साथीच्या आजाराने गावातील खासगी दवाखाने होतायत ओव्हरफ्लो

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- गेल्या दीड वर्षाहून अधिक काळ वास्तव्य करणाऱ्या कोरोनाचा कहर कायम असताना जिल्ह्यात अनेक साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव पसरू लागला आहे. यामुळे खासगी रुग्णालये देखील ओव्हरफ्लो होऊ लागली आहे. नेवासा तालुक्यातील पाचेगाव परिसराला हिवताप, सर्दी, खोकला आदींसह अनेक आजारांचा विळखा पडला आहे. आधीच कोरोनाच्या लाटेने त्रस्त असलेल्या ग्रामीण भागातील जनतेला … Read more

पक्षविरोधी काम करणाऱ्या भाजपच्या दोन नगरसेवकांवर निलंबनाची कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :- पक्ष विरोधी काम करणाऱ्या नेवासामधील भाजपच्या दोन नगरसेवकांचे पक्षातून निलंबन करण्यात आले आहे. नगर पंचायतीमधील भाजपकडून निवडून आलेले नगरसेवक रणजित दत्तात्रय सोनवणे व दिनेश प्रताप असे निलंबित करण्यात आलेल्या नगरसेवकांची नावे आहे. याबाबतचे पत्र भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी दिले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की , वेळोवेळी … Read more

श्रीरामपूर तालुक्यात धाडसी चोरी : साडेतेरा तोळे सोने लंपास..! लग्नाचा अल्बम पाहून ‘त्या’ दागिन्यांचीही चोरी

अहमदनगर Live24 टीम, 26 सप्टेंबर 2021 :-चोरी करण्यासाठी चोरटे काय करतील ते सांगता येत नाही. श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे चोरट्यांनी घरात असलेल्या लग्नाच्या अल्बमधील महीलांच्या गळ्यातील सर्व दागिने व त्या महिलांकडून काढून घेण्याची घटना घडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी, श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील खंडागळे यांचा बंगल्यात काल पहाटे दीड वाजेच्या सुमारास चोरट्यांनी बंगल्याचा मुख्य … Read more

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करा !

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- संगमनेरातील शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्याने बेकायदेशीररित्या दारिद्र्य रेषेखालील शिधापत्रिकेचा वापर विविध शासकीय लाभ मिळविण्यासाठी केला असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. याबाबत भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष अॅड. श्रीराम गणपुले यांनी तहसीलदारांकडे तक्रार केली असून शिवसेनेच्या सदर पदाधिकाऱ्यावर शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे. या तक्रारीमुळे … Read more

Ahmednagar News : बंधाऱ्यावरून पडल्याने एकाचा मृत्यू !

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील वळदगाव बंधाऱ्यावरुन पडून चांदेगाव येथील एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.(ahmednagar news one dies after falling) चांदेगाव येथील रंगनाथ गोविंद वायदंडे हे सायकलवरुन बंधारा पार करत असताना तोल जावून खाली पडले. त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्यामुळे त्यांना तातडीने दवाखान्यात दाखल केले परंतु त्यांचे निधन झाले … Read more

अहमदनगर कोरोना अपडेट : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर: जिल्ह्यात आज ६९५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३० हजार ७३६ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.६१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७३१ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची … Read more

कोपरगांवच्या लेकीची अमेरिकन बँकेत निवड

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- कोपरगांवच्या गांधीनगर भागातील सर्वसामान्य कुटूंबातील लेक भाग्यश्री ज्ञानेश्वर वाल्डे हीची बँक ऑफ अमेरिका वॉशिंग्टन डी सी येथे सिनीयर टेक असोसिएट अंडर सॉफटवेअर डेव्हलपर म्हणून निवड झाली त्याबददल तिच्या बुध्दीमत्तेचे कौतुक करावे आहे तीने यामाध्यमांतून जीवनांत आणखी प्रगती करावी असे प्रतिपादन भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी केले. कुमारी … Read more

राहीबाई पोपेरे यांना लक्ष्मीबाई जीवनगौरव पुरस्कार जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :-शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्यात नावलौकिक असलेल्या रयत शिक्षण संस्थेकडून देण्यात येणारा २०२१ चा राष्ट्रीय पातळीवरील मानाचा लक्ष्मीबाई भाऊराव पाटील जीवन गौरव पुरस्कार बीजमाता पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांना देऊन गौरविण्यात येणार असल्याची घोषणा रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष शरद पवार यांनी केली. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त बुधवारी (२२ … Read more

दरोड्याचा प्रयत्न फसला, चौघे दरोडेखोर पसार…

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- संगमनेर शहरातील मेनरोड येथील व्यंकटेश मोबाईल शॉपी फोडण्याचा प्रयत्न गुरुवारी मध्यरात्री दरोडेखोरांच्या टोळीने केला. त्याच दिवशी तवेरा कार वडगावपानच्या जुन्या टोल नाक्याजवळ बेवारस आढळली. हीच कार मेनरोडच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली. चार दरोडेखोरांनी कार सोडून ट्रकमधून पलायन केल्याचे तपासात निष्पन्न होत आहे. गुरुवारी मध्यरात्री तवेरा कार (एमएच ०४ … Read more

