‘गावठी पोट्टे’ला मिळतोय दणक्यात प्रतिसाद; सहावा भागही झालाय रिलीज

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- ‘पिक्चरवाला’ या युट्युब चॅनेलने ‘गावठी पोट्टे’ ही मराठी वेबसिरीज आणली आहे. या सिरीजमध्ये ग्रामीण भागाचे बदलते भावरंग उलगडून दाखवण्यात येत आहेत. पहिल्या सिजनच्या पाच भाग आणि थीम सॉंगला जोरदार प्रतिसाद मिळाला. तसेच प्रेक्षकांनी प्रत्येक आठवड्यात एक भाग रिलीज करण्याची मागणी केल्याने वेळापत्रकात काही बदल करून सहावा भाग प्रसिद्ध … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : पती-पत्नीचा निर्घृण खून ! दोघेही रक्ताने भरलेले ….

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- राहाता तालुक्यातील कोऱ्हाळे येथील चांगले वस्तीवर पती-पत्नीचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. शशिकांत श्रीधर चांगले (वय 60) व सिंधुबाई शशीकांत चांगले (वय 55) असे या मृत पतीपत्नीचे नाव आहे. शशिकांत चांगले आणि सिंधुबाई चांगले हे दोघेही पती-पत्नी शेतकरी आहेत. सकाळी लवकर उठवून शेतात काम करण्यासाठी जाणारे … Read more

चाईल्ड लाईनच्या टिमला रेनकोटचे वाटप

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- बालकामगार, बालभिक्षेकरी, बालविवाह, बालकांचे लैंगिक शोषण आदी अल्पवयीन मुलांच्या प्रश्‍नांवर 24 तास कार्य करणार्‍या चाईल्ड लाईनच्या टिमला हाजी अजीजभाई चष्मावाला सामाजिक प्रतिष्ठान व मराठी पत्रकार परिषदच्या वतीने रेनकोटचे वाटप करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते हरजितसिंह वधवा यांच्या हस्ते चाईल्ड लाईनच्या सदस्यांना रेनकोट वितरीत करण्यात आले. यावेळी मराठी पत्रकार परिषदचे … Read more

अहमदनगर कोरोना ब्रेकिंग : जिल्ह्यात आज वाढले इतके रुग्ण ! वाचा सविस्तर आकडेवारी …

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरली आहे . अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच ठिकाणची रुग्ण संख्या आता कमी होते आहे, जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत पाचशे पेक्षा कमी रुग्ण आढळले आहेत जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांत 353 रुग्ण आढळले आहेत. जिल्ह्यातील तालुकानिहाय रुग्ण संख्या पुढीलप्रमाणे आहे – अहमदनगर जिल्ह्यातील ब्रेकिंग बातम्यांसाठी … Read more

आरोग्यमंत्री राजेश टोपेंकडून मोठा खुलासा म्हणाले सर्वांनी कोरोनाच्या …

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- राज्यात कोरोना व्हायरस संक्रमणाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंट संक्रमित एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात डेल्टा प्लस व्हेरिएंटचे २१ रुग्ण आढळले असून त्यातील एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांना दिली आहे. राजेश टोपे म्हणाले की, पहिला डेल्टा होता त्यानंतर डेल्टा प्लस आला, डेल्टाने त्याचे रुप बदललंय … Read more

एसबीआयच्या ग्राहकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी!

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- एसबीआय च्या ग्राहकांसाठी १ जुलै २०२१ पासून बर्‍याच गोष्टी बदलल्या जात आहेत. यामध्ये बँक एटीएममधून रोख रक्कम काढणे आणि अन्य वित्तीय संस्थेच्या शाखेत चेक बुक देणे यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. एसबीआयने हा बदल बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट खात्यावर अर्थात बीएसबीडीवर लागू केला आहे. याअंतर्गत, आता एका महिन्यात केवळ … Read more

प्राजक्त तनपुरे यांच्याकडून जनतेला झुलवत ठेवण्याचे काम

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- विधानसभा निवडणुकीच्या काळात मुळा धरणाचे पाणी बीडला जाणार ही अफवा उठवून राहुरी मतदारसंघातील जनतेत संभ्रम निर्माण करणाऱ्यांनी मते मिळवण्यासाठी हा खटाटोप केला. आश्वासने देऊन त्यांच्याकडून जनतेला झुलवण्याचे काम सुरू आहे. आज राज्यात महाआघाडी सरकार असून तुम्ही व तुमचे मामा मंत्री आहेत. बीडला पाणी जाणार होते, तर लेखी पुरावा … Read more

हक्काचे पाणी द्यावे; न्यायालयाची जलसंपदाला नोटीस

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- श्रीरामपूर तालुक्याच्या हजारो शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यासाठी शेतकरी संघटनेचे अनिल औताडे व युवराज जगताप यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात रिट याचिका दाखल केली. आता या प्रकरणी जलसंपदा विभाग, जिल्हाधिकारी आणि नगरचे कार्यकारी अभियंता यांना २३ जून रोजी नोटिसा पाठवण्यात आल्या असून याबाबत सहा आठवड्यात म्हणणे सादर करण्यास सांगितले. … Read more

लग्नास नकार देणाऱ्या वराविरुद्ध विनयभंग व फसवणुकीचा गुन्हा

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- शासकीय नोकरीस असलेल्या एका ४७ वर्षीय घटस्फोटित विवाहितेची एका मॅट्रोमेनी अॅपवर नाशिक येथील एका शिक्षकाबरोबर ओळख झाली. त्याच्या मध्यस्तीने नाशिक येथील रहिवासी सुधाकर हिरामण पगारे यांच्याबरोबर ओळख झाली. दरम्यान ओळख वाढल्यावर दोघांनी शिक्षकाच्या मध्यस्थीने आपसांत लग्न करण्याचे ठरवले. २२ जून रोजी त्यांनी लग्न करण्याचे ठरवले. पण यातील नियोजित … Read more

