जगातील या घटनेवरून तुम्हाला कळेल आदित्य एल 1 मिशनचे महत्त्व! वाचा 1989 मध्ये काय घडले होते?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अवकाशातील अनेक ग्रह आणि ताऱ्यांचा विचार केला तर त्यामध्ये असे अनेक रहस्यमयी बाबी आहेत की त्यांचा थेट परिणाम हा कुठल्या ना कुठल्या प्रकारे पृथ्वीवर होत असतो. अजूनही शास्त्रज्ञांना अवकाशातील अनेक ग्रहांच्या बाबतीत अनेक गोष्ट अनाकलनीय असून त्याचाच अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून जगाच्या पाठीवरील शास्त्रज्ञ  मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करत आहेत. नुकतेच 23 ऑगस्ट 2023 रोजी भारताच्या चांद्रयान तीन ही मोहीम यशस्वी झाली.

अनेक अंगाने या मोहिमेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.त्यातील पहिले म्हणजे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग करणारा भारत हा पहिला देश ठरला आणि दुसरे म्हणजे चंद्रावर मानव वस्ती करण्याचा दृष्टिकोन तसेच इतर खनिजे किंवा वातावरणीय माहितीचा अभ्यास करण्याच्या दृष्टिकोनातून देखील या मोहिमेचे महत्व अनन्यसाधारण आहे. या मोहिमेमध्ये 14 दिवस दक्षिण ध्रुवावर भारताचे विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर यांच्या माध्यमातून अभ्यास करण्यात येणार आहे.

त्याच्यानंतर काल भारताने आदित्य एल 1 श्रीहरीकोटा येथून अकरा वाजून पन्नास मिनिटांनी यशस्वीपणे लॉन्च केले. या मोहिमेचा उद्देश म्हणजे सूर्याशी संबंधित जे काही महत्त्वाच्या बाबी आहेत ज्या अजून माहिती नाहीत त्या उलगडणे हा आहे. कारण सूर्यावर होणारे अनेक घटनांचा अप्रत्यक्षरत्या परिणाम हा पृथ्वीवर देखील होत असतो व याच दृष्टिकोनातून या मिशनचे महत्त्व खूप आहे.

आता तुम्ही म्हणाल की काही लाख किलोमीटर असणाऱ्या सूर्याचा काय परिणाम पृथ्वीवर होत असेल? पण तसे नसून जगातील एका घटनेचे जर आपण उदाहरण घेतले तर यावरून सूर्यावरील घटनांचा पृथ्वीवर कसा परिणाम होऊ शकतो याची कल्पना आपल्याला येऊ शकते. नेमकी जगाच्या पाठीवर अशी काय घटना घडली होती की आपल्याला सूर्य मिशनचे महत्त्व समजू शकते.

 आदित्य एल 1 मिशनचे महत्त्व आणि जगातील घटना

जर आपण सूर्याचा विचार केला तर या ठिकाणी सर्व वादळे आणि त्या माध्यमातून सौर ज्वाला निर्माण होतात.यापासून निघालेल्या सौर ज्वाला जर पृथ्वीपर्यंत आल्या किंवा पृथ्वीच्या दिशेने थोड्या जरी सरकल्या तरी मोठ्या प्रमाणावर हानी घडवू शकतात. याचेच एक उदाहरण साधारणपणे 34 वर्षांपूर्वी म्हणजेच 1989  कॅनडा या देशाच्या क्युबेक नावाच्या प्रांतामध्ये घडली होती.

तो दिवस होता साधारणपणे तीन मार्च 1989 चा. या दिवशी क्यूबेक प्रांत हा अचानक अंधारात बुडाला होता व लाईट देखील गेली होती. यामुळे अनेक लोक लिफ्ट मध्ये अडकले होते व काही कार्यालयांमध्ये तर काही घरी अंधारात कैद झाले होते. दुकाने तसेच सगळे व्यवसाय अचानक ठप्प झाले होते व मेट्रो सेवा देखील बंद पडली होती. एवढेच काय तर त्या ठिकाणचे डोरवळ नावाचे विमानतळ पूर्णपणे बंद करावे लागले होते

