नाही अंबानी,नाही अदानी लवासाचे मालक आहेत हे उद्योगपती! वाचा त्यांची ए टू झेड माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बऱ्याच वर्षापासून आपण लवासा या सिटीचे नाव ऐकले असेल. हे भारतातील पहिले खाजगी हिल स्टेशन असून हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांचे ड्रीम सिटी म्हणून देखील ओळखले जाते. हे ठिकाण अतिशय नयन रम्य असून अतिशय सुंदररित्या हा प्रकल्प साकारण्यात आलेला आहे. लवासा सिटी बसवण्याच्या बाबतीतली पार्श्वभूमी पाहिली तर  राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार विदेश दौऱ्यावर असताना त्यांना लवासात हिल स्टेशन उभारण्याची कल्पना सुचली होती.

तसेच मुंबईवरून जेव्हा ते पुण्याला जात होते तेव्हा मावळच्या जवळून जात असताना त्यांना या लवासा हिल स्टेशनसाठी एक जागा देखील मिळाली होती व यातूनच लवासाचा प्रवास सुरू झाला होता. तो मध्यंतरीच्या कालावधीमध्ये या प्रकल्पामध्ये बऱ्याच प्रकारच्या अडचणी आल्या व हा प्रकल्प रखडला गेला. परंतु आता याच भारतातील पहिल्या खाजगी हिल स्टेशन प्रकल्प असलेल्या लवासाबद्दल महत्त्वाचे अपडेट समोर आली आहे. ती म्हणजे हा प्रकल्प आता एका मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपतीने विकत घेतला आहे व ते  या प्रकल्पाचे मालक आहेत.

 कोण आहेत उद्योगपती अजय सिंह अर्थात अजय हरिनाथ सिंह?

भारतातील पहिले खाजगी हिल स्टेशन म्हणून नावारूपाला आलेले लवासा हा प्रकल्प आता मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती अजय हरनाथ सिंह यांनी घेतला असून ते डार्विन प्लॅटफॉर्म ग्रुप ऑफ कंपनीचे मालक आहेत. याच कंपनीने हे भारतातील पहिले खाजगी नयनरम्य हिल स्टेशन ताब्यात घेण्याची आणि त्याच्या रिनोवेशनची बोली जिंकली. याकरिता नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलने लवासासाठी डार्विन प्लॅटफॉर्म इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीने लावलेली १८१४ कोटी रुपये रिझोल्युशन प्लॅनला मंजुरी दिली होती.

हा निर्णय यावर्षी जुलै महिन्यामध्ये घेण्यात आलेला होता. नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनलने अजय हरिनाथ सिंह यांच्या नेतृत्वाखालील डार्विन प्लॅटफॉर्म ग्रुपला हा प्रकल्प दिला आहे. पाच वर्षांपूर्वी या प्रकल्पाच्या बाबतीत असलेली दिवाळखोरी ठराव प्रक्रिया सुरू करण्यात आलेली होती व त्यानंतर तब्बल पाच वर्षांनी न्यायाधिकरणाने लवासा या खाजगी हिल स्टेशनसाठी 1814 कोटी रुपयांच्या ठराव योजनेला मंजुरी दिली. त्यामुळे डार्विन प्लॅटफॉर्म इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड ही लवासा कार्पोरेशनसाठी विजयी बोलीदार ठरली.

 काय आहे नेमका लवासा प्रकल्प?

जर आपण लवासा प्रकल्पाचा विचार केला तर हा मुंबईपासून 180 किलोमीटर अंतरावर असून पश्चिम घाटातील सह्याद्री पर्वतरांगांच्या सुंदर अशा मुळशी खोऱ्यामध्ये तब्बल वीस हजार एकरच्या परिसरामध्ये पसरलेला असून हा प्रकल्प पहिला प्रकल्प असून तो खाजगी शहराशी जोडलेला आहे. 2000 सालामध्ये या प्रकल्पाचे काम सुरू झाले होते

परंतु अनेक वर्षांपासून भूसंपादन आणि इतर पर्यावरण विषयक समस्यांमध्ये हा प्रकल्प वादात अडकला व रखडला होता. त्यामुळे या प्रकल्पाचे ज्या काही आर्थिक समस्या होत्या त्याच्या निराकरण करण्याची प्रक्रिया 2018 मध्ये सुरू करण्यात आली. या प्रकल्पामध्ये ज्या लोकांनी गुंतवणूक केली होती ते त्यांचे पैसे परत मिळण्याची वाट पाहत असून त्यामध्ये या प्रकल्पातील घरे खरेदी करणाऱ्या लोकांचा प्रामुख्याने समावेश आहे.

  काय आहे त्यांचा डार्विन प्लॅटफॉर्म ग्रुप?

डार्विन प्लॅटफॉर्म ग्रुपची स्थापना अजय सिंह यांनी 2010 मध्ये केली होती. हा ग्रुप पायाभूत सुविधा तसेच रिफायनरीज, किरकोळ आणि हॉस्पिटलिटी अशा विविध क्षेत्रांमध्ये सेवा देते. ज्यावेळेस लवासा प्रकल्प यांना मिळाला तेव्हा त्यांनी एक अधिकृत निवेदनात सांगितले होते की त्यांचा समूह राष्ट्राच्या उभारणीसाठी वचनबद्ध असून भारताला आर्थिक शक्तीस्थान बनवण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्र्यांच्या ध्येयाशी या ग्रुपची दृष्टी सुसंगत आहे.

एनसीएलटीने ग्रुपला देशातील महत्त्वकांक्षी असलेल्या जागतिक दर्जाच्या स्मार्ट सिटी विकसित करण्याचे आव्हानात्मक काम सोपवले आहे व या निर्णयामुळे असलेली राष्ट्र उभारणीची बांधिलकी आणखी मजबूत होईल असं देखील त्यांनी निवेदनात म्हटले होते. डार्विन प्लेटफॉर्म ग्रुपच्या अकरा पेक्षा जास्त देशांमध्ये 21 लीस्टेड कंपन्या असून या कंपनीचे मालक अजय सिंह आहेत व हे मुंबई विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत.

डार्विन प्लॅटफॉर्म ग्रुपने जेट एअरवेज तसेच एअर इंडिया एअरलाइन्स व शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया च्या अधीग्रहणासाठी करण्यात आलेल्या उच्च प्रोफाईल बोलीमध्ये देखील सहभाग घेतला होता. एवढेच नाही तर 2022 मध्ये कर्जबाजारी असलेले अनिल अंबानींची कंपनी रिलायन्स कॅपिटल खरेदी करण्याच्या शर्यतीत देखील डार्विन प्लॅटफॉर्म ग्रुप  सहभागी झाला होता. डार्विन प्लॅटफॉर्म ग्रुपची एकूण संपत्ती पाहिले तर ती 68 हजार कोटी रुपये आहे.