मतदार संघातील रुसलेला विकास आमदार आशुतोष काळे यांच्यामुळे परत आला !

Ahmednagar News

Ahmednagar News : कोपरगाव मतदार संघातील रुसलेला विकास आमदार आशुतोष काळे यांच्यामुळे परत आल्याने गाव खेडी कामास विरोधकही दबक्या पावलाने हजेरी लावीत असल्याचा दावा आमदार काळे समर्थकांकडून प्रसिद्धी पत्रकाद्वारे करण्यात आला आहे. याबाबत दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आमदार काळे यांनी गाव खेड्यात विकास कामांचा धडाका सुरू केला आहे. हा विकास धुमधडाका पाहून … Read more

Shirdi News : कामगारांचा शिर्डीत मोर्चा ! दोन गुंठे जागा व घर बांधून देण्याचे आश्वासन…

Shirdi News

Shirdi News : शेती महामंडळाच्या हजारो कामगारांनी शिर्डीतील अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला. शासनाने कामगारांच्या कोट्यवधींच्या देय रकमा अदा कराव्यात, कामगारांना दोन गुंठे जागा व घर बांधून देण्याचे आश्वासन पूर्ण करावे, अशा घोषणा देत सोमवारी परिसर दणाणून सोडला. कामगार नेते सुभाष कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी हजारो कामगारांनी मोर्चा काढला. अहमदनगर जिल्ह्यातील शेती महामंडळाची … Read more

Leopard Attack : अहमदनगर जिल्ह्यात बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार

Leopard Attack

Leopard Attack : राहाता तालुक्यातील एकरुखे येथे बिबट्याच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार झाल्याची घटना रविवारी रात्री घडली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एकरुखे गावात गावठाण हद्दीत राहात असलेले रामराव लक्ष्मण जाधव या शेतकऱ्याने आपल्याजवळ असलेल्या शेळ्या रविवारी सायंकाळी नेहमीप्रमाणे घरासमोरच्या गोठ्यात बांधल्या. सुमारे रात्री एक ते तीन वाजण्याच्या सुमारास शेळ्यांचा ओरडण्याचा आवाज आल्यानंतर ते गोठयाजवळ गेले … Read more

अहमदनगर जिल्ह्यात निवडणूक विभागाची लोकसभेसाठी जय्यत तयारी

Ahmednagar News

Ahmednagar News : आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने ३७ अहमदनगर लोकसभा मतदारसंघातील राहुरी विधानसभा मतदारसंघातील निवडणूक प्रशासनाची सध्या जय्यत तयारी सुरू असून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निवडणूक विषयक विविध बैठका व प्रशिक्षण प्रक्रिया होत आहेत. ३७ अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये २२३ राहुरी विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. राहुरी विधानसभा मतदारसंघात एकूण ३०७ मतदान केंद्रे असून तीन तालुक्यात विभागलेल्या या … Read more

Ahmednagar Crime News : लहान मुलांच्या भांडणावरून नणंद, भावजयीला मारहाण

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : लहान मुलांमध्ये झालेल्या वादाच्या कारणावरुन सात जणांनी मिळून भावजय व नणंद यांना दगड, लाकडी दांडा व लाथा बुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना राहुरी तालुक्यातील गुहा येथे घडली. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की गयाबाई अजय जाधव, वय ५० वर्षे, या राहुरी तालूक्यातील गुहा येथे राहतात. दुपारच्या सुमारास गयाबाई जाधव … Read more

ग्रामीण रस्त्यांसाठी २५ कोटी रुपयांचा निधी : आ.मोनिका राजळे

Ahmednagar News

Ahmednagar News : शेवगाव -पाथर्डी मतदारसंघात पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या सहकार्याने जिल्हा नियोजन मंडळाचा १ कोटी ४० लक्ष निधी रस्त्यांसाठी खर्च करण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात निधी मिळविण्यात अडचणी येत होत्या; परंतु गेल्या दीड वर्षात शिंदे – फडणवीस व पवार सरकार सत्तेवर आल्यानंतर सर्वाधिक निधी आणून मतदारसंघातील विकासकामे मार्गी लावण्यात आली असून, ग्रामीण … Read more

