तुम्ही अंघोळीसाठी जो साबण वापरता तो त्वचेसाठी खरोखर चांगला आहे का? ‘अशा’ पद्धतीने करा क्वालिटी चेक

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अंघोळीसाठी सर्वच लोक साबण वापरतात. विविध प्रकारचे साबण सध्या कंपन्या बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. लोकही नानाविध प्रकारचे साबण वापरत आहेत. पण तुम्ही जो साबण वापरता तो खरोखर वापरण्यायोग्य आहे का? मार्केटमध्ये असे अनेक साबणे आहेत की जे आपल्याला वापरण्यायोग्य नाहीत.

त्यामुळे तुम्ही जो साबण वापरता भविष्यात ते तुमच्या त्वचेसाठी हानिकारक आहे का? हे जाणून घेणे गरजेचे आहे. यासाठी ज्या साबणाने तुम्ही आंघोळ करता त्याचा दर्जा काय आहे हे तुम्हाला जाणून घेणे गरजेचे आहे. मग ते कसे जाणून घ्यावे याविषयी आपण सविस्तर माहिती पाहुयात

साबणाचे TFM मूल्य तुम्हाला देईल सर्व माहिती

साबण आपल्या त्वचेसाठी उपयुक्त आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला त्याचे TFM Value माहित असणे गरजेचे आहे. हे मूल्य जर योग्य असेल, मापात असेल तर हा साबण तुम्हाला वापरण्यातही योग्य आहे असे समजावे.

TFM Value म्हणजे काय?

साबण बनवणारी कंपनी साबणाच्या पॅकेजिंगवरच TFM मूल्य किती आहे याची माहिती देत असते.
TFM चा लॉन्ग फॉर्म आहे Total Fatty Matter. साबणाच्याच पॅकेजिंगवर TFM मूल्य असते. ते पाहून हा साबण वापरण्यास किती योग्य आहे हे तुम्हाला समजू शकते.

आता जाणून घेऊयात की, TFM Value किती असली पाहिजे

ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्सनुसार, साबणात टीएफएमची टक्केवारी जितकी जास्त असेल तितका तो साबण वापरण्यास योग्य असतो. साबणाची गुणवत्ता तीन प्रकारांत विभागली गेली आहे. ते पण आपण याठिकाणी पाहुयात

Grade 1 Soaps TFM Value : कमीतकमी 76 टक्के असावे.
Grade 2 Soaps TFM Value : कमीतकमी 70 टक्के असावे.
Grade 3 Soaps TFM Value : कमीतकमी 60 टक्के असावे.

कमी TFM असलेला साबण वापरला तर काय होईल?

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जर साबणाचा TFM 60 टक्क्यांपेक्षा कमी असेल तर तो साबण अंघोळीसाठी वापरू नये. अशा पद्धतीचे साबण जनावरांच्या अंघोळीसाठी वापरले जातात. तसेच 60% पेक्षा कमी TFM असलेले साबण भांडी किंवा कपडे धुण्यासाठी देखील वापरले जाऊ शकतात. त्यामुळे तुम्ही जो साबण वापरता तो तुमच्या आरोग्यासाठी खरोखर उत्तम आहे का हे एकदा चेक करा व त्यानुसारच साबण खरेदी करा.