Ahmednagar News : अहमदनगरधील शेतकऱ्यांचा आदर्श प्रयोग, इल्लाकी केळीची यशस्वी लागवड, एकरी चार लाखांचे उत्पन्न

banana

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यात शेतकरी आता विविध प्रयोग करू लागले आहेत. शेतीला तंत्रज्ञानाची आधुनिकतेची जोड देत विविध प्रयोग राबवू लागले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील मागील काही दिवसांचा अढावा घेतला तर जिल्ह्यात सफरचंद लागवड, काळ्या गव्हाची लागवड आदी पिके यशस्वीपणे घेतली आहेत. हे सर्व प्रयोग नोकरीच्या मागे धावणाऱ्या तरुणांसाठी एक आदर्शवत ठरत आहेत. आता अहमदनगरमधील शेतकऱ्यांनी … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील ‘येथील’ वक्फ बोर्डाच्या जागेवरील अतिक्रमणांवर हातोडा

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील वक्फच्या मिळकतीत करण्यात आलेल्या अतिक्रमणांवर हातोडा चालवण्यात आला. ही कारवाई श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान याठिकाणी करण्यात आली. येथील श्रीरामपूर-नेवासे राज्यमार्गालगत असलेल्या दावल मलिक दर्गा या वक्फच्या मिळकतीत करण्यात आलेले अतिक्रमणे हटवली. ही कारवाई महसूल विभागाने पोलिस बंदोबस्तात केली आहे. येथील दावल मलिक दर्गा वक्फच्या जमिनीवर अतिक्रमण झाल्याचा मुद्दा गेली अनेक वर्षे … Read more

Ahmednagar News : राज्य सरकरचा ‘तो’ निर्णय त्यांच्याच आला अंगलट ; अनेक विद्यार्थी गणवेशापासून वंचित

Ahmednagar News : सरकारने एक राज्य एक गणवेश असे धोरण ठरविले असून, त्यानुसार प्रत्येक विद्यार्थ्याला राज्य सरकारकडून शिवलेला गणवेश पाठविला जाणार होता. यासंबंधी राज्य सरकारने आदेशही काढले होते. मात्र, शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश पुरविणे शक्य झाले नाही त्यामुळे राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक विभागातील जवळपास ४८ लाख विद्यार्थी शाळेच्या गणवेशापासून वंचित आहेत. त्यामुळे राज्य सरकारचा हा … Read more

Ahmednagar Breaking : बँक अधिकाऱ्याकडूनच व्यावसायिकाची ३६ लाखांची फसवणूक, ‘या’ बँकेतील गैरप्रकार चव्हाट्यावर

fraud

Ahmednagar Breaking : विविध पतसंस्थांमध्ये, मल्टिस्टेटमध्ये अनेक फसवणुकीचे प्रकार समोर आलेहेत. अहमदनगरजिल्ह्यातील अनेक पतसंस्थांचे गैरकारभार देखील चव्हाट्यावर आले. परंतु आता एका नामांकित बँकेतील गैरकारभार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडियातील तत्कालीन शाखा मॅनेजरने हा गैरप्रकार केल्याचे समोर आले आहे. नगर शहरातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे तत्कालीन शाखा मॅनेजर यांनी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील वेगवेगळ्या अपघातात तिघे ठार, एक जखमी

accident

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात वेगवेगळ्या अपघातात तीन जण ठार झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये एक जण जखमी झाला आहे. तर चौथ्या एका घटनेत एक व्यक्ती अकस्मात मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. विविध अपघातांमधील राहुल बापूसाहेब खरणार, (वय ४६), नंदुबाई तुळशीदास जाधव (वय ४८) , समीर मोहंमद शेख (वय ३४) अशा तिघांचा मृतांमध्ये … Read more

Ahmednagar News : अहमदनगरमधील मुलींच्या वसतिगृहात कत्तलखान्यातील रक्तमिश्रीत पाणी, आरोग्याशी खेळ

lala pani

Ahmednagar News : नगर मधील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहात रक्तमिश्रित लाल पाणी साचल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मंगळवारी हा प्रकार समोर आल्यानंतर तातडीने महापालिकेला याची कल्पना देण्यात आली. मागील काही दिवसापासून हा प्रकार सुरू असल्याचे कार्यालय प्रशासनाकडून मनपाला कळवले. त्यानंतर मनपाने धावपळ करत उड्डाणपुलाखाली तुंबलेले ड्रेनेज जेटींग मशिनच्या साहाय्याने साफ करून प्रश्न मार्गी … Read more