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राला पुन्हा ‘बंदी राष्ट्र’ बनवू पाहताहेत…

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- डेल्टा विषाणूपासून बचाव की पळ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राला पुन्हा ‘बंदी राष्ट्र’ बनवू पाहात आहेत. दुपारी चार वाजताच शहराला टाळं लागणार आहे, रोजी रोटीसाठीचा झगडा पुन्हा सुरू होणार आहे, असं ट्वीट करून भाजपा प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. राज्यात Delta Plus Variant चे रुग्ण … Read more

वायुप्रदूषणामुळे कोरोना संसर्गाची भीती…

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- हवेत विविध प्रकारचे सूक्ष्मकण असतात. धूळ, परागकण, काजळी आणि धूर यांचे मिश्रण असलेले हे कण हानीकारक असतात. या कणांना चिकटून कोरोना विषाणू फुप्फुसात प्रवेश करू शकतात, असे एका अभ्यासातून निदर्शनास आले आहे. मुंबई आणि पुणे ही सर्वात संवेदनशील शहरे असल्याचे अभ्यासाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. हवेत विविध … Read more

तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर पुन्हा कठोर निर्णय : दुकाने चार वाजेपर्यंत राहणार खुली

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- राज्यातील निर्बंध कोरोनाच्या डेल्टा प्लस प्रादुर्भावाचा धोका आणि तिसऱ्या लाटेचा इशारा या पार्श्वभूमीवर पुन्हा कठोर करण्याचा निर्णय शुक्रवारी घेण्यात आला. हे जुनेच निर्बंध सोमवारपासून नव्याने लागू होणार आहेत.कठोर केलेल्या निर्बंधांनुसार सर्व दुकाने दुपारी ४ पर्यंतच खुली ठेवता येतील, तर अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने शनिवार-रविवार बंद राहतील. नागरिकांना सायंकाळी … Read more

रेसिडेन्शिअल हायस्कुलचे राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत यश

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे रेसिडेन्शिअल हायस्कुल अहमदनगर या विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रज्ञाशोध परीक्षेत यश संपादन केले आहे. या विद्यार्थ्यांची राज्य स्तरावरून राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. कु.ढगे संस्कृती (१६३ गुण), कु. कुलांगे संस्कृती (१५९ गुण). कु. नवले समृद्धी (१३८ गुण), ची. पवार आशिष (१२९ गुण), ची. … Read more

बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या कराव्यात

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- जिल्ह्याच्या काही भागात विशेषत: ग्रामीण भागात अद्यापही करोना बाधित रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने याबाबत बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींना शोधून त्यांच्या आरटीपीसीआर चाचण्या कराव्यात. असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिले. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी शुक्रवारी तालुकास्तरीय यंत्रणांशी दूरदृश्यप्रणालीद्वारे संवाद साधून करोना उपाययोजना बाबत मार्गदर्शन … Read more

दिलासादायक ! जिल्ह्यातील हे धरण झाले ओव्हरफ्लो

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :-मुळा पाणलोटातील हरिश्चंद्र गड, आंबितमध्ये मान्सून हजेरी लावली असल्याने मुळा नदीवर पाणी वाढल्याने आंबित पाठोपाठ 600 दलघफू क्षमतेचे पिंपळगाव खांड धरणही ओव्हरफ्लो झाले असून आता पाणी मुळा धरणाच्या दिशेने झेपावले आहे. उत्तर नगर जिल्ह्याचे जीवनदायिनी असलेल्या मुळा आणि भंडारदरा पाणलोटात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. दहा दिवसांपूर्वी मुळा पाणलोटात … Read more

विनयभंगाच्या गुन्ह्यातील आरोपीला तोफखाना पोलिसांकडून अटक

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- प्रेमसंबंध असताना लग्नास नकार देणाऱ्या मुलीचा विनयभंग केल्याची घटना नगर शहरात घडली होती. आता याच प्रकरणातील आरोपीला तोफखाना पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रगटीकरण शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. आकाश बाळू गायकवाड (रा. सिव्हील हाडको) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. आकाश विरोधात विनयभंगसह रिक्षा जाळपोळ केल्याप्रकरणी दोन गुन्हे दाखल … Read more

धुमाकूळ घालणाऱ्या ‘त्या’ भुरट्या भामट्यांचा बंदोबस्त करा

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील दारू पिऊन गावात दहशत निर्माण करणारे व भुरट्या चोरांचा बंदोबस्त करण्याची मागणी भोकर ग्रामपंचायतीने मासिक ठरावाद्वारे तालुका पोलिसांना केली आहे. दरम्यान तालुका पोलीस काय कारवाई करणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून तालुक्यातील भोकर गावात काहीजण दारू पिऊन सकाळपासून संध्याकाळपर्यंत गावात … Read more

अनलॉक होऊनही बससेवेला प्रवाश्यांचा अपेक्षित प्रतिसाद नाही

अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- लॉकडाऊनमुळे राज्य परिवहन महामंडळाच्या बसही थांबल्या होत्या. आता थोडी शिथिलता आल्याने अनेक भागात बस सुरू करण्यात आल्या आहेत. अनेक आगारातूनही बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले. मात्र, अपेक्षित प्रवासी नसल्याने बस पूर्ण क्षमतेने धावण्यास असमर्थ ठरत आहे. आगाराचा डिझेलचा खर्च वाया गेला असून, मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला. … Read more