Health Tips: चहा पिताना तुम्ही ‘या’ चुका तर करत नाही ना? नाहीतर उद्भवू शकतात आरोग्याच्या समस्या! वाचा माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Health Tips:- आपल्यापैकी बऱ्याच जणांना खूप जास्त प्रमाणामध्ये चहा प्यायची सवय असते. म्हणजेच एकंदरीत असे व्यक्ती हे चहा पिण्याचे शौकीन असतात. कधी कधी काही व्यक्ती तर दिवसातून बाहेर काम करत असतील तर आठ ते दहा कप चहा देखील घेऊ शकतात.

परंतु चहा इतक्या जास्त प्रमाणामध्ये पिणे हे आरोग्यासाठी चांगले आहे का? या प्रश्नाचा विचार करणे देखील तितकेच गरजेचे आहे. कारण आरोग्याच्या दृष्टिकोनातून जर पाहिले तर अनेक छोट्या मोठ्या गोष्टींचा कळत नकळत  चांगला किंवा वाईट परिणाम आपल्या शरीरावर होत असतो.

त्यामुळे शरीरासंबंधी कुठलाही आहार किंवा एखादी पेय घेताना आपण काही गोष्टींची काळजी घेणे खूप गरजेचे असते. नाहीतर अशामुळे एखादी छोटीशी चूक देखील आपल्या आरोग्याला त्रासदायक ठरू शकते. निसर्गाचा एक नियम पाहिला तर कुठलीही गोष्ट जास्त प्रमाणात झाली तर ती चांगली नसते किंवा त्याचा चांगला परिणाम होण्याऐवजी काहीतरी वाईट परिणाम होण्याची शक्यता असते.

अगदी हीच बाब जर आपण चहाच्या बाबतीत घेतली तर कधीही चहा प्रमाणाच्या बाहेर पिणे योग्य नाही. तसेच कुठलीही गोष्ट करण्याचा एक काळ किंवा वेळ असतो किंवा त्याचे प्रमाण देखील योग्य असणे गरजेचे असते व हे चहाच्या बाबतीत देखील लागू होते. त्यामुळे या लेखांमध्ये आपण चहा पिताना कोणत्या चुका टाळणे गरजेचे आहे याबाबतीत प्रसिद्ध आहार तज्ञ राधिका गोयल यांनी शेअर केलेली माहितीचा आधार घेत काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती घेणार आहोत.

 चहा पिताना या चुका टाळा

1- जास्त करून चहा हा रिकाम्या पोटी पिला जातो. यामध्ये बेड टी हा एक प्रकार असून तो आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. जर तुम्ही देखील रिकाम्यापोटी चहा घेत असाल तर ही सवय लवकर सोडून देणे गरजेचे आहे. यामुळे दिवसभर पोटामध्ये जळजळ होण्याची शक्यता उद्भवते किंवा ऍसिडिटी देखील होऊ शकते.

2- त्यामुळे नाश्ता वगैरे घेतल्यानंतरच चहा पिणे गरजेचे आहे. बऱ्याच जणांना न्याहारी सोबत चहा घेण्याची सवय असते.परंतु ही पद्धत देखील चुकीची आहे. जर तुम्ही नाश्ता सोबत चहा घेत असाल तर शरीराला काही पदार्थांमधून आयर्न शोषणाच्या क्रियेमध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो.

3- बऱ्याच जणांना जेवण करण्यापूर्वी किंवा जेवल्यानंतर लगेच चहा प्यायची सवय असते. चहामध्ये असे काही घटक असतात की त्या घटकांमुळे शरीराला आयर्न शोषण करण्यामध्ये अडचण निर्माण होऊ शकते व त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो व कधीकधी अनिमिया देखील होऊ शकतो. त्यामुळे जेवण किंवा नाश्ता करण्याच्या एक तासानंतर चहा पिणे गरजेचे आहे.

4- आता तुम्ही एखादे कोल्ड्रिंक किंवा थंड पदार्थ खाल्ला असेल तर त्यावर लगेच चहा पिणे योग्य नाही. जर तुम्ही अशापद्धतीने चहा पीत असाल तर त्याचा परिणाम तुमच्या हिरड्या व दातांवर होण्याची शक्यता असते. यामध्ये तुमचे दात किडू शकतात किंवा हिरड्या देखील कमकुवत होऊ शकतात.

5- तुमच्या झोपायच्या  आधी चहा पिणे योग्य नाही. चहामध्ये जो काही कॅफिन नावाचा घटक असतो त्यामुळे तुमची झोप बिघडू शकते. याकरिता झोपेच्या आधी चहा घेऊ नये.

6- जास्त चहा पिणे देखील योग्य नाही. एका दिवसामध्ये एक ते दोन कप चहा पिणे योग्य मानले जाते. परंतु यापेक्षा जास्त चहा प्यायला तर ऍसिडिटी होण्याची शक्यता असते व पचनक्रियेत देखील अडचण येऊ शकते.

7- सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे बरेच जण चहा पिण्यासाठी प्लास्टिकचा कप वापरतात. परंतु प्लास्टिकच्या कपामध्ये कधीही चहा पिऊ नये.

8- चहा मध्येच कमीत कमी साखरेचा वापर करावा. जास्त प्रमाणात साखर वापरून खूप गोड प्रमाणात चहा पिली तर शरीराच्या ब्लड शुगरवर देखील याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.