विद्यार्थ्यांची प्रतीक्षा संपली ! ‘या’ तारखेला लागणार महाराष्ट्र बोर्डाचा 10वी चा निकाल, कुठ पाहणार रिजल्ट?

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Maharashtra SSC Result Date : महाराष्ट्र राज्य बोर्डाचा बारावीचा निकाल 25 मे 2023 रोजी जाहीर करण्यात आला. खरंतर बारावीचा निकाल जाहीर झाला की लगेचच 5-6 दिवसात दहावी बोर्डाचा निकाल जाहीर केला जातो. आतापर्यंत असंच पाहायला मिळाल आहे.

यामुळे दहावी बोर्डाची परीक्षा दिलेल्या विद्यार्थी आणि पालकांमध्ये दहावीच्या निकाला संदर्भात कमालीची उत्सुकता पाहायला मिळत आहे. विद्यार्थी निकाल कसा लागणार म्हणून उत्सुक आहेत शिवाय त्यांची धाकधूक देखील वाढली आहे. पालक देखील विद्यार्थ्यांप्रमाणेच या निकालाकडे विशेष लक्ष ठेवून आहेत.

दरम्यान महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दहावीच्या निकालासंदर्भात एक महत्त्वाची अपडेट आमच्या हाती आली आहे. एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मध्ये दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा निकाल एक जून 2023 रोजी अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला जाणार आहे.

हे पण वाचा :- कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट काढायच का? मग ‘ही’ कागदपत्रे जोडा अन ‘इथ’ करा अर्ज, फक्त 8 दिवसांत मिळणार प्रमाणपत्र

मात्र महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने या संदर्भात कोणतीच अधिकृत माहिती आम्हाला दिलेली नाही. परंतु सूत्रांनी दिलेल्या खात्रीशीर माहितीनुसार महाराष्ट्र राज्य बोर्डाचा यंदाचा दहावीचा रिझल्ट हा जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी अर्थातच एक जूनलाच जाहीर होणार आहे.

तसेच जर एक जून रोजी काही तांत्रिक अडथळ्यांमुळे रिझल्ट डिक्लेअर झाला नाही तर पाच जूनपर्यंत रिझल्ट डिक्लेअर होईलच अशी माहिती समोर आली आहे. यामुळे आता विद्यार्थ्यांची निकालाबाबतची आतुरता संपणार असून उद्या विद्यार्थ्यांना रिझल्ट पाहता येईल असे चित्र तयार होत आहे.

दरम्यान आज आपण रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर विद्यार्थी कशा पद्धतीने आपला निकाल चेक करू शकतात? या संदर्भात सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

हे पण वाचा :- आनंदाची बातमी ! ‘त्या’ 37 लाख विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार, राज्य शासनाचा जीआर जारी; केव्हा होणार गणवेश वाटप?

कुठे पाहणार रिझल्ट?

www.mahresult.nic.in 

http://sscresult.mkcl.org

https://ssc.mahresults.org.in या तिन्ही संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपला दहावीचा रिझल्ट पाहता येणार आहे. रिझल्ट डिक्लेअर झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम वर नमूद केलेल्या कोणत्याही एका वेबसाईटवर भेट द्यायची आहे. वेबसाईटवर गेल्यानंतर तिथे एसएससी रिझल्ट 2023 अशी लिंक दिसेल.

या लिंक वर विद्यार्थ्यांना क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर विद्यार्थ्यांना आपला सीट क्रमांक अर्थातच आसन क्रमांक एंटर करायचा आहे आणि त्याखाली विद्यार्थ्यांना आपल्या आईचे नाव प्रविष्ट करायचे आहेत. विचारलेली माहिती योग्यरीत्या भरल्यानंतर विद्यार्थ्यांना या संकेतस्थळावर आपला रिझल्ट पाहता येणार आहे. 

हे पण वाचा :- मोठी बातमी ! राज्य कर्मचारी पुन्हा आंदोलन पुकारणार; आता काय आहे मागणी? वाचा