कोरोनापेक्षा शहरातील निर्बंध अधिक जालिम फक्त टाळेबंदी व निर्बंधापुढे प्रशासनाचे डोके चालण्यास तयार नाही !

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- कोरोनापेक्षा त्याच्या प्रतिबंधासाठी शहरात घालण्यात आलेले निर्बंध अधिक जालिम ठरत असल्याचा आरोप पीपल्स हेल्पलाईनच्या वतीने करण्यात आला आहे. कोरोनाशी लढा देण्यासाठी फक्त टाळेबंदी व निर्बंधापेक्षा योग्य नियोजनाची आवश्यकता असून, महापालिका व पोलीस प्रशासनाने सर्वसामान्य नागरिकांना दंड करुन स्वत:ची पाठ थोपाटण्यापेक्षा अधिकाधिक लसीकरण होण्यासाठी नियोजन करण्याची गरज असल्याचे अ‍ॅड. कारभारी … Read more

आगामी १० दिवस राज्यासाठी महत्त्वाचे आणि काळजीचे : आरोग्यमंत्री

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- महाराष्ट्राला आता म्युकरमायकोसिस या अाजाराने घेरले आहे. राज्यात म्युकरमायकोसिसचे ८०० ते ८५० अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. या आजाराच्या रुग्णवाढीचा वेग पाहाता आपल्याला आता २ लाख इंजेक्शन्सची गरज आहे. आपण त्यासाठी प्रयत्न करत आहोत. हा साठा ३१ मेनंतर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पुढचे १० दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे आणि काळजीचे असणार आहेत, … Read more

मंत्री घरात बसून काम करतात, फडणवीस सर्वसामान्यांचे जीव वाचवण्यासाठी राज्यभर…

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :-  कोरोना काळात फडणवीस हे राज्यातील सामान्य माणसांच्या जीवाला जीव देऊन, प्रसंगी स्वतःचा जीव धोक्यात घालून घाबरलेल्या जनतेला अधार देण्याचे काम करीत आहेत. आज अनेक नेते, मंत्री घरात बसून जपून काम करीत आहेत. मात्र, फडणवीस यांनी संकटाळात प्रशासनावर नजर ठेवून त्यांना जागे करीत, सर्वसामान्यांचे जीव वाचवण्यासाठी राज्यभर दौरे करत आहेत. … Read more

अहमदनगरच्या करोना प्रतिबंधक कामाची खुद्द प्रधानमंत्र्यांनी घेतली दखल!

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :-  हिवरेबाजारने गावात आरोग्य  व स्वयंसेवकाच्या ४ टिम स्थापन करून गावातील प्रत्येक घराचा सर्व्हे केला. करोना लक्षण आढळणाऱ्या प्रत्येक रुग्णाच्या घराची आणि कुटुंबाची जबाबदारी या टीमने घेऊन रुग्णांना विलगीकरण कक्षात दाखल होण्यास प्रोत्साहित केले त्यामुळे रुग्णांची आता आपल्या घराचे आणि कुटुंबाचे काय होणार, शेतीभाती आणि दुध दुभत्याच्या कामाचे काय … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : हनीट्रॅप प्रकरणात आणखी एका आरोपीस अटक ! आलिशान फॉर्च्युनरही जप्त…

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :-  अहमदनगर जिल्ह्यातील बहुचर्चित जखणगाव येथील हनीट्रॅप प्रकरणामध्ये आत्तापर्यंत तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणामध्ये आता बापू सोनवणे या आरोपीस अटक केलीय, धक्कादायक म्हणजे बापू सोनवणे याच्यावर नगर शहरातील कोतवाली, पारनेर यासह विविध ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. तो रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. बापू सोनवणे याने त्या … Read more

हिवरे बाजार येथे कोवीड लसीकरणाचा दुसरा टप्पा पूर्ण!