आमदार निलेश लंकेंचा खासदार सुजय विखेंवर हल्लाबोल ! विमानाने रेमडीसिवर…

Ahmednagar News

Ahmednagar News : मतदारसंघात मी केलेल्या कामाचे कोणीही उद्घाटन करत आहे, मी कधीच दुसऱ्याच्या कामाचे श्रेय घेत नाहीत. सध्या जिल्हा परिषदेत मंजूर झालेल्या प्रशासकीय मान्यता स्वतःच्या नावावर खपवल्या जात आहे. मी जे बोलतो तेच करतो, आमदार झाल्यापासून माझ्यामध्ये काहीही फरक झालेला नाही. काही लोकांनी कोरोना काळात विमानाने रेमडीसिवर आणून धंदे केले, ते कुठे गेलेत, ते … Read more

जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून नवनागापूर येथे संपन्न झालेल्या कार्यक्रमाला महिलांची अफाट गर्दी..अजय अतुल यांच्या झिंगाट गाण्यावर सुजय विखेंनी धरला ठेका..

काल नगर तालुक्यातील नवनागापूर येथे जनसेवा फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेला कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आणि सांस्कृतिक महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला. या कार्यक्रमासाठी महिलांनी उत्स्फूर्तपणे दर्शविलेल्या सहभागाने परिसर अगदी फुलून गेला होता. इतकी अफाट आणि मोजता न येणारी महिला भगिनींची संख्या पाहून एखाद्या भव्य पर्वाचीच अनुभूती सर्वांना झाली. या कार्यक्रमात खासदार डॉ. सुजय विखे … Read more

प्रवरेच्या मातीने समानतेची शिकवण दिली – राज्याचे मुख्य सचिव डॉ.नितीन‌ करीर

प्रवरेच्‍या मातीने समानतेचा दिलेला महत्त्वपूर्ण संदेश जीवनमूल्यांची शिकवण देऊन‌ गेला असे गौरवोद्गार राज्‍याचे मुख्‍य सचिव डॉ.नितीन करीर यांनी आज येथे काढले. लोणी बुद्रूक ग्रामस्‍थांच्‍या वतीने आयोजित केलेल्‍या सत्‍कार समारंभास उत्तर देताना जून्‍या आठवणींना उजाळा देत डॉ.करीर यांनी प्रवरा परिसरात झालेल्या जडणघडणीचा इतिहासही उलगडून दाखविला. राज्‍याच्‍या मुख्‍य सचिव पदावर नियुक्‍ती झाल्‍याबद्दल लोणीचे भूमीपुत्र आणि प्रवरा ग्रामीण … Read more

Ahmednagar Crime News : बसमधून महिलेचे दीड तोळ्याचे दागिने लंपास

Ahmednagar Crime News

Ahmednagar Crime News : एसटी बसमधून प्रवास करत असलेल्या तांदुळनेर- तांभेरे येथील एका महिलेच्या बॅगमधील दीड तोळा वजनाचे सोन्याचे मनिमंगळसूत्र व रोख रक्कम अज्ञात भामट्याने चोरून नेल्याची घटना राहुरी तालुक्यातील कोल्हार खूर्द ते विद्यापीठ दरम्यान घडली. याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी, की त्रिवेनी सतिश नन्नावरे या राहुरी तालुक्यातील तांदुळनेर तांभेरे येथे राहातात. त्यांना कामानिमित्त … Read more

नऊ वर्षात वीस कोटी रुपयाचा निधी : आमदार मोनिकाताई राजळे

Ahmednagar News

Ahmednagar News : कोरडगावच्या विकासकामासाठी नऊ वर्षात वीस कोटी रुपयाचा निधी दिला. परीसारातील रस्ते, पिण्याचे पाणी, जलसंधारणाची कामे, शाळाखोल्या, सभागृह, वीज यासाठीचा निधी मोठ्या प्रमाणात दिला आहे. असे मत आमदार मोनिकाताई राजळे यांनी व्यक्त केले. तालुक्यातील कोरडगाव, कोळसांगवी येथील विविध विकास कामाच्या शुभारंभ व लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमात आ. राजळे बोलत होत्या. यावेळी प्रमुख पाहुणे हभप … Read more

आमदार रोहित पवार यांनी विकासाचे व्हिजन काय असते, हे दाखवून दिले

Ahmednagar News

Ahmednagar News : कर्जत- जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार यांनी विकासाचे व्हिजन काय असते, हे दाखवून दिले आहे. त्यांच्या माध्यमातून विकासाची कामे होत असताना रवळगाव, भागाच्या विकासासाठी भरीव विकास निधी मिळवून देऊ, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे युवानेते अनिल पांडुळे यांनी दिली. कर्जत तालुक्यातील रवळगाव येथे आ. रोहित पवार यांच्या प्रयत्नतून येथील कब्रस्तान संरक्षण भिंतीच्या कामाचा लोकार्पण … Read more

