Ahmednagar Politics : अहमदनगरच्या मैदानात स्वतः शरद पवार ! राजकीय गणिते घेऊन येणार, होणाऱ्या गाठीभेटी संभ्रमित करणार

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Ahmednagar Politics : महाराष्ट्रात पक्षांच्या फुटाफुटीचे राजकारण झाले. यात महाराष्ट्रातील भक्कम दोन पक्ष एक म्हणजे राष्ट्रवादी व शिवसेना हे दोन्ही पक्ष फुटले. सध्या महाराष्ट्राचे लक्ष शरद पवार यांच्याकडे लागेलेले आहे.

कारण त्यांच्यापुढे असणारे आव्हाने पाहता व ते कितीही आव्हाने असले तरी त्याचे संधीत रूपांतर करण्याची असणारी त्यांची क्षमता यामुळे ते आत काय राजकीय खेळी करतील याकडे लक्ष लागले आहे. शरद पवार यांनी लोकसभेला आतापर्यंत सात उमेदवार निश्चित केले आहेत.

ते आता या उमेदवारांसाठी काय करतात व कसा राजकीय डाव खेळतात या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यात आता ते जवळपास ५० सभा घेणार आहेत. अहमदनगर जिल्ह्यात त्यांचा उमेदवार निलेश लंके हे आहेत. स्वतः पवार या आखाड्यात उतरणार असून ६ सभा अहमदनगरमध्ये होणार आहेत.

अहमदनगरच्या मैदानात स्वतः शरद पवार
अहमदनगरची जागा जिंकायची यासाठी शरद पवार हे स्वतः मैदानात उतरणार आहेत. नीलेश लंके यांनी सध्या प्रचारही जोरदार सुरु केला आहे. नीलेश लंकेंनीदेखील आमदारकी पणाला लावत लोकसभाला उभे राहत प्रचार सुरु केलाय.

शरद पवार नीलेश लंकेंच्या प्रचारासाठी सहा सभा अहमनगरमध्ये घेतायेत. त्यात पहिली सभा 19 एप्रिलला सायंकाळी नगर शहरातील गांधी मैदानात, दुसरी सभा 25 एप्रिलला शेवगाव, 28 एप्रिलला राहुरी, 6 मे रोजी कर्जत, 8 मे रोजी श्रीगोंदा, 11 मे रोजी नगर शहरात असा सहा सभा होणार आहेत.

राजकीय गणिते, होणाऱ्या गाठीभेटी संभ्रमित करणार
शरद पवार नगरच्या मैदानात स्वतः उतरत सहा सभा घेणार आहेत. शरद पवार हे फक्त सभेला येत नसतात तर येताना त्यामागील राजकीय गणिते घेऊन येत असतात. ही गणिते स्थानिक नेत्यांभोवती कशी पेरायची हे त्यांना चपखल जमत असते.

हे झाले सभेचे पण त्या सभेच्या नंतर शरद पवारांच्या होणाऱ्या गाठीभेटी बराच राजकीय संभ्रम निर्माण करून गुंता वाढवत असतात व ही धास्ती भल्याभल्या विरोधकांना असते असे राजकीय विश्लेषक सांगत असतात.