… अशा मुलींना नाही मिळत वडिलांच्या संपत्तीत अधिकार!

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

प्रॉपर्टी म्हणजे संपत्ती किंवा मालमत्ता याबाबतीत अनेक कुटुंबे किंवा भावा भावांमध्ये किंवा भाऊबंदकीत देखील मोठ्या प्रमाणावर वाद आपल्याला दिसून येतात. कधी कधी हे वाद खूप टोकाच्या पातळीवर देखील पोहोचतात. एवढेच नाही तर वडिलांनी मुला-मुलींची संपत्ती वरचा हक्क याबाबतीत देखील बरेच वाद होताना आपल्याला दिसतात. खरे पाहायला गेले तर प्रॉपर्टीच्या संबंधित भारतामध्ये अनेक प्रकारचे कायदे असून या कायद्यांच्या अनुषंगाने जर विचार केला तर प्रत्येक बाबीविषयी कायद्यामध्ये स्पष्टता असून या माध्यमातून अनेक प्रकारच्या प्रश्नांना किंवा वादांच्या बाबतीत देखील स्पष्ट असे नमूद करण्यात आलेले आहे.

याच पार्श्वभूमीवर जर आपण मुलींचा वडिलांच्या संपत्ती वरचा हक्क हा जर मुद्दा पाहिला तर हा बऱ्याचदा वादाच्या भोवऱ्यात सापडणारा मुद्दा आहे. वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलीला खरंच अधिकार मिळतो का याबाबत बरीच मत मतांतरे किंवा मतभेद दिसून येतात. सध्या जर आपण भारताचा विचार केला तर मुलींना वडिलांच्या संपत्तीमध्ये किती अधिकार आहे आणि मुलींना कोणत्या परिस्थितीत वडिलांच्या संपत्तीवर हक्क सांगता येत नाही याबाबत कायद्यामध्ये स्पष्ट अशा प्रमाणात तरतुदी केलेल्या असून भारतामध्ये संपत्ती नियमन किंवा संपत्ती वाटपाबद्दल अनेक प्रकारचे कायदे आहेत.

हे कायदे हिंदूच नाही तर सगळ्या धर्मांच्या बाबतीत करण्यात आलेले आहेत. यामध्ये उदाहरणच घ्यायचे झाले तर मुस्लिमांंकरिता पर्सनल लॉ आणि हिंदू करीता हिंदू उत्तर अधिकारी अधिनियम 1956 याचा समावेश करता येईल. तसेच यामध्ये असे काही कायदे तयार करण्यात आलेली आहेत की ते सगळ्याच धर्माच्या लोकांना सारखेच लागू होतात. याचे उदाहरण घ्यायचे झाले तर भारतीय उत्तर अधिकारी अधिनियम 1925 हा सर्व भारतीयांसाठी लागू केला जाणारा कायदा आहे. त्याच अनुषंगाने आपण वडिलांच्या संपत्तीवर कोणत्या परिस्थितीत मुलींचा अधिकार राहत नाही याबद्दल व इतर माहिती घेणार आहोत.

 वडिलांच्या संपत्तीवर मुलींचा अधिकार कोणत्या परिस्थितीत राहत नाही?

यामध्ये अनेक कंगोरे असून जर आपण काही महत्त्वाच्या बाबींचा विचार केला तर समजा एखाद्या प्रसंगी मुलींनी जर स्वतः जो काही प्रॉपर्टी च्या बाबतीत हक्क आहे त्याचा त्याग केला तर तिला वडिलांच्या संपत्तीमध्ये हक्क मिळत नाही. यामध्ये वडिलांना मिळालेली वडिलोपार्जित संपत्ती आणि वडिलांनी स्वतः कष्टाने कमावलेली संपत्ती या दोन्ही बाबतीत ही बाब लागू होते.

समजा वडिलांनी जर स्वतःचा मृत्युपत्र तयार केलेले आहे व त्या मृत्युपत्रांमध्ये सर्व संपत्ती मुलाच्या नावे केले असेल तर अशा स्थितीमध्ये मुलींना वडिलांच्या संपत्तीवर कुठल्याही प्रकारचा अधिकार राहत नाही. परंतु या मुद्द्यात देखील एक महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे वडील हे वडिलोपार्जित मिळालेली संपत्तीचे मृत्युपत्र लिहून मुलांच्या नावे करू शकत नाही.

कारण वंशपरंपरेने म्हणजेच वडिलोपार्जित वडिलांना जे काही संपत्ती मिळालेली असते त्यामध्ये मुलांन इतकाच मुलीचा देखील हक्क असतो. अशा प्रकरणांमध्ये बऱ्याचदा कायदा माहीत नसल्यामुळे लग्नानंतर मुलींना वडिलांच्या संपत्तीत कुठलाही अधिकार राहत नाही असा समज बऱ्याच जणांमध्ये दिसून येतो. काही प्रसंगी मुलींनी वडिलांच्या किंवा घरच्यांच्या मनाविरुद्ध लग्न झालं असेल व इतर परिस्थितीमध्ये देखील मुलाचा आणि मुलीच्या संपत्ती वरचा हक्क रद्द करता येत नाही.

 याबाबतीत धर्माप्रमाणे कायदे कसे आहेत?

भारतामध्ये दोन प्रकारांमध्ये संपत्तीचे वर्गीकरण करण्यात येते. यामध्ये स्वतः कमावलेली व दुसरी म्हणजे वडिलोपार्जित किंवा वंशपरंपरेने आलेली संपत्ती. वडिलांनी स्वतः कमावलेल्या संपत्तीमध्ये मुलगा आणि मुलीला वडिलांच्या मृत्यूनंतरच वाटा मिळतो. जर आपण हिंदू नागरिकांच्या बाबतीत कायदा पाहिला तर हिंदू उत्तराधिकारी अधिनियम लागू होतो. तर मुस्लिम नागरिकांच्या बाबतीत पर्सनल लॉ लागू होतो.

यामध्ये जर हिंदू उत्तर अधिकारी अधिनियम 1956 चा विचार केला तर त्यानुसार मुलगा आणि मुलीला समान वाटा देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. जेवढ्याही प्रकारच्या संपत्तीमध्ये मुलाचा हक्क असतो अगदी तेवढाच हक्क मुलीचा देखील असतो. मुलगा या बाबतीत असं म्हणू शकत नाही की मुलीचे लग्न झालं आहे तर तिला तिच्या पतीच्या संपत्तीमध्ये अधिकार मिळेल. जर वडिलांनी संपत्ती कोणाच्या नावे केली नसेल किंवा मृत्युपत्रात कोणताही विशेष उल्लेख केलेला नसेल तर मुलगी आपल्या वाट्यासाठी दावा करू शकते.