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :-आदर्श गाव हिवरे बाजार ता.जि.अहमदनगर येथे कोविड -१९ च्या कोविशील्ड लसीकरणाचा दुसरा टप्पा दिनांक २० मे २०२१ रोजी यशस्वीरित्या पार पडला. यात एकूण ७० व्यक्तीना कोविशील्ड चे लसीकरण करण्यात आले. प्रामुख्याने हिवरे बाजार येथील कोरोनाच्या विविध पथकात काम करण्याऱ्या स्वयसेवकांना प्राधान्याने लसीकरण करण्यात आले. त्यात विशेष म्हणजे कुटुंब सर्वेक्षण … Read more

गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात तब्बल ३२ मृत्यू , जाणून घ्या तुमच्या परिसरातील कोरोनाचे सविस्तर अपडेट्स

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :-  जिल्ह्यात आज ४१०७ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २ लाख २१ हजार १३७ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९१.३७ टक्के इतके झाले आहे. तसेच गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात तब्बल ३२ मृत्यू झाले आहेत,अहमदनगर जिल्ह्यात आज रूग्ण संख्येत … Read more

ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांना मिळणार भरीव निधी – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- राज्यामधील ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांसाठी पंधराव्या वित्त आयोगातून वित्तीय वर्ष 2021-22 मधील पहिल्या हप्त्यापोटी 861 कोटी 40 लाख रुपयांचा बेसिक / अनटाईड (अबंधीत) निधी प्राप्त झाला आहे. हा निधी जिल्हा परिषदांना वर्ग करण्यात येत असून तेथून तत्काळ पंचायत समित्या व ग्रामपंचायतींना वितरीत करण्यात येईल, अशी माहिती ग्रामविकास … Read more

मागणी वाढल्याने सोन्याच्या दरात वाढ

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- पिवळा धातू सुरक्षित मानला जातो यामुळे सोन्याचे दर वाढतच आहेत. तर क्रूड, बेस मेटलसारखे जोखिमीचे धातू बुधवारच्या व्यापार सत्रात मोठ्या प्रमाणावर घसरले. विकसित जगात चलनवाढीची चिंता, आशियातील वाढती कोरोना रुग्णसंख्या आणि लॉकडाऊनमुळे तेलाच्या मागणी घट होण्याच्या शक्यतेमुळे कमोडिटी मार्केट अस्थिर राहिले असल्याचे एंजल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व … Read more

माजी आमदार कोल्हे यांनी मंजूर केलेल्या कामाचे श्रेय घेऊ नये !

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- कोपरगाव नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीची दुरवस्था झाली होती. या इमारतीच्या कामासाठी निधी मिळावा म्हणून स्नेहलता कोल्हे यांनी तत्कालीन नगरविकास मंत्री देवेंद्र फडणवीस आणि या खात्याचे राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे ३० मे २०१६ रोजी पत्रव्यवहार व पाठपुरावा करून या कामासाठी निधी मिळवला होता. निधीतील पहिल्या रकमेचा हप्ता २ कोटी रुपये … Read more

नगर तालुक्यातील या गावात जनता कर्फ्यू !

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- नगर तालुक्यातील मांडवे येथे कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे बुधवार दि.१९ पासून ते शनिवार दि.२९ पर्यंत ग्रामपंचायतीने जनता कफ्र्यू पुकारला आहे. या अंतर्गत कडक निर्बंध जारी करण्यात आले आहेत, अशी माहिती सरपंच सुभाष निमसे यांनी दिली. मांडवे गावामध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. सद्यस्थितीत सक्रीय रुग्णांची संख्याही काळजी … Read more

५.८६ कोटी लसींचे डोस मोफत !

