शाहरुख खान पासून तर प्रभास पर्यंत..! डिसेंबर मध्ये रिलीज होतायेत ‘हे’ 4 ऍक्शनफूल सिनेमे

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आजकाल मनोरंजनाला जास्त प्राधान्य दिले जाते. यात जर सिनेमा असेल तर मग विषय काही औरच. सध्या अनेक नवनवीन सिनेमे रिलीज होत आहेत. यावर्षी अनेक नवनवीन सिनेमे रिलीज झाले. या सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. यात गदर २, जवान, पठाण आदी सिनेमांचा समावेश होईल. सिनेमा प्रेमींना आगामी सिनेमाविषयी उत्सुकता लागलेली असते. येणाऱ्या सिनेमांविषयी ते नेहमीच माहिती घेत असतात. आता या वर्षाचा शेवटही खूप चांगला जाणार आहे. याचे कारण असे की, डिसेंबर महिन्यात अनेक चित्रपट रिलीज होणार आहेत. हे सिनेमे रिलीज होण्याआधीच प्रचंड गाजले आहेत. याठिकाणी आपण डिसेम्बर महिन्यात येणाऱ्या सिनेमांविषयी जाणून घेऊयात –

शाहरुख खानचा डंकी
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याचा ‘डंकी’ सिनेमा डिसेम्बर मध्ये येणार आहे. त्याच्या यावर्षीच्या ‘पठाण’ आणि ‘जवान’ या दोन्ही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली. आता त्याचा आगामी सिनेमा ‘डंकी’ 21 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. राजकुमार हिराणी यांनी या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून या चित्रपटात शाहरुख खानसोबत तापसी पन्नू, विकी कौशल आणि बोमन इराणी देखील दिसणार आहेत.

बहुप्रतीक्षित अ‍ॅनिमल
रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ हा चित्रपट सध्या चर्चेत असून त्याचा टीझर प्रचंड लोकप्रिय ठरला. याशिवाय चित्रपटातील गाणीही सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहेत. या सिनेमात रणबीर कपूर, रश्मिका मंदान्ना, अनिल कपूर, बॉबी देओल आदी स्टार दिसणार आहेत. हा सिनेमा 1 डिसेंबरला थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

बहुचर्चित सालार
प्रभास म्हटलं की ऍक्शन आलीच. हा बहुचर्चित सिनेमा 22 डिसेंबर 2023 रोजी प्रदर्शित होईल. सालार व शाहरुख खानच्या डिंकी या चित्रपटात टक्कर होईल. या चित्रपटात प्रभास, पृथ्वीराज सुकुमारन आणि श्रुती हसन यांच्या प्रमुख भूमिका आहेत. त्यामुळे वर्षाच्या शेवटी दोन जबरदस्त सिनेमे प्रेक्षकांना पाहायला मिळतील.

विकी कौशलचा सॅम बहादुर
विकी कौशलचा सॅम बहादुर हा हिंदी सिनेमा 1 डिसेंबरला रिलीज होतोय. यात विकी कौशल मुख्य भूमिकेत असून भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या जीवनावर आधारित या सिनेमाची संकल्पना आधारलेली आहे. 1971 च्या पाकिस्तानसोबतच्या युद्धात सॅम माणेकशॉ यांनी केवळ 13 दिवसांत शत्रूंना शरणागती पत्करण्यास भाग पाडले होते. त्याचन्ह्याचं जीवनावर आधारित हा सिनेमा असेल.