महाविकास आघाडी सरकार सगळ्याच परिक्षेत नापास झाले – माजीमंत्री आ.विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :-  राज्‍यातील मंदिर उघडण्‍यासाठी महाविकास आघाडी सरकारला घटस्‍थापनेचा मुहूर्त सापडला असला तरी, केवळ भाजपच्‍या मागणीला विरोध म्‍हणून इतके दिवस मुख्‍यमंत्र्यांनी हा विषय व्‍यक्तिगत प्रतिष्‍ठेचा केला होता का? असा सवाल भाजपाचे जेष्‍ठनेते आ.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी उपस्थित केला. आरोग्‍य विभागाच्‍या परिक्षेच्‍या संदर्भात झालेल्‍या गोंधळावर भाष्‍य करताना आ.विखे पाटील म्‍हणाले की, … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 731 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – संगमनेर – 188 अकोले – 32 राहुरी – 32 श्रीरामपूर – 28 नगर शहर मनपा -31 पारनेर – 60   पाथर्डी – 62 नगर ग्रामीण … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : ६ जणांच्या कुख्यात टोळीविरुध्द मोक्का

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या कट रचून दरोडा टाकल्याच्या गुन्ह्यातील टोळीप्रमुख सुरेश रणजित निकम, (रा. कात्रड, ता. राहुरी) व त्याच्या टोळीतील पाच जणांविरुद्ध मोक्का कायद्याअन्वये कारवाई करण्यात आली आहे. एमआयडीसी पोलिसांनी विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र यांच्याकडे याबाबत प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाला २२ सप्टेंबर रोजी विशेष पोलिस … Read more

महसूलमंत्र्यांच्या तालुक्यातील ३१ गावे प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून जाहीर

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात पुन्हा एकदा कोरोना सक्रिय होऊ लागला आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढू लागली आहे. नुकतेच या मुद्द्यावरून विभागीय आयुक्तांनी देखील प्रशासनाला चांगलेच खडसावले आहे. यामुळे आता प्रतिबंधात्मक पाऊले उचलली जाऊ लागली आहे. नुकतेच संगमनेर तालुक्यातील ३१ गावांमध्ये करोना बाधितांची संख्या दिवस गणीक वाढत असल्याने ही गावे प्रतिबंधात्मक क्षेत्र … Read more

युपीएससीत नगर जिल्ह्याच्या सुपुत्रांनी रोवला झेंडा

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) मागील वर्षीच्या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेमध्ये नगर जिल्ह्यातील ५ जणांनी यश मिळवले आहे. यामध्ये विनायक नरवडे (रँक ३७), सुहास गाडे (रँक ३४९), सुरज गुंजाळ (रँक ३५३), अभिषेक दुधाळ (रँक ४६९), विकास पालवे (रँक ५८७) हे यूपीएससीत उत्तीर्ण झाले आहेत. यामुळे … Read more

बेलापूरात चोरट्यांचा धुमाकूळ; शेजारची दोन घरे फोडली

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून चोरटयांनी धुमाकूळ घातला आहे. यातच बेलापूरात चोरटे सक्रिय झाल्याचे दिसून येऊ लागले आहे. विशेषबाब म्हणजे या चोरटयांनी शेजारी – शेजारी असलेले दोन घरे फोडली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, बेलापूर येथील बायपास रोड परिसरात राहणारे विराज उदय खंडागळे व सोमनाथ चिंतामणी यांच्या घरावर … Read more

जिवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास ५ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

अहमदनगर Live24 टीम, 25 सप्टेंबर 2021 :- दोघांमध्ये वाद होऊन तरुणाने पैसे घेणाऱ्या व्यक्तीवर कोयत्याने वार करून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना तीन वर्षांपूर्वी संगमनेर तालुक्यातील निमगावजाळीत घडली होती. या प्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल होता. याप्रकरणी जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला कोर्टाने 5 वर्षे कारावास तसेच दहा हजार रुपये दंडाची … Read more

Ahmednagar Corona Update : 743 बाधितांची रुग्ण संख्येत भर,जाणून घ्या सविस्तर अपडेट्स…

अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- जिल्ह्यात आज ८२६ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख ३० हजार ४१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.६१ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ७४३ ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

आयशर चालकाला मारहाण करून लूटणारे आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- कोपरगाव तालुक्यातील येसगाव शिवरातील आयशर वाहन चालकाला मारहाण करून लुटणाऱ्या आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने जेरबंद केले आहे. येसगाव येथील राजस्थान ढाब्याजवळ रात्रीच्या सुमारास उभ्या असलेल्या आयशर वाहनाच्या चालकाला मारहाण करून, पोटात चाकू मारून जखमी करून त्याच्याकडील मोबाईल लंपास केला होता. याबाबत तालुका पोलिस ठाण्यात 19 सप्टेंबर रोजी … Read more