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- देशात गेल्या १ मे पासून देशव्यापी लसीकरण मोहीम राबविली जात असतानाच आगामी १५ जूनपर्यंत राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना तब्बल ५.८६ कोटी एवढ्या मोठ्या प्रमाणावर लसींचे डोस मोफत स्वरूपात देणार असल्याची घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने बुधवारी केली आहे. भविष्यात लस उत्पादक कंपन्यांकडून थेट लस खरेदी करण्याची मुभा दिल्याने राज्यांना ४.८७ … Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या निर्णायामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा – आ.विखे पाटील

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- आंतरराष्ट्रीय पातळीवर खतांसाठी लागणाऱ्या रसायनांच्या किंमतीत वाढ झाली तरीही डीएपी खतांच्या वाढीव अनुदानासाठी १४,७७५ कोटी रुपयांचा बोजा सोसून शेतकऱ्यांना मागील वर्षीच्या जुन्याच भावाने रासायनिक खत उपलब्ध करून देण्याचा पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याची प्रतिक्रिया आ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. आ.विखे पाटील यांनी सांगितले … Read more

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अहमदनगर जिल्ह्याने राबविलेल्या उपाययोजनांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून दखल

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- कोरोना प्रतिबंधासाठी अहमदनगर जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांची दखल खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली. पंतप्रधान मोदी यांनी आज देशातील निवडक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी यांच्याशी दूरदृश्यप्रणालीद्वारे थेट संवाद साधला. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसले यांनी, जिल्ह्यात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजना, केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशाची यशस्वी अंमलबजावणी, माझे कुटुंब … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील त्या हनीट्रॅप करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ! केवळ पैशासाठी…

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- अश्लील व्हिडीओ क्लिप तयार करून एका अधिकाऱ्याकडे तब्बल तीन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार अहमदनगर जिल्ह्यात घडला आहे. प्रेमाचे आमिष दाखवून अश्लील व्हिडीओ क्लिप तयार करून एका महिलेने तिच्या साथीदारांसोबत एका अधिकाऱ्याकडे ही खंडणी मागतली आहे. महिलेने अधिकाऱ्यासोबत प्रेमाचा बनाव केला आणि त्यानंतर अश्लील व्हिडीओ क्लिप तयार केली. … Read more

अहमदनगर ब्रेकिंग : मयत रुग्णांच्या नातेवाईकांचा रुग्णालयात रात्री 1 वाजता राडा ! डॉक्टरला मारहाण करत तोडफोड…

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- कोरोनाचा राज्यात हाहाकार दिसून येत आहे. देशात सर्वाधिक रुग्ण असलेले महाराष्ट्र राज्य हे पहिले ठरले आहे. कोरोनामुळे येथे मोठ्या प्रमाणात परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. कोरोनाचे थैमान सुरु आहे. काही डॉक्टर त्यांच्या परीने सर्वोत्तम असे काम करत आहेत मात्र तरीही त्यांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. अशीच एक घटना नगर … Read more

अहमदनगर जिल्ह्यातील या शेतकऱ्याने केला विक्रम दोन एकर ऊसात तब्बल सात…

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- राहुरी तालुक्यातील ब्राम्हणी येथील सर्व सामान्य शेतकरी आप्पासाहेब काशिनाथ हापसे यांनी दोन एकर ऊसाच्या खोडव्यात तब्बल सातप्रकारची विविध पिके आंतरपीक म्हणून घेतले आहे. आप्पासाहेब हापसे यांना जेमतेम अडीच एकर शेती. शेतीला जोड व्यवसाय म्हणून अनेक वर्षापासून ते पशूपालन करताय.त्यासाठी अर्धा एकर क्षेत्रात चारा (घास, गिन्नी गवत) पीक आहे.दोन … Read more

पैशासाठी मयत कोरोनाबाधितावर ३ दिवस उपचार !

अहमदनगर Live24 टीम, 20 मे 2021 :- नांदेड शहरात कोरोनाग्रस्त व त्यांच्या नातेवाइकांची खासगी हॉस्पिटलकडून मोठ्या प्रमाणात लूट सुरू आहे. याकडे जिल्हा व मनपा प्रशासनाकडून सोयिस्कर डोळेझाक होत आहे. शहरातील हिंगोलीगेट परिसरात असलेल्या गोदावरी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेला कोरोनाबाधित रुग्ण २१ एप्रिल रोजी मरण पावल्यानंतरही मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणाऱ्या गोदावरी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी त्याच्यावर ३ दिवस … Read more