हे आहेत भिल्ल समाजातील पहिले कलेक्टर! आईने दारू विकली आणि मुलाला शिकवले, मुलाने केले कष्टाची चीज

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बरेच तरुण आणि तरुणी आपण पाहतो की आपली आर्थिक परिस्थिती, आपला समाज इत्यादींमुळे कुढत किंवा रडत बसतात. परिस्थितीशी दोन हात करून यश मिळवण्यात धन्यता न मानता परिस्थितीला कवटाळून बसतात व यशस्वी होण्यासाठी कुठल्याही प्रकारचा प्रयत्न करताना दिसून येत नाही.

त्याउलट काही तरुण-तरुणी असे असतात की ते आहे त्या परिस्थितीत खूप मोठा संघर्ष करतात आणि अफाट मेहनत आणि अभ्यासाने घवघवीत यश मिळवतात. या यशामागे त्यांचा कष्ट, ध्येयाप्रती असलेली सकारात्मक भावना आणि ध्येय पूर्ण करण्यासाठी कितीही प्रकारच्या अडचणी आल्या तरी त्यांच्याशी दोन हात करत त्या अडचणींवर मात मिळवत यशाच्या दिशेने मार्गक्रमण करण्याचा गुण खूप महत्त्वाचा असतो.

या सगळ्या मुद्द्याला धरून जर आपण डॉ.राजेंद्र भारूड यांची यशोगाथा पाहिली तर जन्म होण्याच्या अगोदरच वडिलांचे छत्र हरपले आणि आईने दारू विक्री करून त्यातून आलेल्या पैशातून मुलाला शिकवले. त्यांनी देखील आईच्या या कष्टाचे चीज केले व आज ते कलेक्टर आहेत. एवढेच नाही तर भिल्ल समाजात जन्माला येऊन समाजातील पहिला कलेक्टर होण्याचा मान देखील त्यांनी मिळवला. त्यांचीच यशोगाथा या लेखात आपण बघणार आहोत.

 डॉ.राजेंद्र भारूड यांची यशोगाथा

याबाबत सविस्तर वृत्त असे की, डॉ राजेंद्र भारूड यांचा जन्म हा साक्री तालुक्यातील सामोडे या छोट्याशा गावात झाला. जन्म झाल्यापासून पावलोपावली संघर्ष केला. घरची परिस्थिती खूपच हलाकीची होती परंतु स्वप्न मात्र अफाट होते. जन्म व्हायच्या अगोदरच वडील वारले. जर आपण डॉ.भारुड यांच्या परिस्थितीचा विचार केला तर वडील वारल्यानंतर साधा त्यांचा फोटो काढायला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नव्हते.

घरच्या साधा छोटासा जमिनीचा तुकडा देखील त्यांच्याकडे न होता आणि घरी कुटुंबामध्ये पुरुष मंडळीपैकी कोणीही करणारे नव्हते. परंतु त्यांची आई खूपच कष्टाळू आणि जिद्दी होत्या व या संकटात देखील त्यांनी दिवसभर कष्ट केले व सगळी जबाबदारी व्यवस्थित पार पाडायचे ठरवले. आपल्या मुलाला शिकवता यावे व त्याचे पोट भरता यावे याकरिता त्यांनी मोहाची दारू गाळण्याचा व्यवसाय सुरू केला व दारू विक्रीच्या माध्यमातून पैसे आले त्यातून पोरांनी शिकावे व स्वतःच्या पायावर उभे राहावे यासाठी त्या कष्ट घेत राहिल्या.

डॉक्टर राजेंद्र भारूड यांचे शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये झाले. शाळेमध्ये मन लावून ते अभ्यास करायचे परंतु त्यांच्याकडे पेन्सिल आणि पेन घ्यायला देखील पैसे नसायचे. शिकायची इच्छा तर प्रचंड होती. हाल अपेष्टा असताना शिक्षण सुरू ठेवले व पुढे अक्कलकुवा तालुक्यातील नवोदय विद्यालयात त्यांनी सीबीएससी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला. परंतु त्यांच्या गावापासून ही शाळा तब्बल 150 किलोमीटर दूर होती. या ठिकाणही मोठ्या कष्टाने त्यांनी दहावी उत्तीर्ण केली व पुढे बारावीला प्रचंड प्रमाणात कष्ट घेतले व 97 टक्के गुण मिळवून बारावी उत्तीर्ण झालेत.

