Pure Water Tips: पाण्याची बाटली विकत घेतात! परंतु ते पाणी असते का शुद्ध? अशा पद्धतीने तपासा बाटलीतील पाणी शुद्ध आहे की अशुद्ध

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Pure Water Tips:- जेव्हा आपण काही कामानिमित्त घराच्या बाहेर असतो किंवा प्रवास करत असतो तेव्हा जर आपल्याला पाण्याची तहान लागली तर आपण साहजिकच एखाद्या दुकानावरून पाण्याची बॉटल विकत घेतो व आपली तहान भागवत असतो.

जर आपण मिनरल वॉटरचा व्यवसाय पाहिला तर भारतामध्ये हा मोठ्या प्रमाणावर वाढला असून अनेक नामांकित कंपन्यांच्या सोबत अनेक छोटे-मोठ्या कंपन्या देखील या व्यवसायात उतरलेले आहेत. परंतु यातील कोणत्या कंपन्या नोंदणीकृत आहेत आणि कोणत्या नोंदणीकृत नाहीत याबद्दल आपल्याला काहीच माहिती नसते.

त्यामुळे आपण जे काही मिनरल बॉटल विकत घेत असतो व त्या माध्यमातून पाणी पीत असतो. तेव्हा ते पाणी खरंच शुद्ध असते का हा देखील एक स्वतःला विचारण्यासारखा प्रश्न आहे?

जर मग ते पाणी शुद्ध नसेल तर आपण ते कसे ओळखू शकतो? हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. चला तर मग या लेखामध्ये आपण  जाणून घेऊ की बॉटलमधील पाणी शुद्ध आहे की अशुद्ध हे कसे ओळखावे?

 या गोष्टी बघा आणि ओळखा पाण्याची शुद्धता

1- आयएसआय मार्कवरील कोड बघा जेव्हा आपण पाण्याची बॉटल विकत घेतो व पाणी पितो. तेव्हा त्या पाण्याची चव कशी लागते यावरून ते पाणी शुद्ध आहे की अशुद्ध हे ओळखता येत नाही.

याकरिता बॉटल घेतल्यानंतर तुम्ही सर्वात प्रथम त्या बाटलीवर असलेला आयएसआय मार्कवर IS-14543 हा कोड असतो व हा कोड पाहिल्यावर बाटली असली आहे की नाही हे तुम्हाला कळते.

2- कोड कॉपी देखील केलेला असू शकतो तुम्ही बाटली घेतली आणि त्यावर कोड देखील आहे. परंतु तो कोड कॉपी देखील केला असू शकतो याची देखील शक्यता मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे तो कोड कसा आहे हे ओळखण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलच्या गुगल प्ले स्टोअर वरून  BIS Care नावाचे एप्लीकेशन डाउनलोड करावे लागेल.

हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यावर तुम्हाला त्या बॉटल वरील कोड संदर्भात सगळी माहिती मिळते. या एप्लीकेशनमध्ये आयएसआय असे लिहिलेले असते व त्यावर व्हेरिफाय लायसन्स डिटेल ऑप्शन असतो व या ऑप्शन वर क्लिक केले की त्यावेळी CM/L-10 हा डिजीट कोड मागितला जाईल

आणि हा कोड बॉटलवर असलेल्या पॅकिंग वरून कॉपी करून टाकावा लागतो. हा कोड पाणी बॉटल च्या पॅकिंगवर ज्या ठिकाणी आयएसआय मार्क असते त्याच्या खाली असतो. हा कोड टाकल्यानंतर तुम्ही गो या ऑप्शन वर क्लिक करावे.

त्यानंतर तुमच्या मोबाईलवर त्या पॅकिंग बॉटल विषयी संपूर्ण माहिती येते. यावरून तुम्ही ते पाणी पिण्यासाठी योग्य आहे की नाही किंवा त्या पाण्यात मिनरल्स आहेत की नाही? हे पटकन ओळखू शकतात.