Health Tips: आरोग्य ठेवायचे असेल चांगले तर चुकून देखील एकत्र नका खाऊ ‘हे’ पदार्थ! फायदा तर राहील दूर परंतु होईल नुकसान

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Health Tips:- शरीराच्या उत्तम आरोग्याकरिता संतुलित आहार घेणे खूप गरजेचे असते. कारण शरीरप्रक्रिया उत्तम  कार्यान्वित राहण्याकरिता शरीराला अनेक प्रकारचे जीवनसत्वे तसेच खनिजे व इतर पोषक घटकांची आवश्यकता असते व या सगळ्या गोष्टींची पूर्तता ही संतुलित आहाराच्या माध्यमातून होत असते.

यासोबतच आपली दैनंदिन जीवन जगण्याची पद्धत देखील शरीरावर चांगला किंवा वाईट परिणाम करत असते. तुमची झोपण्याच्या वेळेपासून तर जेवणाची वेळ इत्यादी सगळ्या गोष्टींचा परिणाम हा शरीरावर होत असतो. त्यामध्ये जर आहार पाहिला तर आपण बऱ्याचदा अनेक पदार्थ खाताना एकत्र पद्धतीने खातो.

म्हणजेच दोन पदार्थांचे कॉम्बिनेशन करून आपण काही पदार्थांचे सेवन करत असतो. परंतु अशा पद्धतीने काही वेळा शरीराला त्याचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. कारण काही पदार्थ असे आहेत की त्यांचे कॉम्बिनेशन करून जर सेवन केले तर शरीराला फायदा होण्याऐवजी नुकसान होण्याची शक्यता जास्त असते.

त्यामुळे असे पदार्थ एकत्र खाणे टाळणे खूप गरजेचे असते. त्यामुळे असे कोणते पदार्थ आहेत की ते एकत्र खाऊ नयेत? त्याबद्दलचीच माहिती आपण या लेखात घेणार आहोत.

 या पदार्थांचे एकत्र खाणे आरोग्याला ठरेल घातक

1- दूध आणि केळी आपल्यापैकी बऱ्याच जणांना दुधात केळी कुस्करून खाण्याची सवय असते व यालाच आपण शिकरण असं देखील म्हणतो. हा पदार्थ बरेच जण आवडीने खातात. परंतु केळ आणि दूध एकत्र खाणे हे शरीरासाठी फायद्याचे नाही.

केळ आणि दूध एकत्र खाल्ल्यामुळे ते एकमेकांना पचण्यास अडथळा करतात. कारण या दोन्ही पदार्थांच्या पचनाच्या वेळा वेगवेगळ्या असल्यामुळे जर हे एकत्र खाल्ले गेले तर अन्न पचण्याची प्रक्रिया बदलते व पोटात गॅस तसेच अपचन होण्याची शक्यता उद्भवते. कधीकधी यामुळे उलट्या होण्याची शक्यता देखील बळावते. त्यामुळे दूध आणि केळी एकत्र खाऊ नये.

2- ब्रेड आणि नूडल्स ब्रेड आणि नूडल्स जर सोबत खाल्ले तर ते महत्त्वाच्या एंजाइमला नष्ट करतात व शरीरामध्ये अनेक समस्या यामुळे उद्भवू शकतात. त्यामुळे ब्रेड आणि नूडल्स एकत्र खाणे टाळावे.

3- टरबूज आणि खरबूज उन्हाळ्यामध्ये बरेच व्यक्ती टरबूज किंवा खरबूज मोठ्या प्रमाणावर खातात व हे फळे आरोग्यासाठी फायदेशीर देखील आहेत. परंतु जर ही दोन्ही फळे एकत्र खाल्ली तर मात्र पोटाच्या समस्या उद्भवतात. अपचनाची समस्या देखील उद्भवू शकते व त्यामुळे टरबूज आणि खरबूज हे एकत्र खाणे टाळावे.

4- काकडी आणि टोमॅटो बऱ्याचदा आपण आहारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सॅलडचा समावेश करतो. या सॅलेड मध्ये अनेकदा काकडी आणि टोमॅटो एकत्रित केले जातात व मोठ्या आवडीने खाल्ले जातात. परंतु यामुळे देखील गॅस तसेच पोटदुखी, अस्वस्थ वाटणे किंवा थकवा येणे इत्यादी समस्या उद्भवण्याची शक्यता असते पोटाचे काही आजार देखील होऊ शकतात.

5- बर्गर आणि कोल्ड्रिंक अनेकजण बर्गर आणि कोल्ड्रिंक्स एकत्र घेतात. परंतु ही सवय फार चुकीची आहे व पचनक्रियेसाठी ती फायद्याचे नाही. कारण जेव्हा आपण कोल्ड्रिंक पितो तेव्हा पोटामध्ये जे काही तेलकट पदार्थ असतात ते घट्ट पदार्थांमध्ये रूपांतरित होतात व त्यामुळे पचन व्हायला समस्या निर्माण होते व पचन क्रिया बिघडू शकते.