Ahmednagar Breaking : नगरमध्ये काय सुरु आहे ! ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, १०० आरोपी ताब्यात.. पोलिसांची मोठी कारवाई

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Ahmednagar Breaking : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंघाने पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. जिल्ह्यातील सर्वच अवैध गोष्टींवर त्यांचा वॉच आहे. आता स्थानिक गुन्हे शाखेने सर्वात मोठी कारवाई केली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुशंघाने अवैध दारू विरोधात मोहीम आखत हॉटेल, वाहतूक आदींवर कारवाई करत 95 गुन्हे दाखल करुन 100 आरोपींना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 11 लाख 37 हजार 961 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती समजली आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना अहमदनगर जिल्ह्यामध्ये हॉटेलवर विनापरवाना बेकायदा दारु विक्री करणाऱ्या इसमांविरुध्द कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत. त्यानुसार आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची विविध पथके तयार करुन जिल्ह्यामध्ये हॉटेलवर विनापरवाना बेकायदा दारु विक्री करणारे व वाहतूक करणा-या इसमांची माहिती घेतली व त्यांच्या विरोधात कारवाई करणेबाबत मार्गदर्शन करुन पथके रवाना केली.
या पथकांनी दिनांक 30 मार्च 2024 ते दिनांक 2 मार्च 2024 या कालावधीमध्ये 95 गुन्हे दाखल करुन 100 आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 11 लाख 37 हजार 961 रुपये किमतीची देशी विदेशी व गावठी हातभट्टीची दारु व एक स्विफ्ट कार जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर वैभव कलुबर्मे व जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार आदींच्या पथकाने केलीये.