जिल्ह्यात बायोडिझेल घेवून जाणारे दोन टँकर पकडले !

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 02 जानेवारी 2022 :-   जिल्ह्यात बायोडिझेलचा काळ बाजार काही थांबत नसल्याची चिन्हे दिसत आहेत. नुकतेच बायोडिझेल घेवुन जाणारे दोन टँकर पोलिसांनी पकडले आहेत.(Ahmednagar Police)

या कारवाईत तब्बल ७३ लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला असून, बनावट कंपनीच्या नावाने विनापरवाना व बेकायदेशीरपणे ही वाहतूक करताना पोलिसांनी पकडले आहेत.

ही कारवाई पाथर्डी तालुक्यात केली असून याप्रकरणी नांदेड व गुजरात राज्यातीलदोन कंपन्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पोलिसांना या भागातून टँकरव्दारे बायोडिझेलची वाहतूक करत असल्याची माहिती दिली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी या भागात अपले लक्ष केंद्रीत केले होते.

पोलिस संशयित टँकरचा शोध घेत असताना तालुक्यातील शेकटे शिवारात दोन संशयित टँकर पोलिसांना आढळून आले. पोलिस कर्मचाऱ्यांनी टँकर चालकाकडे चौकशी केली असता त्यांनी मोबाईलमध्ये असलेले कागदपत्र दाखविले.

पोलिसांचा संशय वाढला आणि त्यांनी टँकर पोलिस ठाण्यात आणले. टँकर चालकाकडे चौकशी केल्यानंतर त्यांनी श्री काशिविश्वनाथ इंफ्राफोजेक्टस प्रा.लि.अशोकनगर नांदेड व अग्रवाल एंटरप्रायजेस वकीलवाडीजवळ बार्डोली रोड सुरत यांचे हे डिझेल असल्याचे सांगितले.

मात्र अद्याप देखील संबंधित कंपनीच्यावतीने कोणत्याही प्रकारे संबंधीत मुद्देमाल आमचाच असल्याचा दावा केलेला नाही. त्यामुळे पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त केला आहे.