चोरी केलेले सोने विक्रीला घेवून आले अन् जेलमध्ये बसले ! ३ लाख ८० हजाराचा मुद्देमाल हस्तगत

Ahmednagar News

Ahmednagar News : चोरी केलेले सोने सोनाराकडे विक्रीला घेवून आले असता आरोपींना गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले, चोरीच्या मोटारसायकलसह ५.४ तोळ्याचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.बोधेगाव (ता. शेवगाव) येथे आरोपींना एलसीबीच्या पथकाने २ किलोमीटरचा पाठलाग करुन पकडले. लहू वृद्धेश्वर काळे (रा. सोनविहीर, ता. शेवगाव) व दिनेश उर्फ बल्याराम अंगदभोसले (रा. कासारी, … Read more

संगमनेरमध्ये क्रिडा स्पर्धेत २५०० महिलांचा सहभाग, ६५ वर्षीय आजींनी केली फलंदाजी

Ahmednagar News

Ahmednagar News : युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून येथील एकविरा फाउंडेशनच्या वतीने सुरू असलेल्या महिला क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धेत तालुक्यातील २५०० महिलांनी सहभाग घेतला. या स्पर्धेमध्ये तालुक्यातील वडगाव लांडगा येथील ६५ वर्षीय सुमन बाळासाहेब लांडगे यांनी फलंदाजी व क्षेत्ररक्षणात सहभाग घेऊन या स्पर्धेचा आनंद घेतला. येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल … Read more

Ahmednagar News : तरुणाचा निर्घृण खून, बापानेच चाकूने वार करून संपवले, अहमदनगरमधील ‘या’ गावातील थरार

Ahmednagar News

Ahmednagar News : अहमदनगर जिल्ह्यातील एका गावात अंगावर काटा आणणारा थरार घडला आहे. वडिलांनीच पोटच्या मुलावर चाकूने सपासप वार करत मुलाचा निर्घृण खून केला. केवळ शिवीगाळ करू नका असे म्हटल्याने वडिलांना राग आला व त्यांनी हे कृत्य केले. ही घटना नेवासे तालुक्यातील शिंगवे तुकाई येथे ७ फेब्रुवारी रोजी रात्री घडली होती. बापाने आपल्या पोटच्या मुलाचा … Read more

Ahmednagar Politics : दिल्ली अब दूर नही ! आमदार निलेश लंकेच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाभरातील वृत्तपत्रांत पाने भरून जाहिराती

Ahmednagar Politics

Ahmednagar Politics : अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके हे नगर दक्षिण अर्थात अहमदनगर लोकसभा मतदार सांघातून खासदारकी लढवण्यास इच्छुक आहेत. परंतु येथे भाजपचे खासदार सुजय विखे स्टँडिंग उमेदवार असल्याने व राज्यात महायुती असल्याने ही जागा भाजप राहील व व नीलेश लंके यांना तिकीट मिळणे जरा अवघड होईल असे वाटत होते. परंतु आज त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील भाजी विक्रेत्याचा मुलगा बनला अधिकारी

Ahmednagar News

Ahmednagar News : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत येथील सागर शामराव रनमाळे यांची जलसंपदा विभागात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकपदी अर्थात सीइए पदावर निवड झाली आहे. बाजारात भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणारे भाजी विक्रेते शामराव रनमाळे यांचा तो मुलगा आहे. सागर याने राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत जिद्द मेहनत व चिकाटीच्या जोरावर यश मिळवले असून आपल्या आई-वडिलांचे अधिकारी होण्याबद्दलचे … Read more

नऊ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार दोघांवर गुन्हा दाखल..!श्रीगोंदा तालुक्यात खळबळ

Ahmednagar News

Ahmednagar News : श्रीगोंदा परिसरातील एका गावात एका ९ वर्षांच्या मुलीवर नात्यातील एका जणाने आपल्या मित्रासह सुमारे एक महिनाभर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी दोन जणांवर श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोनही आरोपींना पोलिसांकडून अटक करत न्यायालयात हजर करण्यात आले आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसारः श्रीगोंदा परिसरातील एका गावातील नऊ वर्षीय अल्पवयीन … Read more