‘सुजय विखे हे पुढच्या मोदी मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री होणार, पण….’ माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांच्या फटकेबाजीची नगरभर चर्चा

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Shivaji Kardile On Sujay Vikhe Patil : आज भारतीय निवडणूक आयोगाने आगामी अठराव्या लोकसभेसाठी निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सतराव्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून 2024 ला संपत आहे. यामुळे निवडणूक आयोगाने आज निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ज्या लोकसभा निवडणुकांची आतुरतेने वाट पाहिली जात होती त्या निवडणुकांची आज निवडणूक आयोगाने घोषणा केली असल्याने मतदारराजांची आतुरता आता संपुष्टात आली आहे.

आता मतदारराजांचे सारे लक्ष मतदानाकडे लागले आहे. दरम्यान, आगामी मतदानासाठी राजकीय पक्षांच्या आणि राजकीय नेत्यांच्या माध्यमातून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे.

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात देखील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू झाल्याचे पाहायला मिळाले आहे. खरे तर अहमदनगर जिल्ह्यात लोकसभेच्या दोन जागा आहेत.

शिर्डी लोकसभा मतदारसंघ आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ या त्या दोन जागा. यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा महायुतीकडून एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे जाणार असे चित्र आहे तर दुसरीकडे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ हा महायुतीकडून भाजपाच्या वाट्याला आला आहे.

भाजपाने या जागेसाठी विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. आगामी निवडणुकीत भाजपाने 400 खासदार निवडून आणण्याचा चंग बांधला आहे. यासाठी बीजेपीने जोरदार तयारी केली आहे.

भाजपने 2024 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएच्या 400 जागा येतील आणि यातील 370 जागा एकटा भाजप जिंकेल असा विश्वास बोलून दाखवला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय नेतृत्वाने जोरदार तयारी सुरू केली आहे. बीजेपीचे नेते आता जनसंपर्क वाढवण्यासाठी आपापल्या मतदारसंघात जोरदार तयारी करत आहेत.

काहींनी तर आधीपासूनच तयारी सुरू केली आहे. सुजय विखे पाटील यांनी देखील आगामी निवडणुकीची तयारी गेल्या काही महिन्यांपासून सुरू केली आहे. त्यांनी मध्यंतरी चणाडाळ आणि साखर वाटपाच्या माध्यमातून मत पेरणी केली होती.

दरम्यान, सुजय विखे पाटील हे आगामी मोदी मंत्रिमंडळात मंत्री होतील असा विश्वास माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केला आहे. ते नगर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती व नियुक्ती उप बाजार समिती आवारातील रस्ता डांबरीकरण कामाच्या शुभारंभ प्रसंगी बोलत होते. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले यांनी आपल्या भाषणात तुफान फटकेबाजी केली.

यामुळे त्यांचे हे भाषण सध्या संपूर्ण नगरभर चर्चेस आले आहे. त्यांनी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून नगर जामखेड काँक्रिटीकरण रस्त्यासाठी 657 कोटी रुपये मंजूर झाले असल्याची माहिती यावेळी दिली.तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढील मंत्रिमंडळात खा. डॉ. सुजय विखे पाटील हे मंत्री होणार आहेत.

लोकसभेची निवडणूक लढवणे ही सोपी गोष्ट नाही मी सुद्धा निवडणूक लढवली होती त्यामध्ये माझा पराभव झाला होता. लोकसभा निवडणूक फक्त विखे कुटुंबियांनीच. सुजय विखे पाटील मंत्री झाल्यानंतर आम्हाला विसरून जाऊ नका म्हणजे झालं, अशी चौफेर फटकेबाजी यावेळी कर्डिले यांनी केली.