Sai baba mandir : साईबाबा मंदिर उघडण्याच्या परवानगीसाठी शासनाकडे प्रस्ताव

अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- काही अटी व शर्तीवर साई मंदिर (Sai baba mandir)उघडण्यास परवानगी मिळावी म्हणून शासनाकडे प्रस्ताव सादर करणार असून संस्थांनच्या आरोग्य सेवेचे नूतनीकरण व शिक्षणाच्या संधी उपलब्ध करण्यास नवीन विश्वस्त मंडळ प्राधान्य देणार असल्याची माहिती शिर्डी संस्थानचे विश्वस्त सुरेश वाबळे यांनी दिली. साईबाबा संस्थांनच्या विश्वस्त मंडळावर निवड झाल्याबद्दल सुरेश वाबळे,सचिन … Read more

Ahmednagar Breaking : तरुणाचा मृतदेह आढळला ! एकच खळबळ

अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- कोपरगाव तालुक्यातील चासनळी येथील बाजार तळातील एका शेडमध्ये आज शुक्रवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी सकाळी एक तरुणाचा मृतदेह आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली.(Ahmednagar Breaking: Youth’s body found) बाजारतळावर तरुणाचा मृतदेह दिसून येताच परिसरातील ग्रामस्थांनी पोलीस पाटील तालुका पोलिसांना याबाबत कळविले असता पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व मृतदेहाची … Read more

कोपरगावचे आकाश नागरे यांच्यासह शेकडो युवक कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- जुन्या पिढीतील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते लहानु भाऊ पाटील नागरे यांचे नातू व कोपरगाव तालुक्यातील धडाडीचे युवक नेतृत्व आकाश संजय नागरे यांनी काल राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. मुंबई प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयांमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व महसूल मंत्री … Read more

संगमनेर तालुक्यातील पठार भागातील ग्रामपंचायतींना महावितरणाचा दणका

अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- संगमनेर तालुक्यातील पठार भागातील ग्रामपंचायतींना महावितरणाचा दणका स्थानिक ग्रामपंचायतीत पाणीपुरवठा करणाऱ्या मोटर लाईट बील ग्रामपंचायतीने वेळोवेळी वीज बिल न भरल्यामुळे साकुर उपकेंद्र महावितरणने वीज कनेक्शन कट करत ग्रामपंचायतीला मोठा धक्का दिला आहे परिणामी ग्रामपंचायत हद्दीत होणाऱ्या पाणीपुरवठा व त्याचे परिणाम झाल्यामुळे स्थानिक राहणाऱ्या लोकांच्या मनामध्ये नाराजीचा सूर बघायला … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यात दोन ठिकाणी धाडसी दरोडा लहान मुलीच्या गळ्याला चाकू ….

अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथे दोन ठिकाणी धाडसी दरोडा टाकून दरोडेखोरांनी रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. श्रीरामपुर रोडवर असणाऱ्या गो शाळेलगत उदय खंडागळे यांचा बंगला आहे रात्री दिड वाजे दरम्यान चोरट्यांनी खंडागळे यांच्या बंगल्याचा मुख्य दरवाजा तोडून आत प्रवेश केला चोरट्यांनी खंडागळे यांच्या घरात … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर आकडेवारी

अहमदनगर Live24 टीम, 24 सप्टेंबर 2021 :- अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 743  जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

भरदिवसा महिलेच्या गळ्यातील गंठण धूमस्टाईल लांबवले

अहमदनगर Live24 टी म, 24 सप्टेंबर 2021 :- कोपरगाव शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्यालयाच्या शिक्षिका संगीता गणेश देशमुख (रा. साईनगर) या सकाळी आपली दुचाकी लावत असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यानी सकाळी ९.२० वाजेच्या सुमारास ६० हजार रुपये किमतीचे सुमारे दीड तोळ्यांचे सोन्याचे गंठण पळवले. त्यामुळे शहरातील महिला … Read more

आरटीओ कार्यालयाचे विभाजन करून ते संगमनेरला नेण्याचा घाट

अहमदनगर Live24 टी म, 24 सप्टेंबर 2021 :- श्रीरामपुरातील आरटीओ कार्यालयाचे विभाजन करून ते संगमनेरला नेण्याचा निर्णय घेऊ नये, श्रीरामपूरच जिल्हा करावा या मागणीसाठी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन निवेदन दिले. तसेच आरटीओ कार्यालयाचे विभाजन करून ते संगमनेरला नेण्याचा घाट घालण्यात आला आहे. श्रीरामपूर आरटीओ कार्यालयाचे विभाजन केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा … Read more

