्ये आज सोयाबीनला 4675 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.

अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती :- सोयाबीनच्या लिलावासाठी संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या अमरावती एपीएमसीमध्ये आज 1977 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 905 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4700 दोन रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.

नागपूर कृषी उत्पन्न बाजार समिती :- नागपुर एपीएमसीमध्ये आज 351 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात नागपुर एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4200 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून सात हजार 111 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सहा हजार 383 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव आज या एपीएमसीमध्ये नमूद करण्यात आला आहे.

हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती :- हिंगोली एपीएमसीमध्ये आज 500 क्विंटल लोकल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात हिंगोली एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4500 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 4915 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच पीएमटी मध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनला चार हजार 707 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे. 

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती :- अकोला एपीएमसीमध्ये आज 440 क्विंटल सोयाबीनचे आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला तीन हजार 550 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून पाच हजार पाच रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज या एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनला 4895 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.

यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती :– यवतमाळ एपीएमसीमध्ये आज 153 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक. झाली आज झालेल्या लिलावात एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 355 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 4800 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज या एपीएमसी मध्ये झालेल्या लिलावात चार हजार 577 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव सोयाबीनला मिळाला आहे.

मुर्तीजापुर कृषी उत्पन्न बाजार समिती :- मुर्तीजापुर एपीएमसीमध्ये आज 730 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4575 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळाला असून चार हजार 885 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच सर्वसाधारण बाजार भाव चार हजार 705 रुपये प्रति क्विंटल एवढा नमूद करण्यात आला आहे.

धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समिती :- आज धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 115 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून चार हजार 875 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे. तसेच आज धरणगाव एपीएमसीमध्ये झालेल्या लिलावात सोयाबीनला चार हजार 790 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव मिळाला आहे.

केज कृषी उत्पन्न बाजार समिती :- या एपीएमसीमध्ये आज 99 क्विंटल पिवळ्या सोयाबीनची आवक झाली. आज झालेल्या लिलावात या एपीएमसीमध्ये सोयाबीनला 4690 रुपये प्रति क्विंटल एवढा किमान बाजार भाव मिळाला असून 4800 रुपये प्रति क्विंटल एवढा कमाल बाजार भाव मिळाला आहे  तसेच आज झालेल्या लिलावात केज एपीएमसीमध्ये सोयाबीनला चार हजार 790 रुपये प्रति क्विंटल एवढा सर्वसाधारण बाजार भाव नमूद करण्यात आला आहे.