आमदार रोहित पवार यांनी विकासाचे व्हिजन काय असते, हे दाखवून दिले

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar News : कर्जत- जामखेड मतदारसंघात आमदार रोहित पवार यांनी विकासाचे व्हिजन काय असते, हे दाखवून दिले आहे. त्यांच्या माध्यमातून विकासाची कामे होत असताना रवळगाव, भागाच्या विकासासाठी भरीव विकास निधी मिळवून देऊ, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे युवानेते अनिल पांडुळे यांनी दिली.

कर्जत तालुक्यातील रवळगाव येथे आ. रोहित पवार यांच्या प्रयत्नतून येथील कब्रस्तान संरक्षण भिंतीच्या कामाचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते.

कार्यक्रमास जि.प. सदस्य गुलाब तनपुरे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष रघुआबा काळदाते, बाळासाहेब सपकाळ, युवा नेते संदीप गांगर्डे, ग्रा.पं. सदस्य संतोष दादा खेडकर, केशव अडसूळ, अभंग बोरूडे, वैभव बाबर, पोलिस पाटील सुनिल खेडकर,

अन्सार शेख, बिलाल शेख, रशिद दातरंगे, कलीम दातरंगे, खुदाबक्श शेख, युनूस बागवान, अजित दातरंगे, लाला खेडकर, ज्ञानदेव खेडकर, विजय खेडकर, कृष्णा खेडकर आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

रवळगावातील मुस्लिम बांधवांचा नवीन कब्रस्तान संरक्षण भिंतीचा प्रश्न आ. रोहित पवार यांच्या प्रयत्नातून व सर्वांच्या सहकार्याने मार्गी लागला असून, ग्रामस्थांनी हे सामाजिक कार्य करत असताना हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आदर्श समाजापुढे दाखवून दिला आहे, असे राष्ट्रवादी युवानेते संतोष खेडकर यांनी सांगितले.