वजन कमी करण्याचा प्रयत्न करत आहात तर झोपेकडे द्या लक्ष! झोप आणि वजनाचा आहे मोठा संबंध, वाचा महत्वाची माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वाढते वजन ही आता बऱ्याच जणांची समस्या झाली असून वाढत्या वजनामुळे अनेक जण त्रस्त असल्याचे आपल्याला दिसून येतात. तसेच शरीराच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून देखील वाढते वजन हे नुकसानदायक असून यामुळे हृदयरोग तसेच उच्च रक्तदाब, मधुमेहासारख्या समस्या उद्भवू शकतात.

त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवणे खूप गरजेचे असते. वजन नियंत्रणात राहावे किंवा ते कमी व्हावे याकरिता अनेक लोक वेगवेगळ्या प्रकारच्या उपाययोजना करतात.यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा आहार आणि व्यायामाचा देखील डेली रुटीनमध्ये समावेश करतात. परंतु तरी देखील हवा तेवढा फरक पडताना दिसून येत नाही.

तसेच अपुरी झोप हे देखील एक वजन वाढण्याचे प्रमुख कारण सांगितले जाते. याबाबत प्रसिद्ध पोषणतज्ञ नमामि अग्रवाल यांनी त्यांच्या एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये याबद्दल माहिती दिलेली आहे. तुम्ही आहार देखील योग्य घेत आहात तसेच व्यायाम करत आहात परंतु वजन कमी होत नसेल तर यामागे अपूर्ण घेतलेली झोप हे प्रमुख कारण असू शकते.

त्यामुळे या लेखामध्ये आपण अपुऱ्या झोपेचा वजन वाढीवर कसा परिणाम होतो किंवा अपुरी झोप वजन वाढण्याला कशी कारणीभूत ठरते? याबद्दल माहिती घेऊ.

 अपुऱ्या पूर्ण झोपेचा होतो वजन वाढीवर परिणाम

1- पचनसंस्थेशी निगडित जेव्हा पचन संस्था योग्य प्रकारे काम करते तेव्हा कॅलरी बर्न होण्याला मदत होते व त्याचा सरळ परिणाम वजन कमी होण्यावर होतो. परंतु झोप जर अपूर्ण किंवा अपुरी घेतली तर पचनसंस्था सुरळीत काम करत नाही व त्यामुळे वजन झपाट्याने वाढते. त्यामुळे तज्ञ म्हणतात की तुम्हाला निरोगी राहायचे असेल व वजन कमी करायचे असेल तर सात ते आठ तासांची पुरेशी झोप घेणे गरजेचे आहे.

2- कॅलरी बर्न होणे याबाबत पोषणतज्ञ म्हणतात की जेव्हा तुम्हाला व्यवस्थित झोप येत नाही तेव्हा तुमच्या शरीरामध्ये ऊर्जेसाठी चरबी जाळण्याएवजी ती जमा होण्याची शक्यता वाढते. यामुळे अपूर्ण झोपेमुळे एका दिवसात कमी कॅलरी बर्न करतात व त्यामुळे वजन वाढू शकते.

3- ताणतणाव वाढणे जेव्हा आपण अपुरी झोप घेतो किंवा कमी कालावधी करिता झोपतो तेव्हा शरीरातील जी कोर्टीसोलची पातळी म्हणजेच त्यामुळे तणाव  वाढण्याला मदत होते. साहजिकच तणाव जर वाढला तर वजन देखील वेगाने वाढायला लागते. कारण या सगळ्या प्रक्रियेमध्ये कॅलरीज बर्न होत नाही व वजन वाढते.

त्यामुळे तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असाल तर तुम्ही कमीत कमी सात ते आठ तास शांततेत झोप घेणे खूप गरजेचे आहे.