Astrology Tips: व्यक्तीच्या भाग्यांकावरून कळतो व्यक्तीचा स्वभाव!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Astrology Tips:  काही विशिष्ट गोष्टींचा अभ्यास आणि त्यासंबंधीचे परिपूर्ण तपशील व त्याची संपूर्ण माहिती ही त्या त्या शास्त्रामध्ये दिलेली असते. प्रत्येक शास्त्राचे तज्ञ व्यक्ती देखील असतात. याच प्रकारे जर आपण ज्योतिष शास्त्राचा विचार केला तर  यामध्ये व्यक्तीच्या जीवनाशी संबंधित असलेल्या अनेक बाबींचा समावेश केलेला असतो व तो काही निकषांच्या आधारे व्यक्त देखील केला जातो.

ज्योतिष शास्त्रामध्ये अनेक बाबींचा समावेश असतो व यामध्ये  सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जन्मतारीख व या जन्म तारखे वरून ठरणारा भाग्यांक याला देखील खूप महत्त्व असते. भाग्यांक हा एक ते नऊ या अंकांमध्ये असतो व  प्रत्येक भाग्यांक नुसार त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे हे ज्योतिष शास्त्र सांगते. नेमके भाग्यांकावरून  व्यक्तीचा स्वभाव कसा आहे हे ज्योतिष शास्त्र सांगते. त्याबद्दलची महत्त्वाची माहिती आपण घेऊ.

 तुमचा भाग्यांक सांगेल तुमचा स्वभाव

1- भाग्यांक एक ज्या व्यक्तींचा भाग्यंक हा एक असतो अशा व्यक्ती ज्योतिष शास्त्रानुसार अतिशय न्याय तत्वाने आणि न्याय बुद्धीने वागणारे असतात व स्वतःला असलेले अधिकाराचा वापर देखील ते चांगल्या पद्धतीने करू शकतात. एक भाग्यांक असलेल्या व्यक्तींचा स्वभाव हा मनमिळावू तसेच खूप मनमोकळा असतो व त्यांची स्वतंत्र विचारसरणी असल्यामुळे ते राजकीय आणि सामाजिक क्षेत्रामध्ये खूप मोलाचे काम करू शकतात व त्यामुळे त्यांना चांगला मान देखील लाभतो. भाग्यांक सोबत मुलांक देखील महत्त्वाचा असतो.

जर एक भाग्यांकाचा मूलांक जर एक असेल तर अशा व्यक्ती अनेक प्रकारच्या व्यवसायामध्ये खूप चांगली प्रगती करतात. परंतु अशा व्यक्तींच्या कामांमध्ये कोणी हस्तक्षेप केला तर यांना अजिबात आवडत नाही. तसेच भाग्यांक एक असलेल्या व्यक्ती नोकरीमध्ये देखील खूप मोठी प्रगती करतात.

परंतु जर भाग्यांक एक असलेल्या व्यक्तीचा मुलांक जन्म तारखेला जर चार असेल अशा व्यक्तींचा लहरी स्वभावानुसार ते त्यांची कामाचे नियोजन करतात. कधी कधी हे व्यक्ती त्यांचे जर काही प्रेम प्रकरण असेल तर यामध्ये अति भाऊक होतात. तसेच या व्यक्तींचा मुलांक जर 9 असेल अशा व्यक्ती वागण्या बोलण्यामध्ये अतिशय गंभीरपणे वागतात खूप शिस्तीचे भोक्ते असतात.

2- भाग्यांक दोन भाग्यांक दोन असलेल्या व्यक्ती हे उत्तम वक्ते असतात. यांची बोलण्याची पद्धत इतकी लाजवाब असते की समोरच्या व्यक्तीवर याची चांगली छाप पडते. तसेच हे कुठलेही काम अगदी टापटीप व नीटनेटके अशा पद्धतीने करतात व त्यांना कामाचा उरक देखील चांगला असतो. त्यामुळे ते त्यांच्या नोकरी किंवा व्यवसायाच्या मध्ये प्रत्येक वेळी पुढे असतात. तसेच काही समस्या उद्भवल्या तरी ते सुरक्षित मार्ग काढू शकतात.

भाग्यांक दोन असलेल्या व्यक्ती समाजामध्ये खूप प्रसिद्ध ठरतात तसेच मित्रमंडळींमध्ये देखील ते कायम मिळून मिसळून राहतात. परंतु भाग्यांक दोन असलेल्या व्यक्तींनी प्रेम प्रकरणांमध्ये थोडे सावध राहणे गरजेचे आहे. अशा प्रकरणांमध्ये भाग्यांक दोन असलेल्या व्यक्तींनी भावनेच्या आहारी जाऊन स्वतःचे सर्वस्व उधळून लावण्याचा विचार करणे योग्य नाही. कारण समोरच्या व्यक्तीला यामध्ये कुठल्याही प्रकारचा इंटरेस्ट नसतो.

परंतु हे स्वतःला या प्रेमाच्या चक्कर मध्ये फिरवत राहतात व महत्वाच्या गोष्टींना हात धुवून बसतात. त्यामुळे अशा व्यक्तींनी अशा प्रकरणांमध्ये सावध राहावे. यामध्येच जर जन्म तारखेमध्ये या व्यक्तींचा मुलांक दोन किंवा सात असेल तर यांचा मनाचा गोंधळ जास्त वाढतो. परंतु जन्मतारखेत जर मुलांक एक असेल तर सर्व बाबींना एक उत्तम शिस्त मिळते. तसेच जर मुलांक 9 असेल तर मात्र रागाच्या प्रमाणात वाढ होते.