व साधारणपणे बारा तास पर्यंत वीज पुरवठा खंडित होता. जगाच्या पाठीवर असे लाईट अचानक बंद होण्याचे अनेकदा प्रकार घडतात. परंतु ही जी घटना घडली ही जरा वेगळी होती. कारण ही जी ब्लॅक आउट म्हणजेच अंधाराची घटना या प्रांतात घडली ती सूर्यावर निर्माण झालेल्या सौर वादळामुळे घडली होती व याची पुष्टी खुद्द नासाने देखील केली होती. नासाने याबाबत संपूर्णपणे माहिती देताना म्हटले होते की 10 मार्च 1989 या रोजी अंतराळ शास्त्रज्ञांना सूर्यावर एक मोठा आणि शक्तिशाली स्फोट झाल्याचे दिसून आले.

काही मिनिटाच्या आतच सूर्याच्या ज्या काही चुंबकीय शक्ती असतात त्यामुळे  अब्जावधी  टन वायू बाहेर सोडला गेला. या स्फोटाची भयानकता एवढी होती की एकाच वेळी हजारो अणुबॉम्ब स्फोटा इतका तो शक्तिशाली होता. त्यानंतर हा स्फोट झाला व प्रचंड वायू ढगांच्या रूपामध्ये ताशी दहा लाख मैल वेगाने पृथ्वीकडे सरकला व सौर ज्वालामुळे शॉर्ट वेव्ह रेडिओ विस्कळीत झाले. युरोपमध्ये रेडिओ सिग्नल जाम झाले  व या सगळ्यांचा परिणाम होऊन ही घटना घडली.

त्यानंतर या घटनेच्या दोनच दिवसानंतर म्हणजेच 12 मार्च 1989 ला सौर प्लाझ्माचा एक मोठा ढग पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रामध्ये अडकला. हा जो काही सौर प्लाजमा असतो तो एक वायू असतो व त्यामध्ये विद्युत चार्ज असलेले कण असतात. या भू चुंबकीय वादळामुळे होणारी चुंबकीय गडबड खूप शक्तिशाली होती व त्यामुळे उत्तर अमेरिकेत जमिनीखाली विद्युत प्रवाह निर्माण झाला होता व 13 मार्च रोजी पहाटे तीन वाजून 45 मिनिटाच्या सुमारास या विद्युत प्रवाहने क्यूबेक प्रांतातील जे काही पावर ग्रिड होते

ते संपूर्ण ठप्प झाले होते व संपूर्ण राज्य अंधारात बुडाले होते. या घटनेवरून दिसून येते की सूर्यावर घडणारी घटना देखील पृथ्वीवर कसे परिणाम करू शकते? यावरून आपल्याला दिसून येते की सूर्यावर जर डिस्टर्बन्स निर्माण झाले तर पृथ्वीवर मोठा विनाश होऊ शकतो.

 आदित्य एल 1 कसा करेल अभ्यास?

भारताचा आता हा उपग्रह सौर हालचालीबद्दल जे काही वैज्ञानिक ज्ञान आतापर्यंत मिळाले आहे त्यामध्ये भर टाकण्याचे काम करेल. त्यामुळे सूर्याच्या संबंधीत ज्या काही अनाकलनीय आणि माहिती नसलेल्या बाबी आहेत त्या देखील करण्यास मदत होईल. 125 दिवसांमध्ये पृथ्वीपासून पंधरा लाख किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आदित्य हे सूर्याच्या सर्वात जवळच्या मानला जाणारा जो काही लँग्रेनजीयन पॉईंट एल 1 आहे त्याच्या भोवती प्रभामंडळ कक्षेमध्ये स्थापित होणार आहे

व त्या ठिकाणाहून सूर्यावर होणाऱ्या अनेक प्रकारच्या घडामोडी व त्यांचा अभ्यास आता केला जाणार आहे. कारण हा जो काही पॉईंट आहे या पॉईंट वरच पृथ्वी आणि सूर्याची गुरुत्वाकर्षण शक्ती ही संतुलित होते. अशा पद्धतीने भारताच्या आदित्य  एल 1 मोहिमेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.