Ahmednagar News : माहेरी जात असलेल्या महिलेचा मृत्यू तर पती जखमी ; या तालुक्यातील घटना

Shrigonda Accident

Ahmednagar News : सासुरवाडीला निघालेल्या दाम्पत्याच्या मोटरसायकलला भरधाव वेगात असलेल्या ट्रकने जोराची धडक दिली. या अपघातात पत्नीचा गंभीर जखमी होऊन घटनास्थळीच मृत्यू झाला तर पती जखमी झाला आहे. ही घटना कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवारात घडली. नंदूबाई तुळशीदास जाधव असे या अपघातात मृत झालेल्या महिलेचे नाव आहे तर तुळशीदास भीमराव जाधव असे जखमी झालेल्या पतीचे नाव … Read more

Ahmednagar News : धरणाच्या पाणलोटात पाऊस; धरणावर मात्र पावसाची प्रतिक्षा..!

Ahmednagar News : जिल्ह्यात विविध ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावलेली असली तरी जिल्ह्यातील उत्तरेत असलेल्या धरणांच्या पाणलोटात अद्याप समाधानकारक पाऊस सुरु झालेला नाही. मुळा भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही मान्सून पूर्णपणे सक्रिय झालेला नाही. मुळा खोऱ्यात अधूनमधून रोहिणी नक्षत्रापासून पावसाच्या सरी बरसत आहेत. मात्र, अद्यापही या परिसराला साजेसा पाऊस सुरू झालेला नव्हता. मात्र सोमवारी अकोले … Read more

Ahmednagar News : लोकांनी शेअर ट्रेडर पकडला, पोलिसांनी सोडून दिला ! संतप्त नागरिकांकडून मोठा गोंधळ, चक्काजाम

shear marcket

Ahmednagar News : शेवगाव तालुक्यातील चापडगाव येथील गुंतवणुकदारांना सुमारे २० कोटी रूपयांची टोपी घालणारा एसबी इन्व्हेस्टीमेंटचा संचालक शेअर ट्रेडर सुदाम बवीराल याला गुंतवणूकदारांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. मात्र रात्री पोलिसांनी त्याला सोडून दिल्याचा धक्कादायक प्रकार घडला. त्यामुळे संतापलेल्या गुंतवणूकदारांनी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. पोलिस प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणा देत कथित शेअर मार्केट प्रकरणात एजंटांकडून … Read more

Ahmednagar News : माजी खासदार लोखंडे यांचा ‘यु टर्न’ ; राम मंदिर बांधल्यामुळे नव्हे तर ‘त्या’ संघटनेमुळे आपला पराभव

Ahmednagar News : शिर्डी लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे (शिंदे गट) माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी राम मंदिर बांधल्यामुळेच माझा पराभव झाला. असे धक्कादायक विधान केले होते. यानंतर मात्र त्यांच्यावर सर्व स्तरातून जोरदार टीका करण्यात आल्याने माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी ‘यु टर्न’ घेतला असून, आपल्या वाक्याचा विपर्यास करण्यात आला असल्याचे माजी खासदार लोखंडे यांनी सांगितले. … Read more

Ahmednagar News : मान्सूनचा महाराष्ट्रात मुक्काम ; पाच दिवसांनंतर जोरदार कोसळणार !

Ahmednagar News : राज्यात अनेक ठिकणी माध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे. नगर जिल्ह्यात देखील काही तालुक्यात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी वापसा होण्याची वाट पाहत आहेत. त्यानंतर खरीपाची पेरणी करता येईल. मात्र जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहता, कोपरगाव या तालुक्यात अद्याप चांगला पाऊस झालेला नाही. मात्र पुढील चार ते पाच दिवसांनी अहमदनगरसह राज्यभर … Read more

Ahmednagar News : वास्तव ! एकीकडे पाऊस दुसरीकडे दीड हजार वाड्या-वस्त्यांवर पाणी टंचाई, २९३ गावांना ३१६ टँकरने पाणीपुरवठा

pani purvtha

Ahmednagar News : अहमदनगरमध्ये मृगाच्या पावसाने जोरदार हजेरी लावल्याचे चित्र आहे.अनेक ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊसही झाला आहे. परंतु हे एकीकडे जरी खरे असले तरी दुसरीकडे मात्र जिल्ह्यातील काही भागात अद्यापही पाणीटंचाई जाणवत असल्याचे वास्तव आहे. जिल्ह्यातील २९३ गावे आणि १ हजार ५७८ वाड्यांमध्ये पाणी टंचाई असून तब्बल ३१६ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. … Read more