अबब..हातात नंग्या तलवारी घेऊन दहशत

अहमदनगर Live24 टी म, 24 सप्टेंबर 2021 :-  राहाता तालुक्यातील कोल्हार येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून हातात तलवारी घेऊन एका गटाने धुडगुड घातला असून याबाबतचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. याबाबत सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, बुधवारी रात्री एका मोटासायकलचा धक्का लागण्याच्या कारणावरून दोन गटात वाद झाले होते.त्याचे रूपांतर आज तीव्र झाले होते. रका गटातील … Read more

आज ६३३ रूग्णांना डिस्चार्ज तर नव्या ६३० बाधितांची रुग्ण संख्येत भर

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :-  जिल्ह्यात आज ६३३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३ लाख २९ हजार २१५ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.५८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, आज जिल्हयाच्या रूग्ण संख्येत ६३० ने वाढ झाल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या … Read more

दरोड्याच्या तयारीतील फरार गुन्हेगार जेरबंद

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :-  सन २०१७ मध्ये नगर शहरात दरोडा टाकण्यासाठी येत असलेल्या टोळीतील फरार आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले आहे. सागर गोरख मांजरे (रा. उक्कलगाव, ता. श्रीरामपूर) असे त्याचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यात चोरीचे दहा गुन्हे दाखल आहेत. सागर मांजरे हा त्याच्या ७ साथीदारासह दरोड्याची तयारी … Read more

निळवंडे कॅनॉलचे साहित्य चोरणारे दोघे गजाआड

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- संगमनेर तालुक्यातील झोळे येथे निळवंडे धरणाच्या कॅनॉलचे बांधकाम सुरू आहे. रविवारी सायंकाळी साडेसहा वाजता अ‍ॅपे रिक्षातून साहित्य चोरून नेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांचा पाठलाग करून एक लाखाचा मुद्देमाल व अ‍ॅपे रिक्षासह अक्षय राजू देठे (१९, मालपाणी हेल्थ क्लब), अजित अरुण ठोसर (इंदिरानगर) या दोघांना ताब्यात घेतले. … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : आज वाढले ‘इतके’ रुग्ण ! वाचा सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यात आजही तब्बल 630 जणांना कोरोनाची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत वाढलेली आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी आम्हाला फॉलो करा फेसबुक । ट्विटर । टेलिग्राम । युट्युब। गुगल न्यूज । इंस्टग्राम

अहमदनगर ब्रेकिंग : १० पेक्षा जास्त कोरोना रुग्ण असलेली गावे बंद…

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :-  नगर जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या सातत्याने वाढत असल्यामुळे दोन दिवसापासून नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पॉझिटिव्ह रेट अधिक असलेल्या तालुक्यांचा दौरा करून कोरोना आढावा बैठक घेतल्या. संगमनेर येथील शेवटच्या बैठकीत गमे यांनी तिसऱ्या लाटेला नगर पासूनच सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त केल्यामुळे जिल्हा प्रशासनाने … Read more

युवकाची आत्महत्या नसून, घातपात असल्याचा संशय

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- घोडेगाव कौठा येथील युवकाच्या मृत्यूचा तपास करण्याच्या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (गवई गट) वतीन पोलिस अधीक्षक कार्यालया समोर उपोषण करण्यात आले. या उपोषणात आरपीआयचे शहर जिल्हाध्यक्ष सुशांत म्हस्के, शहर कार्याध्यक्ष दानिश शेख, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, अल्पसंख्याक शहर अध्यक्ष नईम शेख, आजीम खान, जमीर इनामदार, पप्पू डोंगरे, … Read more

नवविवाहितेचा छळ करणाऱ्या सासरच्या सहा जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- नेवासा तालुक्यातील धामोरी येथे एका नवविवाहितेचा पैशासाठी शारीरिक व मानसिक छळ करून तिला घरातून हाकलून दिल्याची घटना घडली आहे. याबाबत सोनाली सतीश दाणे (वय २१) रा. धामोरी ता. नेवासा हिने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती, सासू – सासऱ्यांसह ६ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांची … Read more

शेतीवर मोटार चालू करण्यासाठी गेले आणि समोरील चित्र पाहून धक्काच बसला

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :-शेतीतील विहिरीवरील ५ अश्वशक्ती पाणबुडी तसेच शेजारील शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी व केबल चोरीला गेल्याची घटना कोपरगाव तालुक्यातील जेऊर कुंभारी येथे घडली आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शेतकरी संजय वक्ते यांनी नेहमीप्रमाणे शेतात जाऊन इलेक्ट्रॉनिक मोटरीने शेतीला पाणी भरले व सहा … Read more

चरायला घेऊन गेलेल्या शेळ्या चोरल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- नेवासा तालुक्यातील गळनिंब येथून 57 हजार रुपये किंमतीच्या शेळ्यांची चोरीची झाल्याची घटना घडली आहे. याबाबत कृष्णा मनोहर शेळके (वय 40 वर्षे) यांनी नेवासा पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान दाखल फिर्यादीत म्हंटले आहे की, माझा शेती व्यवसाय असुन गळनींब शिवारात … Read more