3- भाग्यांक 3- भाग्यांक तीन असलेल्या व्यक्ती हे खूप आशावादी व स्वतंत्र विचाराच्या असतात. त्यांची स्वतःची काही नीतिमूल्य असतात व ते नीतिमूल्य डोळ्यासमोर ठेवूनच स्वतःची कामे करत असतात. अशा व्यक्तींमध्ये उत्तम संवाद कौशल्य तसेच वक्तृत्व कौशल्य  असते. आयुष्यामध्ये कोणत्याही विश्वसनीय व महत्त्वाच्या गोष्टींचे विवेचन करताना ते वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारावर खोलवर विचार करूनच स्वतःची मते प्रस्तुत करतात.

भाग्यांक तीन असलेल्या व्यक्तींच्या सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे हे व्यक्ती कुठल्याही दबावाला बळी पडत नाही. या व्यक्तींमध्ये माणसांमधील  कौशल्य आणि कल्पकता ओळखण्याचे कौशल्य असल्यामुळे अशा व्यक्तींना शोधून ते त्यांच्यातील कल्पकता कामांमध्ये किंवा कृतीत आणण्याकरिता नेहमी यशस्वी ठरतात.

भाग्यांक तीन असलेले व्यक्ती स्वाभिमानी प्रवृत्तीच्या असतात परंतु विनयशील व रोखठोक बोलणारी देखील असतात. हे व्यक्ती धार्मिक प्रवृत्तीच्या असतात व अनेक प्रकारच्या सामाजिक कार्यामध्ये त्यांचे मोठे योगदान असते. तसेच प्रकृतीच्या बाबतीत विचार केला तर यांच्या जन्म तारखेला सतत येणारा तीन हा अंक त्यांना पोटाचे व अपचनाचे आजार देतो. त्यामुळे या व्यक्तींनी बरीच पथ्य व जेवणाचा टाइमिंग पाळणे गरजेचे आहे.

4- भाग्यांक चार भाग्यांक चार असलेले लोक सद्गुनी असतात व या गुणांचा वापर ते लोकांच्या भल्यासाठी करतात. तसे पाहायला गेले तर हे व्यक्ती अतिशय चाकोरीमध्ये जीवन जगतात. परंतु तरी देखील त्यांना अनेकवेळा वेगवेगळ्या समस्यांनासामोरे जावे लागते.परंतु हे व्यक्ती असे प्रसंग शांतपणे हाताळतात व त्यामधून अगदी सहजपणे बाहेर देखील निघतात. प्रसन्न चेहरा व साधी राहणे व स्मितहास्य त्यांच्या एकंदरीत वागणुकीत दिसून येते.

हे व्यक्ती साधे राहतात परंतु त्यांचे विचार हे उच्च असतात. भाग्यांक चार असलेले व्यक्ती कितीही मोठ्या पदावर असले तरी त्यांच्यामध्ये कुठलाही प्रकारचा अहंकारपणा दिसून येत नाही. स्वतःचे कष्ट आणि जिद्दीतून ते यश मिळवतात. तसेच एखाद्या वादामध्ये ते दोन्ही गटांना स्वतःचे विचार व्यवस्थित समजावून देऊ शकतात व एकत्र आणू शकतात. तसेच मोलाची बाजू म्हणजे या व्यक्तींच्या जन्मतारखेत जर मुलांक एक असेल तर अशा व्यक्तींचा आत्मविश्वास अधिक वाढतो व ते नावलौकिक मिळवतात. परंतु जर जन्मतारखेत दोन व सात या मुलाकांची उपस्थिती असेल तर मात्र अशा व्यक्तींच्या मानसिक अवस्थेमध्ये असतील तर हळवेपणा येण्याची शक्यता असते.

5- भाग्यांक पाच बुध ग्रहाचा प्रभाव पाचव्या भाग्यांकावर असतो. परंतु संपूर्ण जन्मतारखेतील जे काही विविध अंक असतात त्यांचा प्रभाव देखील या भाग्यांकात एकत्र आलेला असतो. या पाच अंकांमध्ये संपूर्ण जन्मतारखेला अंकांची स्पंदने एकत्र आलेली असतात व त्यामुळेच विविध गुणांच्या संस्कारातून पाच हा अंक तयार होतो.

पाच अंक हा उत्तम आणि प्रगल्भ बुद्धिमत्तेचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. त्यामुळे अशा व्यक्ती उत्तम वक्तृत्व तसेच बोलताना मधुर वाणी यांचा त्यांना त्यांच्या कामांमध्ये खूप मदत होते. तसेच काही प्रसंगी अगदी  धडाडीने पुढे जाण्याचे धाडस देखील त्यांच्या मध्ये असते.  कायम कुठल्याही गोष्टींचा विचार करताना अगदी वेगळ्या पद्धतीने करतात व यामधूनच त्यांना अनेक नवीन कल्पना सुचत असतात.

परंतु यांच्यातील जो काही आळशी स्वभाव असतो त्यामुळे बऱ्याचश्या विचारांना ते मूर्त स्वरूप देऊ शकत नाहीत. परंतु या व्यक्तीने जर मुलांक सहाची मदत घेतली तर ते व्यक्ती त्यांच्या कामांमध्ये उत्तम प्रगती करू शकतात व आर्थिक फायदा देखील मिळू शकतात. जर जन्मतारखेत मुलांक 4 ची उपस्थिती असेल तर या अंकाची कामांमध्ये उत्तम मदत ठरते. अत्यंत किचकट बौद्धिक काम असेल तरी या अंकाच्या मदतीने उत्तम सहकार्य लाभते.