मागेल त्याला शेततळे ! वर्षभरात १४ हजार शेततळी, एकट्या अहमदनगरमध्ये ३ हजार १८९ शेततळ्यांची निर्मिती,पहा जिल्हावाईज यादी

shetatali

महाराष्ट्रामध्ये कृषी विभागामार्फत ‘मागेल त्याला शेततळे’ (मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना) ही योजना राबविण्यात येत आहे. यामध्ये शेतकऱ्यांना शेततळे बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. या योजनेतंर्गत महाराष्ट्रात वैयक्तिक १३ हजार ५०० शेततळ्यांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले होते. प रंतु राज्यात या उद्दिष्टापेक्षाही जास्त शेततळी निर्माण झाली आहेत. राज्यात तब्बल १४ हजार २२ शेततळी तयार झाली आहेत. यामध्ये … Read more

Ahmednagar News : बाह्यवळण रस्त्यावरील वाहतुकीत केले बदल : हे आहे कारण … ! वाचा सविस्तर …

Ahmednagar News : दि. १९ जून पासून अहमदनगर जिल्हा पोलीस शिपाई व चालक पोलीस शिपाई पदाकरीता भरती प्रक्रीया सुरु करण्यात येणार आहे. सदर भरतीच्या मैदानी चाचणी पैकी भरती उमेदवारांची धावण्याची चाचणी अरणगाव बायपासकडून बाळुंज बायपासकडे जाणाऱ्या वाहयवळण मार्गावर घेण्यात येणार आहे. सदर रस्त्यावरुन मोठया प्रमाणावर वाहनांची रहदारी असते. तसेच परीसरातील नागरीक जनावरे व पादचारी हे … Read more

Ahmednagar News : अबब ! नगरमध्ये हिरवा चारा तीन हजारांवर, शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले

maka

Ahmednagar News : पावसाला सुरवात चांगली झाली. जिल्ह्यातील बहुतांश भागात पाऊस पडला आहे. असे असले तरी जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न मात्र अद्याप जैसे थे च आहे. पाऊस जरी पडला तरी हिरवा चारा येण्यास अवकाश लागणार आहे. त्यामुळे सध्या हिरवा चारा अद्यापही भाव खातोय. नगरमध्ये ऊस, मका, कडवळ या हिरव्या चाऱ्याला टनाला तीन हजार रुपये मोजावे लागत … Read more

Ahmednagar News : भाजीपाल्याची अवाक मंदावली ; टोमॅटो ५०, बटाटा ४०, गवार, दोडके, मिरची १२० रुपये किलो

Ahmednagar News : पावसाळा सुरु झाल्याने मोठ्या प्रमाणात भाज्यांची आवक कमी झाल्याने भाज्यांचे दर वाढले आहेत.  पावसामुळे अनेक भाज्या शेतातच खराब होतात. तो खराब माल फेकून द्यावा लागतो. त्यामुळे या काळात नुकसान जास्त होत असल्याने अनेकजण भाजीपाल्याचे उत्पादन घेत नाहीत. सततच्या पावसाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये भाज्यांची आवक देखील कमी झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. … Read more

Ahmednagar News : जिल्ह्यात कोणत्या तालुक्यात किती पाऊस पडला पहा सविस्तर … !

Ahmednagar News : गेल्या वर्षी रोहिणी, मृग नक्षत्र पूर्णपणे कोरडे गेले होते. त्यामुळे पेरणीसाठी शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा करावी लागली होती. यंदा मात्र मृगाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. मान्सूनने वेळेत हजेरी लावत पावसाच्या पहिल्याच नक्षत्रात अनेक भागात जोरदार पाऊस झाला आहे. मृग नक्षत्रातच पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी देखील पेरणीची तयारी करत … Read more

Ahmednagar News : काय ते चोरटे..! अवघ्या सात मिनिटांत दीड लाखांची चोरी, घटना सीसीटीव्हीत कैद, पहा..

thief

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात चोरट्यांचा चांगलाच सुळसुळाट झाला आहे. जिल्ह्यात दरोडे, चोरी आदी घटना वरचेवर घडताना दिसतायेत. आता संगमनेर तालुक्यातील पिंपरणे येथून एक चोरीची घटना समोर आलीये. येथील नंदू ठोंबरे यांच्या मालकीचे साईगगन इलेक्ट्रिकल्स व मोटर रिवायडींग दुकानचे बंद शटरचे कुलूप तोडून अनोळखी चोरांनी सात मिनिटात दीड लाखाची चोरी केली. त्यात महागड्या … Read more