Cat Woman : व्यक्ती तितक्या प्रकृती असे म्हणतात. अनेक लोक आपल्या आवडी जपण्यासाठी वेगळे प्रयोग करू पाहतात. असाच एक प्रयोग एका तरुणीने केला आहे. कियारा डेल’अबेट नावाच्या या तरूणीने चक्क आपण मांजरासारखे बनण्यासाठी आपल्या शरीरामध्ये अनेक बदल घडवून घेतले आहेत.
इटलीच्या रोममध्ये राहणाऱ्या या तरुणीने आपल्या शरीरात इतके बदल केले आहेत की ती माणसासारखी कमी आणि मांजरासारखी जास्त दिसते. कियारा डेल’अबेट असे तिचे नाव असून, तिनेआपल्या शरीरात 20 बदल केले आहेत. मांजर बनण्याचे तिचे नेहमीच स्वप्न होते. यामुळे ती अशा प्रकारे स्वत: ला बदलत राहिली. दरम्यान, TikTok वर तिचे अनेक व्हिडिओ देखील पोस्ट केले आहेत. ज्याला लाखो लोकांनी पाहिले आहे. आणि सोशल मीडियावर लोक तिला यासाठी खूप ट्रोल सुद्धा करत आहेत.
न्यूयॉर्क पोस्टच्या रिपोर्टनुसार, कियारा म्हणते की ती तिच्या घरी पूर्णपणे ठीक आहे. तसेच, तिला तिच्या जीवनशैलीबद्दल कोणतीही समस्या नाही. २२ वर्षीय कियारा म्हणते की, मी खूप चांगली कॅट वूमन आहे. वयाच्या 11 व्या वर्षापासून तिने स्वतःमध्ये बदल करायला सुरुवात केली. मग तिने पहिल्यांदा कान टोचणे आणि स्ट्रेचिंग केले.
पाच वर्षांनंतर तिच्या शरीरात ७२ छिद्रे पाडण्यात आली. कियाराने तिची जीभ समोरून दोन भागात विभागली असून, कपाळावर दोन शिंगेही केली आहेत. यासोबतच तिच्या कपाळावर आणि नाकावर अनेक छिद्रे आहेत. दरम्यान, तिच्या TikTok वरील एक व्हिडिओ 65 दशलक्षाहून अधिक लोकांनी पाहिला आहे. यामध्ये ती आपली जीभ दाखवताना दिसत आहे.
कियाराने पापण्यांखालील त्वचेची अतिरिक्त चरबी काढून टाकण्यासाठी कॉस्मेटिक सर्जरी केली आहे. त्याच्या दोन्ही डोळ्यांवर टॅटूही काढले आहेत. तिला मानवी रूपात मांजर व्हायचे आहे.
ती म्हणते , ‘मानवी शरीर किती बदलू शकते आणि शारीरिक बदलांमुळे तुम्ही खरोखर काय साध्य करू शकता हे पाहणे वेडेपणाचे आहे.’ कियारा म्हणते, ‘मला वाटते की मांजर स्त्री असणे माझ्यासाठी अधिक योग्य आहे कारण मला खरोखरच कार्टून पात्रासारखे दिसायचे नाही.
मला नेहमीच मांजरी आवडतात आणि मला वाटते की शरीरात योग्य बदल करून कॅट वूमन बनण्याइतपत मी शूर आहे. पूर्णपणे मांजरीसारखे दिसण्यासाठी मला कॅट आय लिफ्ट किंवा कॅन्थोप्लास्टीची आवश्यकता आहे. लांब आणि नैसर्गिकरित्या बदामाच्या आकाराचे डोळे मिळविण्यासाठी, शस्त्रक्रिया, दातांचा आकार बदलणे, वरचे ओठ कापणे आणि अधिक आवश्यक आहेत.