Government Scheme: केंद्र सरकारच्या ‘या’ योजनेतून महिलांना मिळते 2 लाख रुपये कर्ज! वाचा ए टू झेड माहिती

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

Government Scheme:- केंद्र व राज्य सरकार यांच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांकरिता अनेक आर्थिक लाभाच्या योजना राबवल्या जात असून या योजनांच्या माध्यमातून समाजातील त्या त्या घटकांचे जीवनमान सुधारावे आणि त्यांचे आर्थिक प्रगती व्हावी हा त्यामागचा उद्देश आहे.

सामाजिक व आर्थिक दृष्टिकोनातून अल्प उत्पन्न गटातील घटकांचा स्तर उंचावण्याकरिता अशा योजनांचे महत्त्व अनन्यसाधारण असे आहे.शेती क्षेत्राकरिता ज्या प्रकारे अनेक योजना आहेत अगदी त्याच पद्धतीने व्यवसाय उभारण्यासाठी देखील संबंधितांना आर्थिक मदत होऊ शकेल अशा प्रकारच्या अनेक योजना केंद्र सरकारच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत.

अगदी उदाहरणच घ्यायचे झाले तर रस्त्यावरील जे काही विक्रेते असतात त्यांच्याकरिता केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम स्वनीधी योजना सुरू करण्यात आलेली आहे. अगदी त्याच पद्धतीने महिलांना देखील स्वावलंबी करता यावे या आर्थिक दृष्टिकोनातून त्यांना सक्षम करता यावे याकरिता अनेक योजना केंद्र सरकार राबवत आहे.

त्यातीलच एक योजना म्हणजे नवीन स्वर्णिम कर्ज योजना असून ही योजना महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी सुरू करण्यात आलेली योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकार मागासवर्गीय महिलांना मुदत कर्ज देऊन त्यांना स्वावलंबी बनवता यावे या दिशेने प्रयत्न करत आहे.

 काय आहे या योजनेसाठीची पात्रता?

ही केंद्र सरकारची योजना असून नॅशनल बॅकवर्ड क्लासेस फायनान्स अँड डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या माध्यमातून ही योजना महिलांसाठी राबविण्यात येत असून मागासवर्गीय महिलांना या माध्यमातून मुदत कर्ज देण्यात येते. जर आपण या योजनेसाठीची पात्रता पाहिली तर केंद्र व राज्य सरकारांनी  वेळोवेळी अधिसूचित केल्यानुसार

मागासवर्गीय महिला कर्जासाठी या योजनेच्या माध्यमातून पात्र असणार आहेत व अर्जदाराचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न हे तीन लाख रुपयांपेक्षा कमी असणे गरजेचे आहे. जर आपण या योजनेचे वैशिष्ट्ये पाहिले तर इतर सामान्य कर्जाच्या व्याजदरापेक्षा या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या कर्जाचा व्याजदर हा कमीत कमी आहे.

 नवीन स्वर्णिम कर्ज योजनेतून किती मिळते कर्ज?

ज्या महिला या योजनेच्या कक्षेमध्ये येतात त्या महिलांना जास्तीत जास्त दोन लाख रुपये पर्यंतचे कर्ज या योजनेच्या माध्यमातून दिले जाते. यामध्ये 95 टक्के वित्त पुरवठा हा नॅशनल बॅकवर्ड क्लासेस फायनान्स अँड डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या माध्यमातून करण्यात येतो व इतर चॅनल भागीदारांचे योगदान हे पाच टक्क्यांपर्यंत असते.

या योजनेवर वार्षिक पाच टक्के इतका कमीत कमी व्याजदर आहे व घेतलेल्या कर्जाची परतफेड जास्तीत जास्त आठ वर्षांमध्ये करणे गरजेचे आहे. या योजनेचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही जे काही कर्ज या माध्यमातून घेतात त्याचा हप्ता तुम्हाला तीन महिन्यांनी भरावा लागतो. समजा काही कारणास्तव तुम्हाला समस्या निर्माण झाल्या तर तुम्ही या योजनेत अटीसहित सहा महिन्यांची स्थगिती देखील घेऊ शकतात.

 या योजनेच्या अधिक माहितीसाठी या ठिकाणी संपर्क करा

तुम्हाला देखील या योजनेचा लाभ घ्यायचा असेल व अधिकची माहिती हवी असेल तर तुम्ही 1800-1023-399 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून माहिती घेऊ शकतात किंवा www.nbcfdc.gov.in या वेबसाईटला भेट देऊन देखील अधिकची माहिती मिळवू शकता.