…. म्हणून मला शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळाली नाही, रामदास आठवले यांचे विधान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Shirdi Loksabha Election : अहमदनगर जिल्ह्यातील नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघ या दोन जागांवरील महायुती मधील आणि महाविकास आघाडी मधील अधिकृत उमेदवार नुकतेच ठरले आहेत.

यानुसार नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून भाजपाने उमेदवार दिलेला आहे. या जागेवर भाजपाने विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे. दुसरीकडे नगर दक्षिण मधून महाविकास आघाडीच्या शरद पवार गटाने निलेश लंके यांना उमेदवारी दिलेली आहे.

निलेश लंके आधी अजितदादा यांच्या गटात होते आता मात्र ते शरद पवार यांच्या गटात असून ते या जागेवरील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार बनले आहेत. यामुळे नगर दक्षिणची यंदाची निवडणूक काटेदार होणार आहे. दुसरीकडे शिर्डी लोकसभा मतदारसंघाबाबत बोलायचं झालं तर या जागेवर महाविकास आघाडीच्या UBT शिवसेना पक्षाने माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना तिकीट दिले आहे.

ते तिकिटासाठीच उबाठा शिवसेनेत आले होते, अन त्यांना ते मिळाले सुद्धा आहे. दुसरीकडे या जागेवरून महायुती मधील एकनाथ शिंदे गटाने उमेदवार दिलेला आहे. शिर्डी मधून एकनाथ शिंदे गटाने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांच्यावरच विश्वास दाखवलेला आहे.

खरेतर शिर्डी लोकसभा मतदारसंघातून महायुतीमध्ये समाविष्ट असलेल्या रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले हे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. मात्र महायुतीने त्यांना तिकीट दिले नाही. दरम्यान रामदास आठवले यांनी आपल्याला तिकीट का मिळू शकले नाही याबाबत मोठे विधान केले आहे.

काय म्हटले आठवले

उमेदवारी बाबत बोलताना आठवले यांनी असे म्हटले की, त्यांची शिर्डीतून निवडणूक लढवण्याची इच्छा होती, माजी मुख्यमंत्री तथा वर्तमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील यासाठी आग्रही होते. यासाठी त्यांनी प्रयत्न देखील केलेत. पण यामुळे शिंदे यांची अडचण झाली.

शिर्डीत शिवसेनेचा खासदार असल्यानं शिंदेंची अडचण झाली होती. खरे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ज्यावेळी शिवसेना फुटली तेव्हा त्यांच्यासोबत आलेल्या खासदारांना लोकसभेला तुम्हालाच तिकीट देण्यात येईल, असं आश्वासन दिले होते.

हेच कारण आहे की मला शिर्डी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळू शकली नाही, असं स्पष्टीकरण यावेळी आठवले यांनी दिले आहे. विशेष म्हणजे आठवले यांनी त्यांचा राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा राज्यसभेसाठी संधी दिली जाईल असे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याचे म्हटले आहे.

रिपाईकडे सध्या केंद्रात राज्यमंत्रीपद आहे, पण देवेंद्र फडणवीस यांनी आठवले यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यासाठी प्रयत्न केले जातील अस आश्वासन दिले असल्याचा दावा केंद्रीय मंत्री आठवले यांनी केला आहे.

शिवाय महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक झाली की राज्यात एक मंत्रिपदं, विधान परिषदेची आमदारकी, दोन महामंडळांचं चेअरमनपद, सदस्यपद, जिल्हा तालुक्याच्या कमिट्या, एसईओमध्ये आरपीआयला प्राधान्य मिळणार असल्याची माहिती सुद्धा रामदास आठवले यांनी दिली आहे.