Teeth Care Tips: ‘या’ वनस्पतींचा कराल वापर तर पिवळे दात रात्रीत होतील मोत्यासारखे पांढरे शुभ्र! वाचा महत्वाची माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Teeth Care Tips:- जर आपण बाह्य व्यक्तिमत्त्वाचा विचार केला तर यामध्ये व्यक्तीची केशभूषा तसेच वेशभूषा आणि दात या गोष्टींचा खूप मोठा समोरच्या व्यक्तींवर प्रभाव पडत असतो. यामध्ये जर आपण दातांचा विचार केला तर दातांच्या बाबतीत दात पिवळे होण्याची समस्या बऱ्याच जणांना असते व याचा विपरीत परिणाम व्यक्तिमत्त्वावरच नाही तर तुमच्या सौंदर्यावर देखील होत असतो.

तंबाखू तसेच गुटखा इत्यादीचे व्यसन किंवा काही खाण्याच्या चुकीच्या सवयी, दात व्यवस्थित स्वच्छ न करणे इत्यादी गोष्टींमुळे दात पिवळे पडण्याची समस्या उद्भवते. हा दातांवर जमा झालेला पिवळा थर जर वेळेवर साफ केला नाही तर तो दातांच्या मुळामध्ये आणि हिरड्यांमध्ये शिरायला सुरुवात करतो आणि त्यामुळे दात कमकुवत होतात.

तसेच त्यामुळे पायोरिया, हिरड्यांमधून रक्त येणे तसेच दातांमधून रक्त येणे इत्यादी समस्या उद्भवतात. त्यामुळे दातांवरील हा पिवळसरपणा दूर करण्यासाठी बरेच व्यक्ती डेंटिस्टकडे जातात व दात स्वच्छ करून घेतात. यामध्ये पैसे जातात. परंतु कालांतराने जर तुम्ही काळजी घेतली नाही तर पुन्हा दात पिवळे व्हायला लागतात.

त्यामुळे काही आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा जर तुम्ही वापर केला तर दातांचा पिवळेपणा तुम्ही दूर करू शकतात. त्याबद्दलचीच माहिती आपण या लेखात घेऊ.

 या वनस्पती दात पांढरे करण्यासाठी ठरतील फायदेशीर

1- तुळसचा वापर आपल्याला माहित आहे की हिंदू धर्मामध्ये तुळसला खूप पवित्र मानले जाते व अध्यात्मिक दृष्टिकोनातून तुळसला महत्त्व आहे. परंतु दातांवरील पिवळा थर हटवण्यासाठी तुळस खूप महत्त्वपूर्ण ठरते. याकरिता तुम्हाला तुळशीची पाने वळवावी लागतात व त्यांची पावडर बनवावी लागते.

या पावडरचा वापर करून तुम्ही दात घासण्याचे काम करू शकतात. याशिवाय तुळशीची हिरवी पाने दात मजबूत करतात आणि दातांचा पांढरेपणा वाढवायला मदत करतात. जर हिरड्यांमधून रक्तस्राव होत असेल तर अशा प्रकारच्या समस्येवर देखील तुळशीचा उपयोग मोठ्या प्रमाणावर होतो.

2- केळीची साल बऱ्याचदा आपण जेव्हा केळ खातो आणि त्यावरील साल आपण फेकून देतो. परंतु केळीच्या सालीमध्ये मोठ्या प्रमाणावर मॅग्नेशियम तसेच पोटॅशियम असते.

या घटकांचा उपयोग ब्लिचिंग एजंट म्हणून करता येऊ शकतो. त्यामुळे केळ खाल्ल्यानंतर त्याचे साल फेकून न देता ती तुमच्या दातांवर घासली तर दातांवरील पिवळेपणा कमी करण्यास मदत होते. उपाय तुम्ही आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा करणे गरजेचे आहे.

3- लिंबूचा वापर अनेक प्रकारे लिंबूचा वापर करता येऊ शकतो व दात पांढरे करता येऊ शकतात. यासाठी तुम्ही दातांवर लिंबू घासू शकतात. काही खाल्ल्यानंतर हा उपाय नक्की करून बघणे गरजेचे आहे. पाण्यामध्ये मिसळलेला लिंबाचा रस घेऊन तुम्ही तोंड स्वच्छ धुऊ शकता.

लिंबाच्या रसामध्ये जर थोडे पाणी टाकून रात्रभर ठेवले आणि त्यानंतर तुम्ही सकाळी उठल्यावर दातांवर लावले तरी त्याचा खूप मोठा फायदा होतो. साधारणपणे आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा उपाय करून बघावा. हळूहळू दातांवरील पिवळेपणा जाऊ लागतो.

4- बाभूळ बाभूळ ही दात पांढरे करण्यासाठी एक प्रभावी औषधी वनस्पती म्हणून प्रसिद्ध आहे. आयुर्वेदात बाभळीच्या फांद्यांचा किंवा डहाळे यांचा वापर डिस्पोजेबल टूथब्रश म्हणून करण्यास सांगितलेला आहे. बाभूळ मध्ये असणारे टॅनिन दात एका झटक्यामध्ये पांढरे शुभ्र करतात.

5- त्रिफळा तोंडाची स्वच्छता उत्तम ठेवण्यासाठी आणि दात पांढरे करण्याकरिता आणि तोंडामध्ये काही जखमा झाल्या असतील तरी त्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी तुम्ही त्रिफळाचा वापर करू शकतात. याकरिता त्रिफळा पाण्यामध्ये तोपर्यंत उकळावा लागतो जोपर्यंत पाणी अर्धे होणार नाही. अशा पद्धतीने पाणी उकळल्यानंतर  पाणी थंड होऊ द्यावे व कोमट झाल्यावर त्याने दात स्वच्छ धुवावेत आणि गुळण्या कराव्यात.