अशाप्रकारे प्रचंड कष्ट व आईच्या मेहनतीची जोड व आईच्या कष्टाचे चीज करत स्वतःच्या गुणवत्तेवर त्यांनी मुंबईतील जी.एस मेडिकल कॉलेजमध्ये मेडिकल शिक्षणासाठी प्रवेश मिळवला व गुणवत्तेच्या जोरावर वैद्यकीय शिक्षण पूर्ण करण्यासाठी शिष्यवृत्ती देखील त्यांना मिळाल्या. वैद्यकीय शिक्षणाच्या शेवटच्या वर्षाचा असताना त्यांनी इंटर्नशिप चालू केली व दुसरीकडे यूपीएससीचा अभ्यास करायचे ठरवले.

आयएएस ऑफिसर व्हायचे हे मनात पक्के असल्यामुळे त्याची तयारी ते खूप नियोजन आणि मोठ्या प्रमाणावर करत होते. या सगळ्या कष्टांचे फळ त्यांना भगवंताने एकाच वेळी दोन भेट देऊन दिले. त्यांच्या एका हातामध्ये मेडिकलच्या शेवटच्या वर्षातील पदवी होती तर दुसरीकडे यूपीएससी परीक्षा पास केल्याचा निकाल होता.

यामधून त्यांनी कलेक्टरची निवड केली व कलेक्टर व्हायचे ठरवले. परंतु त्यांच्या आईला कलेक्टर म्हणजे काय एवढे देखील साधे माहिती न होते. जेव्हा त्यांनी त्यांच्या आईला सांगितले की मी कलेक्टर झालो तेव्हा त्यांच्या आईला याबद्दल काहीच कळले नाही. त्यांना एवढं समजलं की आपला मुलगा काहीतरी मोठा बनलेला आहे..

डॉ.राजेंद्र भारूड यांचे प्रेरणादायी शब्द

राजेंद्र भारूड म्हणतात की जेव्हा मुंबईला शिकायला गेलो तेव्हा मला पहिल्यांदा गरीबीची जाणीव झाली. परंतु मनामध्ये मी कोणाबद्दल मत्सर ठेवला नाही किंवा मला मत्सर वाटला नाही. एवढेच नाही तर आपल्या स्वतःची गरिबीची परिस्थितीचे दुःख देखील मानले नाही. उठून योगा करायचा तसेच अभ्यास सुरू करायचो.

कॉलेज तसेच यूपीएससीचा अभ्यास अशी दिनचर्या संपूर्ण कॉलेज कालावधीमध्ये होती. मोबाईल मध्ये वेळ वाया न घालवता सगळा वेळ हा अभ्यासासाठी दिला. त्याबद्दल ते म्हणतात की जर त्या काळी मी फेसबुक वर पोस्ट लिहित राहिलो असतो आणि वाट्याला आलेली संघर्षाची कथा उगळत राहिलो असतो तर इथपर्यंत पोहोचलो नसतो. त्यांचे सगळ्यात महत्त्वाचे वाक्य म्हणजे दिवस पालटण्यासाठी मी कोणाच्या मदतीच्या हातांकडे किंवा मदतीची वाट पाहत बसलो नाही.

त्यांनी म्हटले की मला एवढे कळत होते की आपली परिस्थिती ही आपल्यालाच बदलायची आहे  व ती ही न थकता व न रडत बसता. त्यामध्ये ज्या काही छोट्या संधी आल्या त्या संधीचं बोट धरलं नसतं तर हे वयाच्या 31 व्या वर्षात मी नोकरीत शोधत बसलो असतो परंतु कलेक्टर झालो नसतो. आजपर्यंत मी काय गमावलं यापेक्षा माझ्या संघर्षांने मी आज काय दिलं किंवा काय कमावलं याला मी महत्त्व देतो असे देखील त्यांनी म्हटले आहे.